AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs AUS : धावांचा पाऊस की गोलंदाजांचा कहर? मानुका ओव्हलमधील खेळपट्टी कुणासाठी फायदेशीर? जाणून घ्या

India vs Australia 1st T20I : ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत यांच्यात मानुका ओव्हलमध्ये होणाऱ्या सामन्यावर पावसाचं सावट आहे. जाणून घ्या सामन्यादरम्यान हवामान कसं असेल.

IND vs AUS : धावांचा पाऊस की गोलंदाजांचा कहर? मानुका ओव्हलमधील खेळपट्टी कुणासाठी फायदेशीर? जाणून घ्या
Mitchell Marsh and Suryakumar YadavImage Credit source: Getty Images
| Updated on: Oct 28, 2025 | 6:14 PM
Share

ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया टी 20i सीरिजचं काउंटडाऊन सुरु झालं आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंडिया यांच्यात 5 टी 20i सामने होणार आहेत. या मालिकेला बुधवार 29 ऑक्टोबरपासून सुरुवात होत आहे. आशिया कप 2025 नंतर सूर्यकुमार यादव द्विपक्षीय मालिकेत नेतृत्व करण्यासाठी सज्ज आहे. उभयसंघातील पहिला सामना हा कॅनबेरातील मानुका ओव्हलमध्ये होणार आहे. या सामन्याची चाहत्यांना प्रचंड उत्सुकता आहे. मानुका ओव्हलमधील खेळपट्टी कुणासाठी फायदेशीर ठरणार? तसेच सामन्यादरम्यान पाऊस होण्याची किती शक्यता आहे? हे जाणून घेऊयात.

खेळपट्टी कशी असणार?

कॅनबेरातील मानुका ओव्हलमधील खेळपट्टी संथ राहिली आहे. ही खेळपट्टी मधल्या फळीतील फलंदाजांसाठी फायदेशीर ठरु शकते. त्यामुळे मिडल ऑर्डरमधील फलंदाजांकडून मोठ्या खेळीची अपेक्षा असणार आहे.

टीम इंडिया  5 वर्षांआधी विजयी

या मैदानात पहिल्या डावातील सरासरी धावसंख्या ही 150 इतकी आहे. त्यामुळे चाहत्यांना हायस्कोअरिंग मॅच पाहायला मिळण्याची शक्यता कमी आहे. या मैदानात भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात 5 वर्षांपूर्वी टी 20i सामना खेळवण्यात आला होता.  भारताने या मैदानात 5 वर्षांपूर्वी झालेल्या शेवटच्या सामन्यात ऑस्ट्रेलिया विरुद्ध विजय मिळवला होता. भारताने तेव्हा ऑस्ट्रेलीयासमोर 162 धावांचं आव्हान ठेवलं होतं. भारताने त्या सामन्यात कांगारुंना 150 धावांवर रोखत 11 रन्सने विजय मिळवला होता. तेव्हा फिरकीपटू युझवेंद्र चहल याने कडक बॉलिंग करत भारताच्या विजयात प्रमुख भूमिका बजावली होती.

खेळपट्टी फिरकीपटूंसाठी फायदेशीर!

फिरकी गोलंदाजांसाठी ही खेळपट्टी फायदेशीर ठरु शकते. या मैदानात डावखुऱ्या फिरकीपटूंनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. डावखुऱ्या फिरकीपटूंनी या मैदानात गेल्या 10 टी 20i सामन्यांमध्ये 20.30 च्या सरासरीने आणि 7.71 च्या इकॉनमीने 26 विकेट्स मिळवल्या आहेत.  त्यामुळे कुलदीप यादव याच्याकडून भारताला अनेक आशा असणार आहेत.

कॅनबेरातील हवामान कसं असेल?

कॅनबेरात आठवडाभर हवामान थंड असेल, असा अंदाज आहे. बुधवारी पाऊस होण्याची शक्यता आहे. मात्र काही वेळानंतर पाऊस थांबेल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे काही वेळ पावसामुळे वाया जाणार हे निश्चित आहे, असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. तसेच हा सामना ढगाळ वातावरणात हा सामना होऊ शकतो. त्यामुळे एकूणच स्थिती पाहता आता बुधवारी टीम इंडिया विजयी सलामी देणार की यजमान मैदान मारणार? याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.

Follow Us
अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
Anna Hazare | अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले आंदोलनाची जागा...
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर..
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर सुप्रीम कोर्टाचा सुनावणीला तात्काळ नकार
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलिसांने कानात काय सांगितलं?
152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त!
Rahul Gandhi | 152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त! राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात
तोंडातून रक्त येत होतं अन्,.. स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटके
तोंडातून रक्त येत होतं अन्... स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटकेवेळी नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार
Aashish Jaiswal | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार; म्हणाले थेट संबंध नाही...
ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी
Arvind Sawant | ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी अपडेट समोर
राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश...
Ameet Satam | राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश दौऱ्यांचा हिशेब द्या
मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी.

मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती.

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ.

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ

नागपुरात CJP च्या आंदोलकांची धरपकड, अनेकजण पोलिसांच्या ताब्यात; नेमकं काय घडलं?.

नागपुरात CJP च्या आंदोलकांची धरपकड, अनेकजण पोलिसांच्या ताब्यात; नेमकं काय घडलं?

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या.

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या

Commonwealth Games 2026 स्पर्धा 23 जुलैपासून, 74 देश रणांगणात; भारताचे 126 खेळाडू करणार स्पर्धा.

Commonwealth Games 2026 स्पर्धा 23 जुलैपासून, 74 देश रणांगणात; भारताचे 126 खेळाडू करणार स्पर्धा