
आयसीसी वनडे वुमन्स वर्ल्ड कप 2025 स्पर्धेतील 13 व्या सामन्यात रविवारी 12 ऑक्टोबरला टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया आमनेसामने होते. दोन्ही संघांचा हा या मोहिमेतील चौथा सामना होता. ऑस्ट्रेलिया या सामन्यात टीम इंडियाचा पराभव करत विजयी घोडदौड कायम राखली. भारताने विजयासाठी दिलेलं 331 धावांचं आव्हान ऑस्ट्रेलियाने 1 ओव्हरआधी 7 विके्टस गमावून पूर्ण केलं. ऑस्ट्रेलियाच्या या विजयात कॅप्टन एलिसा हिली हीने प्रमुख भूमिका बजावली. एलिसाने सर्वाधिक 142 धावा करत ऑस्ट्रेलियाच्या विजयाचा पाया रचला. तर इतर फलंदाजांनीही योगदान देत आपल्या संघाला सलग तिसरा विजय मिळवूून देण्यात हातभार लावला. ऑस्ट्रेलियाने या विजयासह इतिहास घडवला. ऑस्ट्रेलियाने श्रीलंकेचा 302 धावांचा यशस्वी विजयी धावांचा पाठलाग करण्याचा विश्व विक्रम मोडीत काढला. श्रीलंकेने 302 धावांचा यशस्वी पाठलाग केला होता.
ऑस्ट्रेलियाने टीम इंडिया विरुद्ध ऐतिहासिक विजय मिळवला आहे. ऑस्ट्रेलियाने टीम इंडिया विरुद्ध 331 धावांचा यशस्वी पाठलाग करत आयसीसी वूमन्स वर्ल्ड कप 2025 स्पर्धेत सलग आणि एकूण तिसरा विजय साकारला आहे. कॅप्टन एलिसा हीली या विजयाची नायिका ठरली. हीलीने सर्वाधिक 142 धावांची खेळी केली.
ऑस्ट्रेलियाने 331 रन्सचा पाठलाग करताना 48 ओव्हरमध्ये 7 विकेट्स गमावून 318 रन्स केल्या आहेत. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला विजयासाठ आता 12 बॉलमध्ये 13 धावांची गरज आहे.
अमनजोत कौर हीने सोफी मोलिनेक्स हीला एलबीडब्ल्यू आऊट करत ऑस्ट्रेलियाला सातवा झटका दिला आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियाचा स्कोअर 45.1 ओव्हरनंतर 7 आऊट 303 असा झाला आहे.
टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाला सहावा झटका दिला आहे. अमनजोत कौर हीने एश्ले गार्डनर हीला क्लिन बोल्ड केलं. गार्डनरने 46 बॉलमध्ये 45 रन्स केल्या.
टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामना रंगतदार स्थितीत पोहचला आहे. ऑस्ट्रेलियाला 331 रन्सचा पाठलाग करताना शेवटच्या 48 बॉलमध्ये 48 रन्सची गरज आहे. तर टीम इंडियाला विजयासाठी 5 विकेट्सची गरज आहे. त्यामुळे दोन्ही संघात 1-1 धाव आणि विकेटसाठी चढाओढ सुरु आहे.
टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाला पाचवा झटका दिला आहे. दीप्ती शर्मा हीने ताहिला मॅकग्रा हीला एलबीडब्ल्यू आऊट केलं. ताहिलाने 12 रन्स केल्या. ताहिला आऊट झाल्याने ऑस्ट्रेलियाचा स्कोअर 40.4 ओव्हरनंतर 5 आऊट 279 असा झाला आहे.
स्नेह राणा हीने ऑस्ट्रेलियाच्या डावातील 39 व्या ओव्हरमधील पाचव्या बॉलवर कॅप्टन एलिसा हीली हीचा अप्रतिम कॅच घेतला आहे. श्री चरणी हीच्या बॉलिंगवर हीलीने फटका मारला. मात्र स्नेह राणाने जबरदस्त कॅच घेत एलिसाला मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. एलिसाने 107 बॉलमध्ये 142 रन्स केल्या. अशाप्रकारे ऑस्ट्रेलियाने चौथी विकेट गमावली.
