AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs AFG 2nd T20 | कॅप्टन रोहितला रनआऊट करण पडलं महागात, ‘त्या’ खेळाडूला काढलं संघाबाहेर?

Shubman Gill : टीम इंडिया आणि अफगाणिस्तानमधील पहिल्या टी-20 सामन्यामध्ये रोहित कसा आऊट झाला हे सर्वांनी पाहिलं. रोहितला ज्या खेळाडूने रन आऊट केलं त्या स्टार खेळाडूला रोहितने दुसऱ्या सामन्यात संघाबाहेर केलं आहे.

IND vs AFG 2nd T20 | कॅप्टन रोहितला रनआऊट करण पडलं महागात, 'त्या' खेळाडूला काढलं संघाबाहेर?
Rohit Sharma Angree on gill
| Updated on: Jan 14, 2024 | 8:25 PM
Share

मुंबई : टीम इंडिया आणि अफगाणिस्तानमधील दुसऱ्या टी-20 सामना सुरु आहे. विराट कोहली आजच्या सामन्यात खेळत आहे. जवळपास चौदा महिन्यांनी कोहली टी-2o क्रिकेट खेळत आहे.  या सामन्यामध्ये टीम इंडियाची प्लेइंग 11 पाहिली तर टीममध्ये दोन बदल केलेले पाहायला मिळाले. यामध्ये एका  स्टार खेळाडूला खाली बसवण्यात आलं आहे. विशेष म्हणजे या खेळाडूला टीम इंडियाचा भविष्याचील मुख्य खेळाडू म्हणून पाहिलं जातं. हा खेळाडू दुसरा तिसरा कोणी नसून शुबमन गिल आहे.

गिलला वगळण्यामागे रोहितचा इगो?

रोहित शर्मा कॅप्टन असून त्यानेही वर्षभरानंतर टी-20 क्रिकेटमध्ये कमबॅक केलं होतं. पहिल्याच टी-20 सामन्यात गडी शून्य धावांवर रनआऊट झाला होता. नॉन-स्ट्राईक एंडला शुबमन गिल होता. रोहितने कॉल करूनही गिलने पिच सोडलंच नाही. भर मैदानातमध्ये रोहित रागाने फणफणलेला दिसला. रोहितला त्याच्या रागावर नियंत्रण ठेवता आलं नाही. रोहित माघारी परतत असताना गिलवर तो ओरडलेला दिसला.

पहिल्या सामन्यात झालेल्या या रनआऊटनंतर रोहित शर्मा याने गिलचा प्लेइंग 11 मध्ये समावेश केला नाही. नेटकऱ्यांनी यावरून रोहितला धारेवर धरलेलं दिसत आहे. सा सामन्यामध्ये रोहितने प्लेइंग 11 मध्ये शुबमन गिल याच्या जागी यशस्वी जयस्वाल याची निवड करण्यात आली आहे. रोहित शर्मा याला यावरून ट्रोल केलं जात आहे. मात्र तसं पाहायला गेलं तर पहिल्या सामन्यामध्ये विराट कोहली खेळला असता तरी गिलला खाली बसावं लागलं असतं. कारण दोघांपैकी एका कोणाला तरी बसावं लागणार हे फिक्स आहे.

दरम्यान, पहिल्या सामन्याआधी जयस्वाल दुखापतीमुळे खेळू शकला नाही. त्यामुळे गिल आणि तिलक वर्मा यांना खेळण्याची संधी मिळाली होती. आजच्या सामन्यात विराट कोहली हा तिलक वर्माच्या जागी तर जयस्वाल गिलच्या जागेवर खेळत आहे.

टीम इंडिया प्लेईंग ईलेव्हन | रोहित शर्मा (कॅप्टन), यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, शिवम दुबे, जितेश शर्मा (विकेटकीपर), रिंकू सिंग, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग आणि मुकेश कुमार.

अफगाणिस्तान प्लेईंग ईलेव्हन | इब्राहिम झद्रान(कर्णधार), रहमानुउल्लाह गुरबाज(विकेटकीपर), अजमातुल्ला ओमरझाई, मोहम्मद नबी, नजीबुल्ला झदरन, करीम जनात, गुलबदिन नायब, नूर अहमद, फजलहक फारुकी, नवीन-उल-हक आणि मुजीब उर रहमान

शिवतीर्थावरील चाफा...आशिष शेलारांकडून ठाकरे बंधूंवर खोचक टीका
शिवतीर्थावरील चाफा...आशिष शेलारांकडून ठाकरे बंधूंवर खोचक टीका.
मलिकांमुळे महायुतीतून 'दादा आऊट', भाजप अन् राष्ट्रवादीची भूमिका काय?
मलिकांमुळे महायुतीतून 'दादा आऊट', भाजप अन् राष्ट्रवादीची भूमिका काय?.
मिंधेंचा पक्ष डुप्लिकेट, तसंच त्यांचं ढोंग... राऊतांची शिंदेवर टीका
मिंधेंचा पक्ष डुप्लिकेट, तसंच त्यांचं ढोंग... राऊतांची शिंदेवर टीका.
मोठी बातमी, मंत्री माणिकराव कोकाटे नॉट रिचेबल, कोणत्याही क्षणी अटक?
मोठी बातमी, मंत्री माणिकराव कोकाटे नॉट रिचेबल, कोणत्याही क्षणी अटक?.
बाण-पंजा एक साथ...शिंदे-काँग्रेस युतीचे नवं पर्व, दानवेंचं टीकास्त्र
बाण-पंजा एक साथ...शिंदे-काँग्रेस युतीचे नवं पर्व, दानवेंचं टीकास्त्र.
निवडणुकीपूर्वी अंबरनाथमध्ये थरार, BJP उमेदवाराच्या कार्यालयावर गोळीबार
निवडणुकीपूर्वी अंबरनाथमध्ये थरार, BJP उमेदवाराच्या कार्यालयावर गोळीबार.
नाशिकचा कारभार, गोंधळ बेसुमार.... पालिका अधिकाऱ्यांना महाजनांनी झापलं
नाशिकचा कारभार, गोंधळ बेसुमार.... पालिका अधिकाऱ्यांना महाजनांनी झापलं.
दोन्ही राष्ट्रवादीचे नेते अमित शहांच्या भेटीला.. दिल्लीत राजकीय खलबतं!
दोन्ही राष्ट्रवादीचे नेते अमित शहांच्या भेटीला.. दिल्लीत राजकीय खलबतं!.
मुंबईत काँग्रेसशिवाय ठाकरे बंधूंची युती, 2 दिवसात काय होणार घोषणा?
मुंबईत काँग्रेसशिवाय ठाकरे बंधूंची युती, 2 दिवसात काय होणार घोषणा?.
विधानसभेत विरोधात, महापालिका निवडणुकीत NCP चे दोन्ही गट एकत्र येणार?
विधानसभेत विरोधात, महापालिका निवडणुकीत NCP चे दोन्ही गट एकत्र येणार?.