AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs AUS: भारत-ऑस्ट्रेलिया टेस्ट सीरीजआधी महत्त्वाची बातमी, प्रमुख गोलंदाज बाहेर?

IND vs AUS: टीम इंडियावर भारी पडू शकणारा, खेळाडू पहिल्या कसोटीतून होऊ शकतो बाहेर.

IND vs AUS: भारत-ऑस्ट्रेलिया टेस्ट सीरीजआधी महत्त्वाची बातमी, प्रमुख गोलंदाज बाहेर?
Aus vs Sa 2nd testImage Credit source: Getty Images
| Updated on: Dec 29, 2022 | 6:31 PM
Share

IND vs AUS, 2023: ऑस्ट्रेलियाची मजबूत टीम फेब्रुवारी 2023 मध्ये हायप्रोफाइल टेस्ट सीरीज खेळण्यासाठी भारतात येणार आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्ध चार कसोटी सामन्यांच्या मालिकेतील तीन सामने जिंकणं भारतासाठी खूप महत्त्वाचं आहे. भारताला जून 2023 मध्ये इंग्लंडच्या भूमीवर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल खेळायची आहे. फायनलमध्ये क्वालिफाय करण्यासाठी टेस्ट सीरीजमधील चार पैकी तीन कसोटी सामने कुठल्याही परिस्थिती जिंकावेच लागतील.

हा ऑस्ट्रेलियाचा खतरनाक गोलंदाज

भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये पहिला कसोटी सामना 9 ते 13 फेब्रुवारी 2023 दरम्यान नागपूरमध्ये खेळला जाईल. या टेस्ट मॅचआधी एक महत्त्वाची बातमी येतेय. ऑस्ट्रेलियाचा खतरनाक गोलंदाज कदाचित भारताविरुद्ध पहिला कसोटी सामना खेळणार नाही. टीम इंडियावर हा गोलंदाज भारी पडू शकतो. मिशेल स्टार्क ऑस्ट्रेलियाच्या वेगवान गोलंदाजीची धुरा वाहतो. त्याच्या बोटाला दुखापत झालीय. तो काही महिन्यांसाठी ऑस्ट्रेलियन टीमबाहेर जाऊ शकतो.

टीम इंडियावर भारी पडणारा गोलंदाज बाहेर

मिशेल स्टार्कच्या बोटाला दुखापत झाली. त्याच्यासाठी सर्जरीची आवश्यकता भासणार नाही. 9 फेब्रुवारी 2023 पासून सुरु होणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्यात तो कदाचित खेळणार नाही. “पुढचा भारताचा मोठा दौरा आहे. मी या हाताने गोलंदाजी करतो. त्यामुळे मला बरच सर्तक रहाव लागेल. दुखापत लवकर बरी व्हावी, यासाठी मला काळजी घ्यावी लागेल” असं स्टार्क म्हणाला. दुखापत असूनही टाकल्या 18 ओव्हर्स

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दुसऱ्या डावात मिशेल स्टार्कने दुखापत असूनही 18 ओव्हर्स गोलंदाजी केली. सलामीवीर सेरेल इर्वीची विकेट काढली. “मला चेंडूवर नियंत्रण ठेवण्यासाठी मधल्या बोटाची सर्वात जास्त आवश्यकता असते. वेदना कमी करण्यासाठी पेन किलर गोळ्या खाल्ल्यात. मी याआधी सुद्धा पायाला दुखापत असताना खेळलोय. हे टेस्ट क्रिकेट आहे” असं मिशेल स्टार्क म्हणाला.

चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला....
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर.
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.