AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ऑस्ट्रेलियाविरुद्धची कसोटी मालिका 2-2 ने बरोबरीत सुटली तर भारत WTC अंतिम फेरी गाठणार, कसं ते समजून घ्या

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पाच सामन्यांची कसोटी मालिका सुरु आहे. या मालिकेतील पहिला सामना जिंकत भारताने 1-0 ने आघाडी घेतली आहे. पण टीम इंडिया वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप अंतिम फेरी गाठणार की नाही? असा प्रश्न क्रीडाप्रेमींना पडला आहे. कोणतं समीकरण जुळलं की भारत अंतिम फेरी गाठेल? चला या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊयात

ऑस्ट्रेलियाविरुद्धची कसोटी मालिका 2-2 ने बरोबरीत सुटली तर भारत WTC अंतिम फेरी गाठणार, कसं ते समजून घ्या
| Updated on: Dec 04, 2024 | 8:54 PM
Share

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2023-25 स्पर्धेतील अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी शेवटचा टप्पा सुरु आहे. अंतिम फेरीच्या शर्यतीत अजूनही कोणाचंच नाव निश्चित नाही. न्यूझीलंडकडून भारताला 3-0 ने मात खावी लागली होती. त्यामुळे भारताचं गणित फिस्कटलं आहे. ऑस्ट्रेलियात दौऱ्यात टीम इंडिया कशी कामगिरी करते याकडे लक्ष लागून होतं. दुसरीकडे, इंग्लंडने पहिल्याच कसोटी सामन्यात न्यूझीलंडला पराभूत केलं आणि न्यूझीलंडचं गणित कठीण केलं.त्यात स्लो ओव्हररेटमुळे विजयी टक्केवारीतून 3 गुण कापले आहेत. त्यामुळे न्यूझीलंडला आता अंतिम फेरी गाठणं खूपच किचकट आहे. दुसरीकडे, अंतिम फेरीच्या शर्यतीत भारत, ऑस्ट्रेलिया, दक्षिण अफ्रिका आणि श्रीलंका यांच्यात चुरस असणार आहे. त्यात श्रीलंकेचं अंतिम फेरी गाठणं खूपच कठीण आहे. त्यामुळे भारताने उर्वरित चार सामन्यात काय केलं तर अंतिम फेरीतील स्थान निश्चित होईल. चला तर जाणून घेऊयात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप अंतिम फेरीचं गणित

  • भारताने ऑस्ट्रेलियाला 5-0, 4-1, 4-0 किंवा 3-0 ने पराभूत केलं तर अंतिम स्थान पक्कं होईल. यासाठी कोणत्याही समीकरणावर अवलंबून राहावं लागणार आहे. मग दुसऱ्या स्थानासाठी दक्षिण अफ्रिका आणि श्रीलंका या संघात चुरस असेल. भारताचं वरचं समीकरण जुळून अलां तर भारत तिसऱ्यांदा अंतिम फेरी गाठेल.
  • भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्धची मालिका 3-1 ने जिंकली तर श्रीलंका आणि दक्षिण अफ्रिका सामन्याकडे नजर ठेवावी लागेल. दक्षिण अफ्रिकेने श्रीलंकेला दुसऱ्या सामन्यात पराभूत केलं तर भारताचं गणित जर तर वर येईल. पण श्रीलंकेने दक्षिण अफ्रिकेला हरवलं तर वरच्या समीकरणात अंतिम फेरी गाठेल.
  • भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्धची मालिका 3-2 ने जिंकली तर वर्ल्ड टेस्ट चॅम्पिनशिप अंतिम फेरी गाठू शकते. फक्त श्रीलंकने कसोटी मालिकेत ऑस्ट्रेलियाविरुद्ध एक सामना ड्रॉ केला पाहीजे.
  • बॉर्डर गावस्कर कसोटी मालिका 2-2 ने बरोबरीत सुटली तरीही भारत अंतिम फेरी गाठू शकते. फक्त दक्षिण अफ्रिकेने श्रीलंकेला 2-0 पराभूत करावं. तसेच श्रीलंकेने ऑस्ट्रेलियाला मालिकेत 1-0 ने पराभूत करावं.

भारताने दोनदा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप अंतिम फेरी गाठली आहे. पण दोन्ही वेळेस पदरी निराशा पडली आहे. पहिल्या वेळेस न्यूझीलंडने आणि दुसऱ्यांदा ऑस्ट्रेलियाने पराभूत केलं आहे. आता तिसऱ्यांदा अंतिम फेरी गाठणार का? असा प्रश्न आहे.

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.