India vs Leicestershire Warm up Match: दोन्ही ओपनर पॅव्हेलियनमध्ये, कॅप्टन रोहित शर्मा स्वस्तात OUT

India vs Leicestershire Warm up Match: दोन्ही ओपनर पॅव्हेलियनमध्ये, कॅप्टन रोहित शर्मा स्वस्तात OUT
ind vs Leicestershire

India vs Leicestershire Warm up Match: एक जुलैपासून सुरु होणाऱ्या कसोटी सामन्याआधी भारत आणि लीसेस्टरशायर (India vs Leicestershire) मध्ये आज पासून चार दिवसीय सराव सामन्याला सुरुवात झाली आहे.

दीनानाथ मधुकर परब, टीव्ही 9 मराठी डिजीटल

|

Jun 23, 2022 | 4:13 PM

मुंबई: एक जुलैपासून सुरु होणाऱ्या कसोटी सामन्याआधी भारत आणि लीसेस्टरशायर (India vs Leicestershire) मध्ये आज पासून चार दिवसीय सराव सामन्याला सुरुवात झाली आहे. भारताचा कॅप्टन रोहित शर्माने (Rohit Sharma) टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. सॅन्यूल एवंस लीसेस्टरशायरचा कॅप्टन आहे. या सराव सामन्यात जसप्रीत बुमराह, चेतेश्वर पुजारा, ऋषभ पंत (Rishabh Pant) आणि प्रसिद्ध कृष्णा हे लीसेस्टरशायरच्या टीमकडून खेळतायत. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी 20 सामन्यात विश्रांती देण्यात आलेले रोहित शर्मा-विराट कोहली सुद्धा या सराव सामन्यात खेळत आहेत. टीम इंडियाच्या सर्व खेळाडूंना सराव मिळाला पाहिजे, यासाठी भारताच्या काही खेळाडुंचा लीसेस्टरशायरच्या संघात समावेश करण्यात आला आहे. बीसीसाय, इंग्लंड क्रिकेट बोर्ड आणि लीसेस्टरशायरने मिळून हा निर्णय घेतला आहे. या सराव सामन्यात दोन्ही संघांचे प्रत्येकी 13 खेळाडू खेळत आहेत.

भारताच्या दोन विकेट

आतापर्यंत 15 षटकांचा खेळ झाला असून भारताच्या दोन बाद 50 धावा झाल्या आहेत. कॅप्टन रोहित शर्मा आणि दुसरा सलामीवीर शुभमन गिल दोघेही पॅव्हेलियनमध्ये परतले आहेत. गिलला डेविसने पंतकरवी 21 धावांवर झेलबाद केलं. तो 28 चेंडू खेळला. यात चार चौकार लगावले. रोहित शर्मा 25 धावांवर बाद झाला. वॉकरने त्याची विकेट काढली. रोहित 47 चेंडू खेळला. त्याने तीन चौकार मारले. आता विराट कोहली आणि हनुमा विहारीची जोडी मैदानावर आहे. जसप्रीत बुमराहने पाच षटकात 20 धावा दिल्या असून एकही विकेट काढलेला नाही.

टीम इंडियाची प्लेइंग 11 फॉर्म मध्ये नाहीय

इंग्लंड विरुद्ध मैदानात उतरणारी टीम इंडियाची प्लेइंग 11 फॉर्म मध्ये नाहीय, ही भारताची मुख्य अडचण आहे. सलामीवीर, मधली फळी प्रत्येक फलंदाजाचा धावांसाठी संघर्ष सुरु आहे. कॅप्टन रोहित शर्मापासून विराट कोहली आणि ऋषभ पंत ते श्रेयस अय्यर पर्यंत फॉर्मसाठी चाचपडत आहेत. मागच्यावर्षी रोहित शर्माने इंग्लंड विरुद्ध कसोटी मालिकेत दमदार प्रदर्शन केलं होतं. पण आता तो फॉर्म मध्ये नाहीय. रोहितने आयपीएल 2022 मध्ये 19.14 च्या सरासरीने फक्त 268 धावा केल्या. तो एकही अर्धशतक झळकवू शकला नाही.

भारचाची प्लेइंग 11

रोहित शर्मा (कॅप्टन), शुभमन गिल, हनुमा विहारी, विराट कोहली, श्रीकर बरत, रवींद्र जाडेजा, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज आणि उमेश यादव

लीसेस्टरशायरची प्लेइंग 11
सॅम्युल एवंस (कॅप्टन), रेहान अहमद, सॅम्युल बेट्स, नॅथन बोले, विल डेविस, जॉय एविसन, लुइस किंबर, एबिडिन सकांडे, रीमन वाकर, चेतेश्वर पुजारा, ऋषभ पंत, प्रसिद्ध कृष्णा आणि जसप्रीत बुमराह

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें