IND vs SL: श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यासाठी भारताचा कर्णधार बदलणार! सरावादरम्यान काय घडलं?

भारत आणि श्रीलंका यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका होणार आहे. या मालिकेपूर्वी भारतीय संघ श्रीलंकेतील लोकल संघासोबत सराव सामना खेळणार आहे. या सामन्यापूर्वी भारताचा गोटात चिंतेचं वातावरण आहे.

IND vs SL: श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यासाठी भारताचा कर्णधार बदलणार! सरावादरम्यान काय घडलं?
IND vs SL: श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यासाठी भारताचा कर्णधार बदलणार! सरावादरम्यान काय घडलं?
Image Credit source: BCCI Twitter
| Updated on: Aug 06, 2026 | 8:24 PM

भारतीय संघ श्रीलंकेत दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी दाखल झाला आहे. पहिला कसोटी सामना 15 ऑगस्टला होणार आहे. या सामन्यापूर्वी भारतीय श्रीलंकेतील परिस्थितीचा अंदाज घेण्यासाठी एक सराव सामना खेळणार आहे. पण या सराव सामन्याच्या एक दिवस आधी भारतीय गोटात चिंतेचं वातावरण आहे. कारण या सामन्यापूर्वी कर्णधार शुबमन गिलला दुखापत झाली आहे. एका रिपोर्टनुसार, कोलंबोत होणाऱ्या सराव सामन्यापूर्वी भारतीय संघ प्रॅक्टिस करत होता. या दरम्यान कर्णधार शुबमन गिलच्या अंगठ्याला दोन चेंडू लागला. त्यामुळे वेदनेने अक्षरश: कळवळला. त्यामुळे टीम इंडियाचं टेन्शन वाढलं आहे. पहिल्यांदा चेंडू लागला तेव्हा काही जास्त वाटलं नाही. पण दुसऱ्यांदा त्याच ठिकाणी चेंडू पुन्हा लागल्याने प्रॅक्टिस सोडावी लागली. त्यामुळे आता सराव सामन्यात खेळणं कठीण असल्याचं बोललं जात आहे.

एकाच अंगठ्यावर दोन चेंडू लागला

भारत आणि श्रीलंकन लोकल संघ यांच्यात 7 ऑगस्ट ते 9 ऑगस्ट दरम्यान तीन दिवसीय सराव सामना होणार आहे. या सामन्यासाठी भारतीय संघ कोलंबोतील एनसीसी मैदानात सरावत करत होता. गुरूवारी 6 ऑगस्टला सराव करता असताना फलंदाजी करताना कर्णधार शुबमन गिलच्या उजव्या हाताच्या अंगठ्याला जोरात चेंडू लागला. त्यामुळे त्याला तीव्र वेदना झाल्या. मेडिकल टीमने तात्काळ त्याच्या दुखापतीची तपासणी केली आणि अंगठ्याला पट्टी लावली. त्यानंतर त्याने पुन्हा सराव सुरू केला. थोड्या वेळाने त्याने स्लिपला उभा झेल पकडण्याचा सराव सुरू केला. यावेळी झेल पकडताना पुन्हा एकदा दुखापत झालेल्या अंगठ्यावर चेंडू आदळला. त्यामुळे त्याला वेदना असह्य झाला आणि सराव सोडावा लागला.

सराव सामन्यात खेळणार की नाही?

शुबमन गिलच्या बोटाला झालेली दुखापत किती गंभीर आहे याबाबत काही कळू शकलेलं नाही. पण त्याची दुखापत मात्र टीम इंडियाची चिंता वाढवणारी आहे. कारण मालिकेला अवघे काही दिवस असताना दुखापत झाल्याने चिंता वाढली आहे. त्यात 7 ऑगस्टपासून सुरू होणारा सराव सामना खेळण्याची शक्यता कमी असल्याचं बोललं जात आहे. जर दुखापत गंभीर असेल तर मात्र शुबमन गिलला सराव सामन्याला मुकावं लागेल. त्यामुळे या सामन्यात उपकर्णधार असलेल्या केएल राहुलला जबाबदारी पार पाडावी लागेल. पण शुबमन गिलच्या दुखापतीबाबत अजून काही स्पष्टता नाही.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us