AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs AUS Womens WC Score and Updates : ऑस्ट्रेलियाचा ऐतिहासिक विजय, टीम इंडिया विरुद्ध 331 धावांचा यशस्वी पाठलाग

| Updated on: Oct 13, 2025 | 1:49 AM
Share

IND vs AUS, Women's World Cup 2025 Score and Highlights Updates: रविवारी 12 ऑक्टोबरला गतविजेत्या ऑस्ट्रेलियाने इतिहास घडवला. ऑस्ट्रेलियाने टीम इंडिया विरुद्ध 331 धावांचा यशस्वी पाठलाग केला. ऑस्ट्रेलियाने यासह श्रीलंकेचा 302 रन्स चेज करण्याचा वर्ल्ड रेकॉर्ड ब्रेक केला.

IND vs AUS Womens WC Score and Updates : ऑस्ट्रेलियाचा ऐतिहासिक विजय, टीम इंडिया विरुद्ध 331 धावांचा यशस्वी पाठलाग
IND vs AUS Womens WC 2025 Live UpdatesImage Credit source: Tv9

आयसीसी वनडे वुमन्स वर्ल्ड कप 2025 स्पर्धेतील 13 व्या सामन्यात रविवारी 12 ऑक्टोबरला टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया आमनेसामने होते. दोन्ही संघांचा हा या मोहिमेतील चौथा सामना होता. ऑस्ट्रेलिया या सामन्यात टीम इंडियाचा पराभव करत विजयी घोडदौड कायम राखली. भारताने विजयासाठी दिलेलं 331 धावांचं आव्हान ऑस्ट्रेलियाने 1 ओव्हरआधी 7 विके्टस गमावून पूर्ण केलं. ऑस्ट्रेलियाच्या या विजयात कॅप्टन एलिसा हिली हीने प्रमुख भूमिका बजावली. एलिसाने सर्वाधिक 142 धावा करत ऑस्ट्रेलियाच्या विजयाचा पाया रचला. तर इतर फलंदाजांनीही योगदान देत आपल्या संघाला सलग तिसरा विजय मिळवूून देण्यात हातभार लावला. ऑस्ट्रेलियाने या विजयासह इतिहास घडवला. ऑस्ट्रेलियाने श्रीलंकेचा 302 धावांचा यशस्वी विजयी धावांचा पाठलाग करण्याचा विश्व विक्रम मोडीत काढला. श्रीलंकेने 302 धावांचा यशस्वी पाठलाग केला होता.

LIVE Cricket Score & Updates

The liveblog has ended.
  • 12 Oct 2025 10:31 PM (IST)

    IND vs AUS Live Updates : ऑस्ट्रेलियाचा ऐतिहासिक विजय, टीम इंडिया विरुद्ध 331 धावांचा यशस्वी पाठलाग

    ऑस्ट्रेलियाने टीम इंडिया विरुद्ध ऐतिहासिक विजय मिळवला आहे. ऑस्ट्रेलियाने टीम इंडिया विरुद्ध 331 धावांचा यशस्वी पाठलाग करत आयसीसी वूमन्स वर्ल्ड कप 2025 स्पर्धेत सलग आणि एकूण तिसरा विजय साकारला आहे. कॅप्टन एलिसा हीली या विजयाची नायिका ठरली. हीलीने सर्वाधिक 142 धावांची खेळी केली.

  • 12 Oct 2025 10:26 PM (IST)

    IND vs AUS Live Updates : ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 12 बॉलमध्ये 13 धावांची गरज

    ऑस्ट्रेलियाने 331 रन्सचा पाठलाग करताना 48 ओव्हरमध्ये 7 विकेट्स गमावून 318 रन्स केल्या आहेत. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला विजयासाठ आता 12 बॉलमध्ये 13 धावांची गरज आहे.

  • 12 Oct 2025 10:16 PM (IST)

    IND vs AUS Live Updates : ऑस्ट्रेलियाला सातवा झटका, टीम इंडियाचं कडक कमबॅक

    अमनजोत कौर हीने सोफी मोलिनेक्स हीला एलबीडब्ल्यू आऊट करत ऑस्ट्रेलियाला सातवा झटका दिला आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियाचा स्कोअर 45.1 ओव्हरनंतर 7 आऊट 303 असा झाला आहे.

  • 12 Oct 2025 10:09 PM (IST)

    IND vs AUS Live Updates : ऑस्ट्रेलियाला सहावा झटका, सामना रंगतदार स्थितीत

    टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाला सहावा झटका दिला आहे. अमनजोत कौर हीने एश्ले गार्डनर हीला क्लिन बोल्ड केलं. गार्डनरने 46 बॉलमध्ये 45 रन्स केल्या.

  • 12 Oct 2025 10:01 PM (IST)

    IND vs AUS Live Updates : 1-1 धाव आणि विकेटसाठी लढाई, सामना रंगतदार स्थितीत, कोण जिंकणार?

    टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामना रंगतदार स्थितीत पोहचला आहे. ऑस्ट्रेलियाला 331 रन्सचा पाठलाग करताना शेवटच्या 48 बॉलमध्ये 48 रन्सची गरज आहे. तर टीम इंडियाला विजयासाठी 5 विकेट्सची गरज आहे. त्यामुळे दोन्ही संघात 1-1 धाव आणि विकेटसाठी चढाओढ सुरु आहे.

  • 12 Oct 2025 09:55 PM (IST)

    IND vs AUS Live Updates : ऑस्ट्रेलियाला पाचवा झटका, ताहिला मॅकग्रा आऊट, टीम इंडिया जिंकेल?

    टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाला पाचवा झटका दिला आहे. दीप्ती शर्मा हीने ताहिला मॅकग्रा हीला एलबीडब्ल्यू आऊट केलं. ताहिलाने 12 रन्स केल्या. ताहिला आऊट झाल्याने ऑस्ट्रेलियाचा स्कोअर 40.4 ओव्हरनंतर 5 आऊट 279 असा झाला आहे.

  • 12 Oct 2025 09:46 PM (IST)

    IND vs AUS Live Updates : ऑस्ट्रेलियाला मोठा झटका, स्नेह राणाचा जबरदस्त कॅच, कॅप्टन एलिसा हीली 142 रन्सवर आऊट

    स्नेह राणा हीने ऑस्ट्रेलियाच्या डावातील 39 व्या ओव्हरमधील पाचव्या बॉलवर कॅप्टन एलिसा हीली हीचा अप्रतिम कॅच घेतला आहे. श्री चरणी हीच्या बॉलिंगवर हीलीने फटका मारला. मात्र स्नेह राणाने जबरदस्त कॅच  घेत एलिसाला मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. एलिसाने 107 बॉलमध्ये 142 रन्स केल्या. अशाप्रकारे ऑस्ट्रेलियाने चौथी विकेट गमावली.

  • 12 Oct 2025 09:41 PM (IST)

    IND vs AUS Live Updates : टीम इंडिया पराभवाच्या छायेत, ऑस्ट्रेलिया विजयी हॅटट्रिकच्या दिशेने

    ऑस्ट्रेलियाची टीम इंडिया विरुद्धच्या सामन्यात विजयाच्या दिशेने वाटचाल सुरु आहे. ऑस्ट्रेलियाने 331 रन्सचा पाठलाग करताना 38 ओव्हरपर्यंत  3 विकेट्स गमावून 258 रन्स केल्या आहेत.

  • 12 Oct 2025 09:22 PM (IST)

    IND vs AUS Live Updates : ऑस्ट्रेलिया विजयाच्या दिशेने, 96 बॉलमध्ये 105 रन्सची गरज, टीम इंडिया रोखणार का?

    ऑस्ट्रेलियाने 34 ओव्हरमध्ये 3 विकेट्स गमावून 226 रन्स केल्या आहेत. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 96 बॉलमध्ये आणखी 105 रन्सची गरज आहे. एश्ले गार्डनर 24 आणि कॅप्टन हीली 121 रन्सवर नॉट आऊट खेळत आहे. त्यामुळे टीम इंडियाला हा सामना जिंकायचा असेल तर इथून झटपट 2 विकेट्स गरजेच्या आहेत.

  • 12 Oct 2025 09:04 PM (IST)

    IND vs AUS Live Updates : कॅप्टन एलिसा हीलीचं शतक, ऑस्ट्रेलियाच्या 200 धावा पूर्ण

    ऑस्ट्रेिलियाची कॅप्टन एलिसा हीली हीने शतक ठोकलं आहे. एलिसाने अवघ्या 84 चेंडूत शतक झळकावलं आहे. एलिसाने शतकानंतर फोर आणि सिक्स लगावत 10 धावा जोडल्या. ऑस्ट्रेलियाच्या यासह 31 ओव्हरनंतर 200 धावा पूर्ण झाल्या आहेत.

  • 12 Oct 2025 08:51 PM (IST)

    IND vs AUS Live Updates : ऑस्ट्रेलियाला तिसरा झटका, Annabel Sutherland डक, कांगारुंना तिसरा झटका

    श्री चरणी हीने Annabel Sutherland हीला 28 व्या ओव्हरमधील पहिल्याच बॉलवर क्लिन बोल्ड केलंय. चरणीने ऑस्ट्रेलियाच्या बॅट्समनला भोपळाही फोडून दिला नाही. भारताने यासह सामन्यात काही प्रमाणात कमबॅक केलंय.

  • 12 Oct 2025 08:46 PM (IST)

    IND vs AUS Live Updates : ऑस्ट्रेलियाला दुसरा झटका, जेमिमाहचा कडक कॅच, बेथ मुनी आऊट

    दीप्ती शर्मा हीने अखेर ऑस्ट्रेलियाला दुसरा झटका देत टीम इंडियाच्या विकेटची प्रतिक्षा संपवली आहे. दीप्ती शर्मा हीने बेथ मुनी हीला 4 धावांवर कॅच आऊट केलं. जेमिमाहने दीप्ती शर्मा हीच्या बॉलिंगवर मुनीचा हवेत झेपावत अप्रतिम कॅच घेतला.  त्यामुळे ऑस्ट्रेलियाचा स्कोअर आता 28.2 ओव्हरनंतर 2 आऊट 168 असा झाला आहे.

  • 12 Oct 2025 08:37 PM (IST)

    IND vs AUS Live Updates : एलिस पेरी रिटायर्ड हर्ट, मैदान सोडलं, बेथ मूनीची एन्ट्री

    ऑस्ट्रेलियाची फलंदाज एलिस पेरी हीने मैदान सोडलं आहे. एलिस पेरी रिटायर्ड हर्ट होऊन मैदानाबाहेर गेली आहे. एलिसनंतर बेथ मुनी मैदानात आली आहे.  एलिसने 40 बॉलमध्ये 32 रन्स केल्या.

  • 12 Oct 2025 08:26 PM (IST)

    IND vs AUS Live Updates : ऑस्ट्रेलियाच्या 21 ओव्हरनंतर 141 धावा, टीम इंडिया विकेटच्या शोधात

    ऑस्ट्रेलियाने 21 ओव्हरनंतर 1 विकेट गमावून 141 धावा केल्या आहेत. एलिसा पेरी आणि एलीस हीली ही जोडी खेळत आहे. पेरी 30 आणि हीली 70 धावांवर नाबाद आहे. ऑस्ट्रेलियाच्या या जोडीने घट्ट पाय रोवले आहेत. त्यामुळे टीम इंडियाला ही जोडी फोडायची नितांत गरज आहे. भारताला दुसरी विकेट कोण मिळवून देणार? याकडे आता चाहत्यांचं लक्ष आहे.

  • 12 Oct 2025 07:57 PM (IST)

    IND vs AUS Live Updates : एलिसा हीलीचं अर्धशतक, ऑस्ट्रेलियाच्या 14 ओव्हरनंतर 97 रन्स

    ऑस्ट्रेलियाने 14 ओव्हरनंतर 1 विकेट गमावून 97 रन्स केल्या आहेत. कॅप्टन एलीसा हीलीने अर्धशतक पूर्ण केलं आहे. हीलीने 35 बॉलमध्ये अर्धशतक पूर्ण केलं.  तसेच एलीसासह एलिस पेरी खेळत आहे. पेरीने 10 चेंडत नाबाद 6 धावा केल्या आहेत.

  • 12 Oct 2025 07:46 PM (IST)

    IND vs AUS Womens Wc Live Score Updates : हुश्श, पहिली विकेट मिळाली, फोबी लिचफिल्ड कॅच आऊट

    टीम इंडियाने अखेर ऑस्ट्रेलियाची सलामी जोडी फोडली आहे. श्री चरणी हीने ऑस्टेलियाला डावातील 12 व्या ओव्हरमध्ये पहिला झटका दिला आहे. चरणीने फोबी लिचफिल्ड हीला स्नेह राणा हीच्या हाती कॅच आऊट केलं. लिचफिल्ड हीने 39 बॉलमध्ये 40 रन्स केल्या.

  • 12 Oct 2025 07:33 PM (IST)

    IND vs AUS Womens Wc Live Score Updates : ऑस्ट्रेलियाच्या सलामी जोडीची कडक सुरुवात, टीम इंडिया विकेटच्या शोधात

    ऑस्ट्रेलियाच्या सलामी जोडीने घट्ट पाय रोवले आहेत. एलिसा हीली आणि फोबी लिचफिल्ड या जोडीने 9 ओव्हरमध्ये बिनबाद 65 रन्स केल्या आहेत.  लिचफिल्ड 22 आणि फोबी 42 रन्सवर नॉट आहे.

  • 12 Oct 2025 07:21 PM (IST)

    राष्ट्रवादीच्या धाराशिव जिल्हा संपर्कमंत्रिपदी दत्तामामा भरणे यांची नियुक्ती

    राज्याचे  कृषीमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाचे नेते दत्तामामा भरणे यांची धाराशिव जिल्ह्याचे  संपर्कमंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची संघटनात्मक बांधणी मजबूत करण्याच्या दृष्टीने पक्षाध्यक्ष अजित पवार यांनी भरणे यांच्यावर ही जबाबदारी सोपवली आहे. या नियुक्तीमुळे जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
  • 12 Oct 2025 07:17 PM (IST)

    IND vs AUS Womens Wc Live Score Updates : ऑस्ट्रेलियाच्या 5 ओव्हरनंतर 25 धावा, टीम इंडिया पहिल्या विकेटच्या शोधात

    ऑस्ट्रेलियाने 331 धावांचा पाठलाग करताना पहिल्या 5 ओव्हरमध्ये 25 रन्स केल्या आहेत.  एलिसा हीली 13 तर फोबी लिचफिल्ड 12  रन्सवर नॉट आऊट खेळत आहेत. भारतीय गोलंदाजांना विकेट घेण्यात अजून यश आलेलं नाही. मात्र त्यांनी कांगारुंच्या सलामी जोडीला बांधून ठेवलं आहे.

  • 12 Oct 2025 06:57 PM (IST)

    IND vs AUS Womens Wc Live Score Updates : ऑस्ट्रेलियाच्या बॅटिंगला सुरुवात, विजयासाठी 331 रन्सचं टार्गेट

    ऑस्ट्रेलियाच्या बॅटिंगला सुरुवात झाली आहे. ऑस्ट्रेलियाकडून कॅप्टन एलिसा हीली आणि फोबी लिचफिल्ड ही सलामी जोडी मैदानात आली आहे. टीम इंडियाने ऑस्ट्रेलियासमोर 331 रन्सचं टार्गेट ठेवलं आहे.

  • 12 Oct 2025 06:27 PM (IST)

    IND vs AUS Womens Wc Live Score Updates : टीम इंडिया 330 धावावंर ऑलआऊट, ऑस्ट्रेलियासमोर 331 रन्सचं टार्गेट?

    अनाबेल सदरलँड हीने श्री चरणी हीला क्लिन बोल्ड केलं. यासह भारताचा डाव 50 ओव्हरआधीच आटोपला. ऑस्ट्रेलियाने भारताला 48.5 ओव्हरमध्ये 330 रन्सवर ऑलआऊट केलं. टीम इंडियाकडून स्मृती मंधाना आणि प्रतिका रावल या सलामी जोडीने सर्वाधिक धावा केल्या. तर इतरांनीही आपलं योगदान दिलं. त्यामुळे भारताला 300 पार पोहचता आलं. ऑस्ट्रेलियासाठी अनाबेल सदरलँड हीने सर्वाधिक 5 विकेट्स मिळवल्या.

  • 12 Oct 2025 06:02 PM (IST)

    IND vs AUS Womens Wc Live Score Updates : टीम इंडियाच्या 300 रन्स पूर्ण

    टीम इंडियाने 43.3 ओव्हरमध्ये 300 धावा पूर्ण केल्या आहेत. भारताची वनडे वूमन्स वर्ल्ड कप स्पर्धेत ऑस्ट्रेलिया विरुद्धची ही सर्वोच्च धावसंख्या ठरली आहे. आता टीम इंडिया उर्वरित 39 बॉलमध्ये किती रन्स करणार? याकडे लक्ष असणार आहे.

  • 12 Oct 2025 05:57 PM (IST)

    IND vs AUS Womens Wc Live Score Updates : भारताला पाचवा झटका, रिचा घोष आऊट

    ऑस्ट्रेलियाने भारताला पाचवा झटका दिला आहे. भारताने रिचा घोष हीच्या रुपात पाचवी विकेट गमावली. रिचाने 22 बॉलमध्ये 32 रन्स केल्या. रिचा आऊट झाल्याने भारताचा स्कोअर 43 ओव्हरनंतर 5 आऊट 293 असा झाला आहे.

  • 12 Oct 2025 05:56 PM (IST)

    IND vs AUS Womens Wc Live Score Updates : जेमीमाह रॉड्रिग्ज-रिचा घोष जोडीची पाचव्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी

    जेमीमाह रॉड्रिग्ज आणि रिचा घोष या जोडीने पाचव्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली आहे. दोघींनी अवघ्या 30 बॉलमध्ये ही अर्धशतकी भागीदारी केली.

  • 12 Oct 2025 05:33 PM (IST)

    IND vs AUS Womens Wc Live Score Updates : भारताला चौथा धक्का, हर्लीन देओल आऊट, ऑस्ट्रेलियाचं कमबॅक

    ऑस्ट्रेलियाने भारताला चौथा झटका देत सामन्यात कमबॅक केलं आहे. प्रतिका रावल आणि स्मृती मंधाना या सलामी जोडीने भारताला 155 धावांची भागीदारी करुन दिली. त्यानंतर स्मृती आणि प्रतिका या दोघांनी ठराविक अंतराने आऊट झाल्या. त्यानंतर ऑस्ट्रेलियाने भारताला झटपट 2 झटके दिले. हरमनप्रीत कौर आऊट झाल्यानंतर ऑस्ट्रेलियाने हर्लिन देओल हीला 38 रन्सवर आऊट केलं. त्यामुळे भारताचा स्कोअर 37.2 ओव्हरमध्ये 4 आऊट 240 असा झाला आहे.

  • 12 Oct 2025 05:28 PM (IST)

    IND vs AUS Womens Wc Live Score Updates : भारताला तिसरा झटका, कॅप्टन हरमनप्रीत कौर आऊट

    ऑस्ट्रेलियाने भारताला तिसरा आणि मोठा झटका दिला आहे. कॅप्टन हरमनप्रीत कौर आऊट झाली आहे. कौरने 17 बॉलमध्ये 22 रन्स केल्या.  हरमन आऊट झाल्याने टीम इंडियाचा स्कोअर 36.3 ओव्हरनंतर 3 आऊट 234  असा झाला आहे.

  • 12 Oct 2025 05:18 PM (IST)

    IND vs AUS Womens Wc Live Score Updates : हर्लिन-हरमनप्रीत जोडी जमली, भारताच्या किती धावा?

    स्मृती मंधाना आणि प्रतिका रावल या सलामी जोडीने भारतासाठी 155 धावांची भागीदारी केली. मात्र त्यानंतर दोघी ठराविक अंतराने बाद झाल्या. मात्र यानंतर कॅप्टन हरमनप्रीत कौर आणि हर्लिन देओल ही जोडी सेट झाली आहे. भारताच्या 34 ओव्हरनंतर 2 आऊट 218 धावा झाल्या आहेत.  हरमन 10 आणि हर्लिन 34 रन्सवर नॉट आऊट खेळत आहे.

  • 12 Oct 2025 04:58 PM (IST)

    IND vs AUS Womens Wc Live Score Updates : स्मृतीनंतर प्रतिका रावल आऊट, भारताची सलामी जोडी माघारी, दुसरा झटका

    ऑस्ट्रेलियाने भारताला दुसरा झटका दिला आहे. स्मृती मंधाना हीच्यानंतर प्रतिका रावल आऊट झाली आहे. प्रतिकाने 96 बॉलमध्ये 75 रन्स केल्या. प्रतिका आऊट झाल्यानंतर हर्लीनची साथ देण्यासाठी कॅप्टन हरमनप्रीत कौर मैदानात आली आहे.

  • 12 Oct 2025 04:57 PM (IST)

    IND vs AUS Womens Wc Live Score Updates : प्रतिका रावल-हर्लीन देओलचा तडाखा, कांगारुंची धुलाई सुरुच

    स्मृती आऊट झाल्यानंतर प्रतिका रावल हीची साथ देण्यासाठी हर्लीन देओल मैदानात आली. प्रतिका आणि हर्लिन या जोडीने ऑस्ट्रेलियाची धुलाई सुरुच ठेवली आहे. भारताने 30 ओव्हरमध्ये 1 विकेट गमावून 192 रन्स केल्या आहेत.  प्रतिका  75 आणि हर्लिन 20 धावांवर नाबाद खेळत आहे.

  • 12 Oct 2025 04:37 PM (IST)

    IND vs AUS Womens Wc Live Score Updates : भारताला मोठा झटका, स्मृती मंधाना आऊट, ऑस्ट्रेलियाला पहिलं यश

    ऑस्ट्रेलियाला अखेर पहिली विकेट मिळाली. ऑस्ट्रेलियाने भारताची स्मृती मंधाना आणि प्रतिका रावल ही सलामी जोडी फोडली आहे. स्मृती मंधाना हीच्या रुपात भारताने पहिली विकेट गमावली. स्मृती मंधानाने चाबूक खेळी केली. स्मृतीने 66 बॉलमध्ये 80 रन्स केल्या. स्मृती आणि प्रतिका या सलामी जोडीने 24.3 ओव्हरमध्ये 155 रन्सची ओपनिंग पार्टनरशीप केली.

  • 12 Oct 2025 04:21 PM (IST)

    IND vs AUS Womens Wc Live Score Updates : स्मृतीनंतर प्रतिका रावलचं अर्धशतक, कांगारु बॅकफुटवर

    स्मृती मंधाना हीच्यानंतर प्रतिका रावलनेही अर्धशतक झळकावलं आहे. या सलामी जोडीने भारताला चांगली सुरुवात करुन दिली आहे. या दोघींनी नाबाद शतकी भागीदारी केली आहे. त्यामुळे आता या दोघींकडून चाहत्यांना शतकी खेळीची आशा आहे.

  • 12 Oct 2025 04:15 PM (IST)

    IND vs AUS Womens Wc Live Score Updates : स्मृतीचं अर्धशतक, भारताचं शतक, 19 ओव्हरनंतर 105 रन्स

    स्मृती मंधाना हीने 19 व्या ओव्हरमध्ये अर्धशतक पूर्ण केलं. तसेच भारताच्या स्मृती मंधाना आणि प्रतिका रावल या जोडीने याच ओव्हरमध्ये शतकी भागीदारीही पूर्ण केली. भारताने 19 ओव्हरमध्ये 105 रन्स केल्या. प्रतिका 46 तर स्मृती 55 रन्सवर नॉट आऊट आहे.

  • 12 Oct 2025 03:59 PM (IST)

    IND vs AUS Womens Wc Live Score Updates : भारताच्या 16 ओव्हरनंतर बिनबाद 82 रन्स, प्रतिका-स्मृतीची कडक बॅटिंग

    प्रतिका रावल आणि स्मृती मंधाना या सलामी जोडीने टीम इंडियाला ऑस्ट्रेलिया विरुद्ध चाबूक सुरुवात करुन दिली आहे. या सलामी जोडीने 16 ओव्हरमध्ये 5 पेक्षा अधिकच्या रनरेटने बिनबाद 82 रन्स केल्या आहेत.

  • 12 Oct 2025 03:45 PM (IST)

    IND vs AUS Womens Wc Live Score Updates : भारताची सलामी जोडी जोरात, प्रतिका-स्मृती जोडीचा 21 व्यांदा असा कारनामा

    प्रतिका रावल आणि स्मृती मंधाना या भारतीय सलामी जोडीने ऑस्ट्रेलिया विरुद्ध अर्धशतकी भागीदारी केली आहे. या जोडीची एकदिवसीय क्रिकेटमध्ये अर्धशतकी भागीदारी करण्याची ही 21 वी वेळ ठरली आहे.

  • 12 Oct 2025 03:29 PM (IST)

    IND vs AUS Womens Wc Live Score Updates : भारताच्या सलामी जोडीची संयमी सुरुवात, 7 ओव्हरनंतर किती धावा?

    प्रतिका रावल आणि स्मृती मंधाना या भारताच्या सलामी जोडीने ऑस्ट्रेलिया विरुद्ध संयमी सुरुवात केली आहे. या जोडीने 7 ओव्हरमध्ये 26 रन्स केल्या आहेत. स्मृती 11 आणि प्रतिका 15 धावांवर नाबाद आहे.

