AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs AUS T20 : चमकदार कामगिरी करणाऱ्या रिंकू सिंह याने वर्ल्डकपबाबत केलं मोठं वक्तव्य, स्पष्टच म्हणाला की…

वनडे वर्ल्डकप स्पर्धेच्या अंतिम सामन्यातील पराभवाची सळ अजून काही केल्या संपत नाही. पराभव प्रत्येक भारतीयाच्या जिव्हारी लागला आहे. हातातोंडाशी आलेला घास ऑस्ट्रेलियाने हिरावून नेला. मात्र यातून सावरत टीम इंडिया पुन्हा एकदा पुढच्या ध्येयपूर्तीसाठी कामाला लागली आहे. नवोदित तारांकित खेळाडू रिंकू सिंह याच्याकडे मोठ्या अपेक्षेने पाहिलं जात आहे. त्याने आता वर्ल्डकपबाबत मोठं वक्तव्य केलं आहे.

IND vs AUS T20 : चमकदार कामगिरी करणाऱ्या रिंकू सिंह याने वर्ल्डकपबाबत केलं मोठं वक्तव्य, स्पष्टच म्हणाला की...
IND vs AUS T20 : "मी माझ्या भविष्याबाबत जास्त विचार करत नाही..", वर्ल्डकपबाबत रिंकू सिंह बरंच काही बोलून गेला
| Updated on: Nov 25, 2023 | 4:42 PM
Share

मुंबई : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात दुसऱ्या टी20 सामन्यासाठी मोर्चेबांधणी सुरु झाली आहे. पण आगामी टी20 वर्ल्डकप 2024 स्पर्धेसाठी खेळाडूंची लिटमस टेस्ट होत आहे. कारण चमकदार कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना टी20 वर्ल्डकप 2024 स्पर्धेत खेळण्याची संधी मिळू शकते. त्यामुळे पुढच्या सहा महिन्यात चमकदार कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचा भर असेल. रिंकू सिंह हे टी20 फॉर्मेटमधील एक मोठं नाव झालं आहे. आयपीएलमध्ये शेवटच्या षटकात 5 षटकार मारून संघाला जिंकवून दिलं होतं. त्यामुळे रिंकू सिंह चर्चेत आला होता. आता त्याला टीम इंडियात खेळण्याची संधी मिळाली आहे. मागच्या तीन सामन्यात त्याने आपली छाप सोडली आहे. संघाला जेव्हा जेव्हा गरज होती तेव्हा त्याने स्वत:ला सिद्ध करून दाखवलं आहे. आता रिंकू सिंह यांची टी20 वर्ल्डकप 2024 स्पर्धेत खेळण्याची इच्छा आहे. जर वर्ल्डकप संघात खेळण्याची संधी मिळाली तर स्वप्न पूर्ण होईल असं त्याने सांगितलं आहे. टी20 वर्ल्डकप 2024 स्पर्धा जूनमध्ये होणार आहे. यासाठी आतापासून अवघ्या सहा महिन्यांचा अवधी शिल्लक आहे.

रिंकू सिंह याने टाईम्स ऑफ इंडियाशी बोलताना सांगितलं की, “हो, मी तयार आहे. मी माझ्या भविष्याबाबत जास्त विचार करत नाही. जर मला संधी मिळाली तर मी नक्कीच त्या संधीचं सोनं करेन. कोणताही फॉर्मेट असू दे आणि स्पर्धा कुठेही असून मी माझं 100 टक्के देणार यात काही शंका नाही. अलिगढमधून आयपीएल आणि भारतासाठी खेळणारा मी एकमेव खेळाडू आहे. वर्ल्डकप संघात स्थान मिळालं तर नक्कीच त्याचा मला अभिमान असेल.”

