AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

श्रीलंका कसोटी मालिकेपूर्वी टीम इंडियाला सोनलची भीती, कर्णधार शुबमन गिलचं टेन्शन वाढलं

भारतीय संघ श्रीलंका दौऱ्यावर असून दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. या मालिकेपूर्वी टीम इंडिया श्रीलंकेतील लोकल संघासोबत सराव सामना खेळणार आहे. या सामन्यासाठी श्रीलंकेने संघाची घोषणा केली असून एक नाव धास्ती वाढवणारं आहे.

श्रीलंका कसोटी मालिकेपूर्वी टीम इंडियाला सोनलची भीती, कर्णधार शुबमन गिलचं टेन्शन वाढलं
श्रीलंका कसोटी मालिकेपूर्वी टीम इंडियाला सोनलची भीती, कर्णधार शुबमन गिलचं टेन्शन वाढलंImage Credit source: PTI
| Updated on: Aug 06, 2026 | 5:43 PM
Share

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2027 स्पर्धेच्या अंतिम फेरीचं टीम इंडियाचं गणित श्रीलंका दौऱ्यावर अवलंबून आहे. ही कसोटी मालिका भारताला काहीही करून 2-0 ने जिंकणं भाग आहे. असं असताना या कसोटी मालिकेपूर्वी भारतीय संघाचा कस लागणार आहे. भारतीय संघ कोलंबोत पहिला सराव सामना 7 ऑगस्टला खेळणार आहे. हा तीन दिवसीय सामना असणार आहे. या संघाची धुरा श्रीलंका क्रिकेटने सोनल दिनुषाकडे दिली आहे. त्यामुळे भारतीय संघाचं टेन्शन वाढलं आहे. त्याचं कारणही तसंच आहे. सोनल अष्टपैलू खेळाडू असून फलंदाजांना फिरकीवर नाचवण्याची कला आहे. इतकंच काय तर फलंदाजीतही गोलंदाजांना अडचणीत आणण्याची क्षमता आहे. त्यामुळे सोनलची सर्वाधिक धास्ती टीम इंडियाला सतावत आहे.

सोनल दिनुषा कोण?

श्रीलंका क्रिकेट संघाने सराव सामन्यासाठी नेतृत्व सोनल दिनुषाच्या खांद्यावर सोपवलं आहे. सोनल दिनुषा 25 वर्षांचा असून अष्टपैलू खेळाडू आहे. डावखुरा फिरकीपटू असल्याने टीम इंडियाचं टेन्शन वाढलं आहे. कारण डावखुऱ्या फिरकीचा सामना करताना भारतीय संघाला कायम अडचणीचा सामना करावा लागला आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत हे अधोरेखित झालं आहे. घरच्या मैदानावर न्यूझीलंडने डावखुऱ्या गोलंदाजीवर भारतीय संघाला पराभवाचं पाणी पाजलं. एजाज पटेल आणि मिचेल सँटनर यांनी आपल्या फिरकीवर नाचवलं होतं. असंच काहीसं आता सराव सामन्यात सोनल दिनुषा करू शकतो.

सोनल दिनुषाचं क्रिकेट कारकिर्द

सोनल दिनुषाचं आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकि‍र्द फार मोठी नाही. आतापर्यंत त्याने 3 कसोटी सामने खेळले असून 6 विकेट घेतल्या आहेत. तर 46.5 च्या सरासरीने 186 धावा केल्या आहेत. पण फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये त्याने 133 विकेट नावावर केल्या आहेत. फलंदाजीतही त्याने कमाल केली आहे. तर फलंदाजीत 45.09 च्या सरासरीने 3698 धावा केल्या आहेत. यात 11 शतकांचा समावेश आहे. सोनलची जादू टीम इंडियाविरुद्ध चालली तर त्याच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकि‍र्दीला आणखी बुस्टर मिळेल.

सराव सामन्यासाठी श्रीलंकन संघ : निशान मदुष्का, रविंदु रसांता, पासिंदु सूर्याबंडारा, पवन रत्नायके, अहान विक्रमासिंघे, सोनल दिनुषा, अंजाला बंडारा, निपुन धनंजया, लाहिरू कुमारा, विश्वा फर्नाण्डो, असांका मनोज, इसिता विजेसुंदरा, रमेश मेंडिस, केसारा नुवांता आणि दिलुम सुदीरा.

Follow Us
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट, व्हिडीओ आले समोर
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले, शुगर असलेल्यांनीच...
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ व्हायरल
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा..
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा मोठा दावा
ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
Disha Salian Case : ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरेंच्या वकिलांनी...
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरे यांच्या वकिलांनी... सतीश सालियान यांनी दिला 7 दिवसांचा अल्टिमेटम
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं...
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम...
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम पावसाचा पर्याय
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, ‘डिजिटल सापळ्यात...
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, 'डिजिटल सापळ्यात’ नागरिकांना अडकवले
नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी
Nanded | नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी