ind vs afg : विराट आणि सुर्याची कमी ‘हे’ दोन तगडे खेळाडू काढणार भरून? कोच द्रविडने खेळली कडक चाल

IND vs AFG : अफगाणिस्तानविरूद्ध पहिल्या टी-20 सामन्यात टीम इंडियाचे दोन स्टार खेळाडू नाहीत. विराट कोहली आणि सुर्यकुमार यांच्या जागी संघात रोहित शर्मा नव्या दमाच्या खेळाडूंना संधी देणार आहे. कोण आहेत ते दोन खेळाडू जाणून घ्या.

ind vs afg : विराट आणि सुर्याची कमी हे दोन तगडे खेळाडू काढणार भरून? कोच द्रविडने खेळली कडक चाल
Rahul Dravid-Rohit Sharma
Image Credit source: AFP
| Updated on: Jan 11, 2024 | 4:59 PM

मुंबई : टीम इंडिया आणि अफगाणिस्तानमधील टी-20 मालिकेला आजपासून सुरूवात होणार आहे. तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना मोहालीमध्ये पार पडला जाणार आहे. या सामन्यात विराट कोहली खेळणार नाही. तर सुर्यकुमार दुखापतीमुळे संपूर्ण सीरिजमधून बाहेर झाला आहे. या दोन मोठ्या खेळाडूंची जागा कोणते खेळाडू भरून काढणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. रोहित आणि राहुल यांनी मोठी चाल खेळली असून या खेळाडूंच्या जागी दोन तगड्या खेळाडूंची निवड केली आहे.

कोण आहेत ते दोन खेळाडू?

विराट कोहली याच्या जागी शुबमन गिल याला संधी मिळाली आहे. गिल कोहलीसारखाच प्रतिभावान खेळाडू आहे. जो तिसऱ्या क्रमांकावर येत टीम इंडियासाठी फायदेशीर ठरू शकतो. सुर्यकमार याची जाग भरून काढण तितकं सोपं नाही. टीम इंडियाचा मिस्टर 360 डिग्री एकदा सेट झाला क विरोधी संघाचं येड पळवतो. आजच्या सामन्यात सुर्या याच्या जागी तिलक वर्मा याला संधी मिळण्याची शक्यता आहे.

विराट कोहली खाजगी कारणामुळे आजच्या सामन्यात खेळणार नाही. दुसऱ्या आणि तिसऱ्या सामन्यात विराट कोहली टीममध्ये कमबॅक करणार आहे. त्यामुळे दुसऱ्या सामन्यात गिल किंवा जयस्वाल यांच्यातील एकाला खाली बसवलं जावू शकतं. सुर्यकुमार यादव याच्या पायाला साऊथ आफ्रिका दौऱ्यावर दुखापत झाली होती. सुर्या आता लवकर बरा होणार नाही. त्यासोबतच त्याच्यावर हर्निया आजारामुळे सर्जरी करण्यात आली आहे.

आजच्या सामन्यात टीम इंडियाचे प्रमुख गोलंदाज खेळणार नसून वेगवान गोलंदाजीची जबाबदारी मुकेश कुमार, आवेश खान आणि अर्शदीप सिंह यांच्यावर असणार आहे. तर फिनिशर रिंकू सिंहची तोफ धडाडताना सर्वांना दिसणार आहे.

टीम इंडिया संपूर्ण स्क्वॉड

रोहित शर्मा (कॅप्टन), शुबमन गिल, यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, टिळक वर्मा, रिंकू सिंग, जितेश शर्मा (विकेटकीपर), संजू सॅमसन (विकेटकीपर), शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग , आवेश खान आणि मुकेश कुमार