ऑस्ट्रेलियाची टीम इंडिया विरुद्धच्या सामन्यात विजयाच्या दिशेने वाटचाल सुरु आहे. ऑस्ट्रेलियाने 331 रन्सचा पाठलाग करताना 38 ओव्हरपर्यंत 3 विकेट्स गमावून 258 रन्स केल्या आहेत.
ऑस्ट्रेलियाने 34 ओव्हरमध्ये 3 विकेट्स गमावून 226 रन्स केल्या आहेत. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 96 बॉलमध्ये आणखी 105 रन्सची गरज आहे. एश्ले गार्डनर 24 आणि कॅप्टन हीली 121 रन्सवर नॉट आऊट खेळत आहे. त्यामुळे टीम इंडियाला हा सामना जिंकायचा असेल तर इथून झटपट 2 विकेट्स गरजेच्या आहेत.
ऑस्ट्रेिलियाची कॅप्टन एलिसा हीली हीने शतक ठोकलं आहे. एलिसाने अवघ्या 84 चेंडूत शतक झळकावलं आहे. एलिसाने शतकानंतर फोर आणि सिक्स लगावत 10 धावा जोडल्या. ऑस्ट्रेलियाच्या यासह 31 ओव्हरनंतर 200 धावा पूर्ण झाल्या आहेत.
श्री चरणी हीने Annabel Sutherland हीला 28 व्या ओव्हरमधील पहिल्याच बॉलवर क्लिन बोल्ड केलंय. चरणीने ऑस्ट्रेलियाच्या बॅट्समनला भोपळाही फोडून दिला नाही. भारताने यासह सामन्यात काही प्रमाणात कमबॅक केलंय.
दीप्ती शर्मा हीने अखेर ऑस्ट्रेलियाला दुसरा झटका देत टीम इंडियाच्या विकेटची प्रतिक्षा संपवली आहे. दीप्ती शर्मा हीने बेथ मुनी हीला 4 धावांवर कॅच आऊट केलं. जेमिमाहने दीप्ती शर्मा हीच्या बॉलिंगवर मुनीचा हवेत झेपावत अप्रतिम कॅच घेतला. त्यामुळे ऑस्ट्रेलियाचा स्कोअर आता 28.2 ओव्हरनंतर 2 आऊट 168 असा झाला आहे.
ऑस्ट्रेलियाची फलंदाज एलिस पेरी हीने मैदान सोडलं आहे. एलिस पेरी रिटायर्ड हर्ट होऊन मैदानाबाहेर गेली आहे. एलिसनंतर बेथ मुनी मैदानात आली आहे. एलिसने 40 बॉलमध्ये 32 रन्स केल्या.
ऑस्ट्रेलियाने 21 ओव्हरनंतर 1 विकेट गमावून 141 धावा केल्या आहेत. एलिसा पेरी आणि एलीस हीली ही जोडी खेळत आहे. पेरी 30 आणि हीली 70 धावांवर नाबाद आहे. ऑस्ट्रेलियाच्या या जोडीने घट्ट पाय रोवले आहेत. त्यामुळे टीम इंडियाला ही जोडी फोडायची नितांत गरज आहे. भारताला दुसरी विकेट कोण मिळवून देणार? याकडे आता चाहत्यांचं लक्ष आहे.
ऑस्ट्रेलियाने 14 ओव्हरनंतर 1 विकेट गमावून 97 रन्स केल्या आहेत. कॅप्टन एलीसा हीलीने अर्धशतक पूर्ण केलं आहे. हीलीने 35 बॉलमध्ये अर्धशतक पूर्ण केलं. तसेच एलीसासह एलिस पेरी खेळत आहे. पेरीने 10 चेंडत नाबाद 6 धावा केल्या आहेत.
टीम इंडियाने अखेर ऑस्ट्रेलियाची सलामी जोडी फोडली आहे. श्री चरणी हीने ऑस्टेलियाला डावातील 12 व्या ओव्हरमध्ये पहिला झटका दिला आहे. चरणीने फोबी लिचफिल्ड हीला स्नेह राणा हीच्या हाती कॅच आऊट केलं. लिचफिल्ड हीने 39 बॉलमध्ये 40 रन्स केल्या.
ऑस्ट्रेलियाच्या सलामी जोडीने घट्ट पाय रोवले आहेत. एलिसा हीली आणि फोबी लिचफिल्ड या जोडीने 9 ओव्हरमध्ये बिनबाद 65 रन्स केल्या आहेत. लिचफिल्ड 22 आणि फोबी 42 रन्सवर नॉट आहे.
