IND vs AUS : टीम इंडियाचा ऑस्ट्रेलिया विरुद्ध वर्ल्ड रेकॉर्ड, कांगारुंसमोर 331 रन्सचं टार्गेट, कोण जिंकणार?
India Women vs Australia Women 1st Inning Highlights : भारतीय महिला संघाने ऑस्ट्रेलिया विरुद्ध इतिहास घडवला. प्रतिका रावल आणि स्मृती मंधाना या जोडीने केलेल्या दीडशतकी भागीदारीच्या जोरावर भारताने 330 धावांपर्यंत मजल मारली आणि वर्ल्ड रेकॉर्ड केला.

वूमन्स टीम इंडियाने आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2025 स्पर्धेतील 13 व्या सामन्यात गतविजेत्या ऑस्ट्रेलिया विरुद्ध 300 पार मजल मारून वर्ल्ड रेकॉर्ड केला आहे. टीम इंडियाने ऑस्ट्रेलियासमोर 331 रन्सचं टार्गेट ठेवलं आहे. प्रतिका रावल आणि स्मृती मंधाना या सलामी जोडीने दीडशतकी भागीदारी केली. तसेच मुख्य फलंदाजांनीही दुहेरी आकड्यात धावा केल्या. मात्र त्यानंतरही भारताला पूर्ण 50 ओव्हर खेळता आलं नाही. ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाला 7 चेंडूआधी ऑलआऊट केलं. ऑस्ट्रेलियाने भारताला 48.5 ओव्हरमध्ये 330 रन्सवर रोखलं. ऑस्ट्रेलियासाठी अनाबेल सदरलँड हीने सर्वाधिक 5 विकेट्स घेतल्या.
टीम इंडियाची कडक सुरुवात
ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाला टॉस जिंकून बॅटिंगला बोलावलं. भारताच्या सलामी जोडीने या संधीचा चांगलाच फायदा घेतला. प्रतिका रावल आणि स्मृती मंधाना या सलामी जोडीने 155 धावांची भागीदारी केली. भारताने स्मृतीच्या रुपात पहिली विकेट गमावली. स्मृतीला शतक करण्याची संधी होती. मात्र स्मृती 20 धावांआधी बाद झाली. स्मृतीने 66 बॉलमध्ये 80 रन्स केल्या.
त्यानंतर ऑस्ट्रेलियाने ठराविक अंतराने 3 झटके दिले. प्रतिका रावल शतकापर्यंत पोहचण्यात अपयशी ठरली. प्रतिकाने 75 धावा केल्या. कॅप्टन हरमनप्रीत कौर हीने 22 धावा जोडल्या. तर हर्लीन देओल हीने 38 रन्स केल्या. मात्र त्यानंतर जेमिमाह रॉड्रिग्स आणि ऋचा घोष या जोडीने पाचव्या विकेटसाठी निर्णायक अर्धशतकी भागीदारी केली.
जेमिमाह आणि ऋचा या जोडीने पाचव्या विकेटसाठी 54 रन्स केल्या. त्यानंतर ऋचा फटकेबाजीच्या प्रयत्नात आऊट झाली. ऋचाने 3 फोर आणि 2 सिक्ससह 32 रन्स केल्या. ऑस्ट्रेलियाने इथून टीम इंडियाला झटपट झटके देत 50 ओव्हरआधीच गुंडाळलं.
जेमिमाह रॉडिग्सने 33 रन्स केल्या. अमनजोत कौरने 16 धावांचं योगदान दिलं. दीप्ती शर्मा आणि क्रांती गौड या दोघींनी प्रत्येकी 1-1 धाव केली. श्री चरणी आऊट होताच भारताचा डाव आटोपला. स्नेह राणा 8 रन्सवर नॉट आऊट राहिली. ऑस्ट्रेलियासाठी अनाबेल व्यतिरिक्त सोफी मोलिनेक्स हीने सर्वाधिक3 विकेट्स घेतल्या. तर मेगन शूट आणि एश्ले गार्डनर या दोघींनी प्रत्येकी 1-1 विकेट मिळवली.
टीम इंडिया कांगारुंना सलग तिसऱ्या विजयापासून रोखणार?
𝙄𝙣𝙣𝙞𝙣𝙜𝙨 𝘽𝙧𝙚𝙖𝙠! #TeamIndia post a formidable 330 on the board! 💪
8️⃣0️⃣ for vice-captain Smriti Mandhana 7️⃣5️⃣ for Pratika Rawal Crucial 3️⃣0️⃣s from Harleen Deol, Richa Ghosh & Jemimah Rodrigues
Over to our bowlers now. 👍
Scorecard ▶ https://t.co/VP5FlL2S6Y… pic.twitter.com/KOpyOAfjjT
— BCCI Women (@BCCIWomen) October 12, 2025
टीम इंडियाचा वर्ल्ड रेकॉर्ड
भारत ऑस्ट्रेलिया विरुद्ध 2 वेळा 300 धावा करणारा पहिला संघ ठरला आहे. तसेच टीम इंडियाची वूमन्स वर्ल्ड कप स्पर्धेच्या इतिहासात 330 ही सर्वोच्च धावसंख्या ठरली. टीम इंडियाने यासह आपलाच रेकॉर्ड ब्रेक केला आहे. महिला ब्रिगेडने याआधी 2022 च्या वर्ल्ड कप स्पर्धेत विंडीज विरुद्ध 8 विकेट्स गमावून 317 रन्स केल्या होत्या. तसेच 2013 साली विंडीज विरुद्धच 6 विकेट्स गमावून 284 रन्सपर्यंत मजल मारली होती.
