AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs IRE: टीम इंडिया-आयर्लंड मालिकेतील सामन्यांच्या वेळेत बदल! किती वाजता सुरुवात होणार?

IRE vs IND T20I Series 2026: टीम इंडिया विरुद्ध आयर्लंड यांच्यातील दोन्ही टी 20I सामने हे बेलफास्टमध्ये होणार आहेत. जाणून घ्या या दोन्ही सामन्यांची वेळ.

IND vs IRE: टीम इंडिया-आयर्लंड मालिकेतील सामन्यांच्या वेळेत बदल! किती वाजता सुरुवात होणार?
Ishan Kishan and Shubman GillImage Credit source: PTI
Sanjay patil
Sanjay patil | Updated on: Jun 18, 2026 | 9:55 PM
Share

टीम इंडियाने अफगाणिस्तान विरुद्ध एकमेव कसोटी सामना जिंकला. त्यानंतर भारताने शुबमन गिल याच्या नेतृत्वातच 3 सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत जबरदस्त सुरुवात केली. भारताने 13 जून रोजी विजयी सलामी दिली. तर 17 जूनला सलग दुसऱ्या सामन्यासह मालिकाही जिंकली. टीम इंडिया या मालिकेत 2-0 ने आघाडीवर आहे. तर तिसरा आणि अंतिम सामना हा 20 जून रोजी होणार आहे. त्यानंतर टीम इंडिया आयर्लंड दौऱ्यावर जाणार आहे. टीम इंडिया या दौऱ्यात यजमान आयर्लंड विरुद्ध टी 20i मालिका खेळणार आहे. या मालिकेतील सामन्यांच्या वेळेबाबत मोठी अपडेट समोर आली आहे.

भारत विरुद्ध आयर्लंड यांच्यात 2 सामन्यांची टी 20i मालिका खेळवण्यात येणार आहे. पहिला सामना हा 26 तर दुसरा आणि अंतिम सामना 28 जून रोजी होणार आहे. श्रेयस अय्यर भारतीय संघाचं नेतृत्व करणार आहे. श्रेयस अय्यर या मालिकेतून टी 20i कर्णधार म्हणून पदार्पण करणार आहे. तर तिलक वर्मा उपकर्णधार म्हणून जबाबदारी पार पाडणार आहे. या मालिकेतील सामन्याच्या वेळेबाबत 10 दिवसांआधी मोठी अपडेट समोर आली आहे.

सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?

भारतात गेल्या अनेक वर्षांपासून टीम इंडियाच्या टी 20i सामन्यांना संध्याकाळी 7 किंवा साडे 7 पासून सुरुवात होते. आधी आयपीएल स्पर्धेतील सामन्यांना रात्री 8 वाजता सुरुवात व्हायची. मात्र आयपीएल स्पर्धेतील सामन्याची वेळ 8 ऐवजी साडे सात करण्यात आली. भारतात अनेक बाबतीत टी 20i सामन्याची साडे सात ही वेळ आदर्श मानली जाते. मात्र आयर्लंड-भारत टी 20i मालिकेत तसं होताना दिसणार नसल्याचं म्हटलं जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, इंडिया विरुद्ध आयर्लंड सामन्याला भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 6 वाजता सुरुवात होणार आहे. तर सामना रात्री 10 पर्यंत निकाली निघण्याची शक्यता आहे. मात्र सामन्याला 6 पासून सुरुवात करण्याचा निर्णय किती योग्य ठरणार? हे मालिकेनंतर येणाऱ्या टीआरपीच्या आकड्यांवरुनच स्पष्ट होईल.

आयर्लंड विरूद्धच्या टी 20I मालिकेसाठी भारतीय संघ : श्रेयस अय्यर (कर्णधार), तिलक वर्मा (उपकर्णधार), वैभव सूर्यवंशी, रवी बिश्नोई, अभिषेक शर्मा, नितीश कुमार रेड्डी, मोहम्मद सिराज, संजू सॅमसन, अक्षर पटेल, हर्षित राणा, ईशान किशन, वॉशिंग्टन सुंदर, अर्शदीप सिंह, शिवम दुबे, वरुण चक्रवर्ती आणि प्रिन्स यादव.

Follow Us
साहेब पाण्याचा थेंब नाही, बाजारात गेलो होतो पण...मुख्यमंत्र्यांपुढे...
Devendra Fadnavis : साहेब पाण्याचा थेंब नाही, बाजारात गेलो होतो पण...मुख्यमंत्र्यांपुढे हात जोडत शेतकरी ढसा ढसा रडला
निवडणूक आयोगावर बोलताना राऊतांची जीभ घसरली; त्या वक्तव्यावरून...
Ram Kadam : निवडणूक आयोगावर बोलताना राऊतांची जीभ घसरली; त्या वक्तव्यावरून राम कदमांचा पलटवार
शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाणाचा फैसला पुन्हा लांबला! आजची सुनावणी...
Shiv Sena Symbol : शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाणाचा फैसला पुन्हा लांबला! आजची सुनावणी झालीच नाही; आता पुढे...
IIT पवई प्रकरणात मोठा ट्विस्ट! साहिल वाकोडेचा iPhone पोलिसांच्या हाती
IIT पवई प्रकरणात मोठा ट्विस्ट! साहिल वाकोडेचा iPhone पोलिसांच्या हाती, ChatGPT संदर्भांतील आरोपाचं काय होणार?
देश असाच चालणार असेल तर निवडणुकीचा उपयोग काय?; कपिल सिब्बलांचा सवाल
Kapil Sibal : देश असाच चालणार असेल तर निवडणुकीचा उपयोग काय?; कपिल सिब्बलांचा सवाल, नेमकी काय केली मागणी?
निवडणुका असत्या तर...; शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सतेज पाटलांचा सरकारवर..
Satej Patil : निवडणुका असत्या तर...; शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सतेज पाटलांचा सरकारवर थेट आरोप
निवडणूक आयोगात चाललंय काय? निवडणूक आयुक्तांमध्येच बिनसलं? 10 महिन्यांत
Election Commission : निवडणूक आयोगात चाललंय काय? निवडणूक आयुक्तांमध्येच बिनसलं? 10 महिन्यांत 14 वेळा आक्षेप! वाचा प्रकरण काय?
चंद्रपूरच्या तुकूमचा राजाची मूर्ती, कडधान्यांपासून साकारलेला गणपती
चंद्रपूरच्या तुकूमचा राजाची अनोखी मूर्ती, कडधान्यांपासून साकारलेला गणपती
गणेशोत्सवात पिंपरी चिंचवड पोलिसांची डीजे आवाजावर कारवाई
गणेशोत्सवात पिंपरी चिंचवड पोलिसांची डीजे आवाजावर कारवाई, 80 मंडळांवर गुन्हे
भाजपमध्ये संघटनात्मक फेरबदल; महाराष्ट्राच्या प्रभारीपदी कोणाची वर्णी
BJP : भाजपमध्ये मोठा संघटनात्मक फेरबदल; महाराष्ट्राच्या प्रभारीपदी कोणाची वर्णी