“प्रत्येक क्रिकेटपटूचं भारतासाठी खेळण्याचं स्वप्न असतं. तसेच वर्ल्डकप संघात स्थान मिळावं अशी इच्छा असते. मी सुद्धा हे स्वप्न पाहिलं आहे. माझं नाव वर्ल्डकप संघात येईल तेव्हा मी नेमकं कसं रिअॅक्ट करेन आता सांगणं खूपच कठीण आहे. पण मी त्या क्षणाची आतुरतेने वाट पाहात आहे. माझं ध्येय गाठण्यासाठी मी मेहनत घेत आहे.”, असं रिंकू सिंह याने पुढे सांगितलं.

टी20 वर्ल्डकप 2024 स्पर्धा वेस्ट इंडिज आणि युनाइटेड स्टेट ऑफ अमेरिका येथे आयोजित केला आहे. या स्पर्धेसाठी सहा महिन्यांचा अवधी शिल्लक आहे. यासाठी टीम इंडियाच्या नवोदित खेळाडूंची चाचपणी सुरु आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया टी20 मालिकेत नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात टीम इंडिया खेळत आहे. रिंकू सिंह हा देखील या स्क्वॉडमध्ये आहे. रिंकू सिंह आतापर्यंत 6 आंतरराष्ट्रीय टी20 सामने खेळला असून त्यापैकी 3 डावात खेळण्याची संधी मिळाली. यात त्याने 194 च्या स्ट्राईक रेटने 97 धावा केल्या आहेत.

गुलाम म्हणत ठाकरेंची नाव न घेता शिंदेंवर टीका...शिवसेनेकडूनही पटलवार
गुलाम म्हणत ठाकरेंची नाव न घेता शिंदेंवर टीका...शिवसेनेकडूनही पटलवार.
लोकलनं उद्या प्रवास करताय? तिन्ही रेल्वे मार्गावर कसा असणार मेगाब्लॉक?
लोकलनं उद्या प्रवास करताय? तिन्ही रेल्वे मार्गावर कसा असणार मेगाब्लॉक?.
राऊतांनी सत्ताधाऱ्यांची काढली लाज, विरोधी पक्षनेतेपदावरून घणाघाती टीका
राऊतांनी सत्ताधाऱ्यांची काढली लाज, विरोधी पक्षनेतेपदावरून घणाघाती टीका.
पुढच्या आठवड्यात पालिकेची निवडणूक?अनौपचारिक गप्पा, दादांनी काय म्हटलं?
पुढच्या आठवड्यात पालिकेची निवडणूक?अनौपचारिक गप्पा, दादांनी काय म्हटलं?.
राज ठाकरेंचं फडणवीसांना पत्र, राज्याच्या मुली बेपत्ता प्रकरणावर चिंता
राज ठाकरेंचं फडणवीसांना पत्र, राज्याच्या मुली बेपत्ता प्रकरणावर चिंता.
आता थांबलं पाहिजे... रायगड पालकमंत्रिपद वादात अजित दादांची मध्यस्थी
आता थांबलं पाहिजे... रायगड पालकमंत्रिपद वादात अजित दादांची मध्यस्थी.
अर्जेंटिनाचा सुपरहिरो मेस्सी 3 दिवस भारतात... कसा असणार 3 दिवसीय दौरा?
अर्जेंटिनाचा सुपरहिरो मेस्सी 3 दिवस भारतात... कसा असणार 3 दिवसीय दौरा?.
4 लाख घेऊन सोयाबिन केंद्र, वडेट्टीवार यांच्या आरोपानं सभागृहात गदारोळ
4 लाख घेऊन सोयाबिन केंद्र, वडेट्टीवार यांच्या आरोपानं सभागृहात गदारोळ.
मुंबईत भाजप+शिंदे सेना, दादांची NCP नाही? जागा वाटपात भाजपच मोठा भाऊ!
मुंबईत भाजप+शिंदे सेना, दादांची NCP नाही? जागा वाटपात भाजपच मोठा भाऊ!.
ठाकरे नार्वेकर, राम शिंदेंना भेटले, विरोधी पक्षनेतेपदावरून काय ठरलं?
ठाकरे नार्वेकर, राम शिंदेंना भेटले, विरोधी पक्षनेतेपदावरून काय ठरलं?.