ऑस्ट्रेलियाने 331 धावांचा पाठलाग करताना पहिल्या 5 ओव्हरमध्ये 25 रन्स केल्या आहेत. एलिसा हीली 13 तर फोबी लिचफिल्ड 12 रन्सवर नॉट आऊट खेळत आहेत. भारतीय गोलंदाजांना विकेट घेण्यात अजून यश आलेलं नाही. मात्र त्यांनी कांगारुंच्या सलामी जोडीला बांधून ठेवलं आहे.
ऑस्ट्रेलियाच्या बॅटिंगला सुरुवात झाली आहे. ऑस्ट्रेलियाकडून कॅप्टन एलिसा हीली आणि फोबी लिचफिल्ड ही सलामी जोडी मैदानात आली आहे. टीम इंडियाने ऑस्ट्रेलियासमोर 331 रन्सचं टार्गेट ठेवलं आहे.
अनाबेल सदरलँड हीने श्री चरणी हीला क्लिन बोल्ड केलं. यासह भारताचा डाव 50 ओव्हरआधीच आटोपला. ऑस्ट्रेलियाने भारताला 48.5 ओव्हरमध्ये 330 रन्सवर ऑलआऊट केलं. टीम इंडियाकडून स्मृती मंधाना आणि प्रतिका रावल या सलामी जोडीने सर्वाधिक धावा केल्या. तर इतरांनीही आपलं योगदान दिलं. त्यामुळे भारताला 300 पार पोहचता आलं. ऑस्ट्रेलियासाठी अनाबेल सदरलँड हीने सर्वाधिक 5 विकेट्स मिळवल्या.
टीम इंडियाने 43.3 ओव्हरमध्ये 300 धावा पूर्ण केल्या आहेत. भारताची वनडे वूमन्स वर्ल्ड कप स्पर्धेत ऑस्ट्रेलिया विरुद्धची ही सर्वोच्च धावसंख्या ठरली आहे. आता टीम इंडिया उर्वरित 39 बॉलमध्ये किती रन्स करणार? याकडे लक्ष असणार आहे.
ऑस्ट्रेलियाने भारताला पाचवा झटका दिला आहे. भारताने रिचा घोष हीच्या रुपात पाचवी विकेट गमावली. रिचाने 22 बॉलमध्ये 32 रन्स केल्या. रिचा आऊट झाल्याने भारताचा स्कोअर 43 ओव्हरनंतर 5 आऊट 293 असा झाला आहे.
जेमीमाह रॉड्रिग्ज आणि रिचा घोष या जोडीने पाचव्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली आहे. दोघींनी अवघ्या 30 बॉलमध्ये ही अर्धशतकी भागीदारी केली.
ऑस्ट्रेलियाने भारताला चौथा झटका देत सामन्यात कमबॅक केलं आहे. प्रतिका रावल आणि स्मृती मंधाना या सलामी जोडीने भारताला 155 धावांची भागीदारी करुन दिली. त्यानंतर स्मृती आणि प्रतिका या दोघांनी ठराविक अंतराने आऊट झाल्या. त्यानंतर ऑस्ट्रेलियाने भारताला झटपट 2 झटके दिले. हरमनप्रीत कौर आऊट झाल्यानंतर ऑस्ट्रेलियाने हर्लिन देओल हीला 38 रन्सवर आऊट केलं. त्यामुळे भारताचा स्कोअर 37.2 ओव्हरमध्ये 4 आऊट 240 असा झाला आहे.
ऑस्ट्रेलियाने भारताला तिसरा आणि मोठा झटका दिला आहे. कॅप्टन हरमनप्रीत कौर आऊट झाली आहे. कौरने 17 बॉलमध्ये 22 रन्स केल्या. हरमन आऊट झाल्याने टीम इंडियाचा स्कोअर 36.3 ओव्हरनंतर 3 आऊट 234 असा झाला आहे.
स्मृती मंधाना आणि प्रतिका रावल या सलामी जोडीने भारतासाठी 155 धावांची भागीदारी केली. मात्र त्यानंतर दोघी ठराविक अंतराने बाद झाल्या. मात्र यानंतर कॅप्टन हरमनप्रीत कौर आणि हर्लिन देओल ही जोडी सेट झाली आहे. भारताच्या 34 ओव्हरनंतर 2 आऊट 218 धावा झाल्या आहेत. हरमन 10 आणि हर्लिन 34 रन्सवर नॉट आऊट खेळत आहे.
ऑस्ट्रेलियाने भारताला दुसरा झटका दिला आहे. स्मृती मंधाना हीच्यानंतर प्रतिका रावल आऊट झाली आहे. प्रतिकाने 96 बॉलमध्ये 75 रन्स केल्या. प्रतिका आऊट झाल्यानंतर हर्लीनची साथ देण्यासाठी कॅप्टन हरमनप्रीत कौर मैदानात आली आहे.
स्मृती आऊट झाल्यानंतर प्रतिका रावल हीची साथ देण्यासाठी हर्लीन देओल मैदानात आली. प्रतिका आणि हर्लिन या जोडीने ऑस्ट्रेलियाची धुलाई सुरुच ठेवली आहे. भारताने 30 ओव्हरमध्ये 1 विकेट गमावून 192 रन्स केल्या आहेत. प्रतिका 75 आणि हर्लिन 20 धावांवर नाबाद खेळत आहे.
ऑस्ट्रेलियाला अखेर पहिली विकेट मिळाली. ऑस्ट्रेलियाने भारताची स्मृती मंधाना आणि प्रतिका रावल ही सलामी जोडी फोडली आहे. स्मृती मंधाना हीच्या रुपात भारताने पहिली विकेट गमावली. स्मृती मंधानाने चाबूक खेळी केली. स्मृतीने 66 बॉलमध्ये 80 रन्स केल्या. स्मृती आणि प्रतिका या सलामी जोडीने 24.3 ओव्हरमध्ये 155 रन्सची ओपनिंग पार्टनरशीप केली.
स्मृती मंधाना हीच्यानंतर प्रतिका रावलनेही अर्धशतक झळकावलं आहे. या सलामी जोडीने भारताला चांगली सुरुवात करुन दिली आहे. या दोघींनी नाबाद शतकी भागीदारी केली आहे. त्यामुळे आता या दोघींकडून चाहत्यांना शतकी खेळीची आशा आहे.
स्मृती मंधाना हीने 19 व्या ओव्हरमध्ये अर्धशतक पूर्ण केलं. तसेच भारताच्या स्मृती मंधाना आणि प्रतिका रावल या जोडीने याच ओव्हरमध्ये शतकी भागीदारीही पूर्ण केली. भारताने 19 ओव्हरमध्ये 105 रन्स केल्या. प्रतिका 46 तर स्मृती 55 रन्सवर नॉट आऊट आहे.
प्रतिका रावल आणि स्मृती मंधाना या सलामी जोडीने टीम इंडियाला ऑस्ट्रेलिया विरुद्ध चाबूक सुरुवात करुन दिली आहे. या सलामी जोडीने 16 ओव्हरमध्ये 5 पेक्षा अधिकच्या रनरेटने बिनबाद 82 रन्स केल्या आहेत.
प्रतिका रावल आणि स्मृती मंधाना या भारतीय सलामी जोडीने ऑस्ट्रेलिया विरुद्ध अर्धशतकी भागीदारी केली आहे. या जोडीची एकदिवसीय क्रिकेटमध्ये अर्धशतकी भागीदारी करण्याची ही 21 वी वेळ ठरली आहे.
प्रतिका रावल आणि स्मृती मंधाना या भारताच्या सलामी जोडीने ऑस्ट्रेलिया विरुद्ध संयमी सुरुवात केली आहे. या जोडीने 7 ओव्हरमध्ये 26 रन्स केल्या आहेत. स्मृती 11 आणि प्रतिका 15 धावांवर नाबाद आहे.
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामन्याला सुरुवात झाली आहे. ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकून भारताला बॅटिंगसाठी भाग पाडलं आहे. टीम इंडियाकडून प्रतिका रावल आणि स्मृती मंधाना ही सलामी जोडी मैदानात आली आहे. दोन्ही संघांचा हा या स्पर्धेतील चौथा सामना आहे.
ऑस्ट्रेलिया प्लेइंग ईलेव्हन : एलिसा हिली (कॅप्टन आणि विकेटकीपर), फोबी लिचफिल्ड, एलिस पेरी, बेथ मूनी, अॅनाबेल सदरलँड, अॅशले गार्डनर, ताहलिया मॅकग्रा, सोफी मोलिनेक्स, किम गार्थ, अलाना किंग आणि मेगन शट.
टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन : प्रतिका रावल, स्मृती मंधाना, हरलीन देओल, हरमनप्रीत कौर (कॅप्टन), जेमिमाह रॉड्रिग्स, रिचा घोष (विकेटकीपर), दीप्ती शर्मा, अमनजोत कौर, स्नेह राणा, क्रांती गौड आणि श्री चरणी.
ऑस्ट्रेलिया वूमन्स टीमच्या बाजूने नाणेेफेकीचा कौल लागला आहे. कॅप्टन एलिसा हीली हीने बॉलिंगचा निर्णय घेतला आहे. ऑस्ट्रेलियाने भारताला बॅटिंगसाठी भाग पाडलं आहे. त्यामुळे आता भारतीय संघ किती धावा करते? याकडे चाहत्यांचं लक्ष असणार आहे.
टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया दोन्ही संघ आयसीसी वनडे वुमन्स वर्ल्ड कप स्पर्धेच्या इतिहासात एकूण 13 वेळा भिडले आहेत. ऑस्ट्रेलियाने या 13 पैकी सर्वाधिक सामने जिंकले आहेत. ऑस्ट्रेलियाने भारताला 10 सामन्यांमध्ये पराभूत केलं आहे. तर भारताला फक्त 3 सामनेच जिंकता आला आहेत. त्यामुळे भारतीय संघासमोर ही आकडेवारी सुधारण्याचं आव्हान असणार आहे.
टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहायला मिळेल. तर लाईव्ह मॅच जिओहॉटस्टार एपद्वारे मोबाईल आणि लॅपटॉपवर पाहता येईल.
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामन्याला दुपारी 3 वाजता सुरुवात होणार आहे. तर 2 वाजून 30 मिनिटांनी टॉस होणार आहे.
ऑस्ट्रेलियाची संभाव्य प्लेइंग ईलेव्हन : एलिसा हीली (कर्णधार आणि विकेटकीपर), फोबी लिचफिल्ड, एलिस पेरी, बेथ मूनी, अॅनाबेल सदरलँड, अॅशले गार्डनर, ताहलिया मॅकग्रा, सोफी मोलिनेक्स, किम गार्थ, अलाना किंग आणि मेगन शट.
टीम इंडियाची संभाव्य प्लेइंग ईलेव्हन : स्मृती मंधाना, प्रतिका रावल, हरलीन देओल, हरमनप्रीत कौर (कर्णधार), जेमिमाह रॉड्रिग्स, दीप्ती शर्मा, रिचा घोष (विकेटकीपर), अमनजोत कौर, स्नेह राणा, श्रीचरणी/राधा यादव आणि रेणुका ठाकुर.
ऑस्ट्रेलिया वूमन्स टीम : एलिसा हीली (कॅप्टन), फोबी लिचफिल्ड, एलिस पेरी, बेथ मूनी, अॅनाबेल सदरलँड, अॅशले गार्डनर, ताहलिया मॅकग्रा, जॉर्जिया वेअरहॅम, किम गार्थ, अलाना किंग, मेगन शट, हीदर ग्राहम, सोफी मोलिनेक्स, डार्सी ब्राउन आणि जॉर्जिया वोल.
वूमन्स टीम इंडिया: प्रतीका रावल, स्मृती मानधना, हरलीन देओल, हरमनप्रीत कौर (कर्णधार), जेमिमा रॉड्रिग्ज, दीप्ती शर्मा, अमनजोत कौर, रिचा घोष (विकेटकीपर), स्नेह राणा, क्रांती गौड, श्री चरणी, राधा यादव, अरुंधती रेड्डी, रेणुका सिंग ठाकुर आणि उमा छेत्री.
टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया दोन्ही संघ या मोहिमेतील तिसऱ्या विजयासाठी आमनेसामने आहेत. हा सामना विशाखापट्टणममध्ये आयोजित करण्यात आला आहे. ऑस्ट्रेलिया या स्पर्धेत अजिंक्य आहे. तर भारताला गेल्या सामन्यात पराभूत व्हावं लागलंय. त्यामुळे भारतासमोर कांगारुंना पराभूत करुन विजयी ट्रॅकवर परतण्याचं आव्हान आहे.