AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND Vs NZ: 306 बनवूनही का हरली टीम इंडिया? जाणून घ्या 3 कारणं

IND Vs NZ: वनडे क्रिकेटमध्ये 306 धावा मोठा स्कोर आहे. पण ऑकलंडमध्ये टीम इंडियाच्या गोलंदाजांनी 306 धावा सुद्धा छोटा स्कोर ठरवला.

IND Vs NZ: 306 बनवूनही का हरली टीम इंडिया? जाणून घ्या 3 कारणं
Team india (Image Credit source: GETTY IMAGES
| Updated on: Nov 25, 2022 | 4:15 PM
Share

ऑकलंड: वनडे क्रिकेटमध्ये 306 धावा मोठा स्कोर आहे. पण ऑकलंडमध्ये टीम इंडियाच्या गोलंदाजांनी खराब बॉलिंग केली. त्यांनी या धावसंख्येला छोटा स्कोर ठरवला. न्यूझीलंडने 307 धावांचे लक्ष्य आरामात पार केले. न्यूझीलंडने 7 विकेटने सामना जिंकला. त्यांनी 47.1 ओव्हरमध्ये विजयी लक्ष्य गाठलं. वनडे सीरीजमध्ये न्यूझीलंडची टीम 1-0 ने आघाडीवर आहे. न्यूझीलंडच्या विजयात केन विलियम्सन आणि टॉम लॅथम कमालीची इनिंग खेळले. लॅथमने शतक फटकावलं.

न्यूझीलंडच्या इनिंगमध्ये पहिल्या 20 षटकात टीम इंडियाने सरस कामगिरी केली होती. टीम इंडिया कशामुळे हरली? जाणून घेऊया पराभवाची 3 कारणं.

जुन्या चेंडूने खराब गोलंदाजी

टीम इंडियाने पहिल्या 20 ओव्हरमध्ये चांगली गोलंदाजी केली. 120 चेंडूत न्यूझीलंडच्या 88 धावात 3 विकेट गेल्या होत्या. पण चेंडू जुना झाल्यानंतर भारतीय वेगवान गोलंदाजांची दिशा आणि टप्पा भरकटला. विलयम्सन खराब फॉर्ममध्ये होता. पण गोलंदाजांच्या सुमार कामगिरीमुळे तो क्रीजवर स्थिरावला. लॅथमने धुवाधार बॅटिंग करुन गोलंदाजांची दिशा आणि टप्पा भरकटवला.

खराब टीम कॉम्बिनेशन

टीम क़ॉम्बिनेशन भारताच्या पराभवाच दुसरं कारण आहे. भारताने प्लेइंग इलेव्हनमध्ये 5 असे खेळाडू होते, जे फक्त गोलंदाजी करु शकतात. वनडे आणि टी 20 क्रिकेटमध्ये एखाद्या गोलंदाजाचा दिवस खराब असू शकतो. मात्र तरीही भारताने सहावा गोलंदाज खेळवला नाही.

न्यूजीलंडची जबरदस्त फलंदाजी

न्यूझीलंडच्या टीमने जबरदस्त फलंदाजी केली. त्यामुळे टीम इंडियाचा पराभव झाला. टॉम लॅथमने शानदार शतक झळकावलं. या फलंदाजाने 76 चेंडूत शतक ठोकलं. लॅथमने कॅप्टम विलयम्सनसोबत 200 पेक्षा जास्त धावांची भागीदारी केली. त्यामुळेच टीम इंडिया हरली.

मोदी ऑन बोर्ड E-Mail चा उल्लेख अन्...पृथ्वीराज चव्हाणांचा सनसनाटी दावा
मोदी ऑन बोर्ड E-Mail चा उल्लेख अन्...पृथ्वीराज चव्हाणांचा सनसनाटी दावा.
मराठी अन् मुस्लिम मतदारांच्या ध्रुवीकरणासाठी ठाकरे बंधूंची रणनिती ठरली
मराठी अन् मुस्लिम मतदारांच्या ध्रुवीकरणासाठी ठाकरे बंधूंची रणनिती ठरली.
मोदी आणि एपस्टीनचं काय नातं? एपस्टीन प्रकरणावरून चव्हाणांचा थेट सवाल
मोदी आणि एपस्टीनचं काय नातं? एपस्टीन प्रकरणावरून चव्हाणांचा थेट सवाल.
भाजपात इनकमिंग सुरूच, 22 नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांचा पक्षात प्रवेश
भाजपात इनकमिंग सुरूच, 22 नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांचा पक्षात प्रवेश.
बाबरच्या नावाने मशीद बांधली तर कारसेवक तिथे जातील अन्... राणांचा इशारा
बाबरच्या नावाने मशीद बांधली तर कारसेवक तिथे जातील अन्... राणांचा इशारा.
BMC निवडणुकीसाठी मनसे अ‍ॅक्टिव्ह...राज ठाकरेंच्या मनसेची मोर्चेबांधणी
BMC निवडणुकीसाठी मनसे अ‍ॅक्टिव्ह...राज ठाकरेंच्या मनसेची मोर्चेबांधणी.
ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात भाजपची रणनीती, शिंदे सेना-BJP समान जागा लढणार
ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात भाजपची रणनीती, शिंदे सेना-BJP समान जागा लढणार.
3 वर्गमित्र, 3 वेगळे पक्ष अन् प्रभाग एक... राजकारणापलीकडची मैत्री
3 वर्गमित्र, 3 वेगळे पक्ष अन् प्रभाग एक... राजकारणापलीकडची मैत्री.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? युगेंद्र पवारांनी एका वाक्यात म्हटलं..
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? युगेंद्र पवारांनी एका वाक्यात म्हटलं...
मुंबईत शिंदेंची सेना खरंच स्वबळावर लढणार की 84 जागांसाठी दबाव?
मुंबईत शिंदेंची सेना खरंच स्वबळावर लढणार की 84 जागांसाठी दबाव?.