  • 12 Oct 2025 03:05 PM (IST)

    IND vs AUS Womens Wc Live Score Updates : सामना सुरु, प्रतिका रावल-स्मृती मंधाना सलामी जोडी मैदानात

    भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामन्याला सुरुवात झाली आहे. ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकून भारताला बॅटिंगसाठी भाग पाडलं आहे.  टीम इंडियाकडून प्रतिका रावल आणि स्मृती मंधाना ही सलामी जोडी मैदानात आली आहे. दोन्ही संघांचा हा या स्पर्धेतील चौथा सामना आहे.

  • 12 Oct 2025 02:38 PM (IST)

    IND vs AUS Womens Wc Live Updates : ऑस्ट्रेलिया प्लेइंग ईलेव्हन

    ऑस्ट्रेलिया प्लेइंग ईलेव्हन : एलिसा हिली (कॅप्टन आणि विकेटकीपर), फोबी लिचफिल्ड, एलिस पेरी, बेथ मूनी, अ‍ॅनाबेल सदरलँड, अ‍ॅशले गार्डनर, ताहलिया मॅकग्रा, सोफी मोलिनेक्स, किम गार्थ, अलाना किंग आणि मेगन शट.

  • 12 Oct 2025 02:37 PM (IST)

    IND vs AUS Womens Wc Live Updates : टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन

    टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन : प्रतिका रावल, स्मृती मंधाना, हरलीन देओल, हरमनप्रीत कौर (कॅप्टन), जेमिमाह रॉड्रिग्स, रिचा घोष (विकेटकीपर), दीप्ती शर्मा, अमनजोत कौर, स्नेह राणा, क्रांती गौड आणि श्री चरणी.

  • 12 Oct 2025 02:34 PM (IST)

    IND vs AUS Womens Wc Live Updates : ऑस्ट्रेलिया टॉसचा बॉस

    ऑस्ट्रेलिया वूमन्स टीमच्या बाजूने नाणेेफेकीचा कौल लागला आहे. कॅप्टन एलिसा हीली हीने बॉलिंगचा निर्णय घेतला आहे. ऑस्ट्रेलियाने भारताला बॅटिंगसाठी भाग पाडलं आहे. त्यामुळे आता भारतीय संघ किती धावा करते? याकडे चाहत्यांचं लक्ष असणार आहे.

  • 12 Oct 2025 02:18 PM (IST)

    IND vs AUS Womens Wc Live Updates : ऑस्ट्रेलिया टीम इंडियावर वरचढ

    टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया दोन्ही संघ आयसीसी वनडे वुमन्स वर्ल्ड कप स्पर्धेच्या इतिहासात एकूण 13 वेळा भिडले आहेत. ऑस्ट्रेलियाने या 13 पैकी सर्वाधिक सामने जिंकले आहेत. ऑस्ट्रेलियाने भारताला 10 सामन्यांमध्ये पराभूत केलं आहे. तर भारताला फक्त 3 सामनेच जिंकता आला आहेत. त्यामुळे भारतीय संघासमोर ही आकडेवारी सुधारण्याचं आव्हान असणार आहे.

  • 12 Oct 2025 01:59 PM (IST)

    IND vs AUS Womens Wc Live Updates : सामना टीव्ही आणि मोबाईलवर कुठे पाहायला मिळेल?

    टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहायला मिळेल. तर लाईव्ह मॅच जिओहॉटस्टार एपद्वारे मोबाईल आणि लॅपटॉपवर पाहता येईल.

  • 12 Oct 2025 01:57 PM (IST)

    IND vs AUS Womens Wc Live Updates : सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?

    भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामन्याला दुपारी 3 वाजता सुरुवात होणार आहे. तर 2 वाजून 30 मिनिटांनी टॉस होणार आहे.

  • 12 Oct 2025 01:42 PM (IST)

    IND vs AUS Womens Wc Live Updates : ऑस्ट्रेलियाची संभाव्य प्लेइंग ईलेव्हन

    ऑस्ट्रेलियाची संभाव्य प्लेइंग ईलेव्हन : एलिसा हीली (कर्णधार आणि विकेटकीपर), फोबी लिचफिल्ड, एलिस पेरी, बेथ मूनी, अ‍ॅनाबेल सदरलँड, अ‍ॅशले गार्डनर, ताहलिया मॅकग्रा, सोफी मोलिनेक्स, किम गार्थ, अलाना किंग आणि मेगन शट.

  • 12 Oct 2025 01:40 PM (IST)

    IND vs AUS Womens Wc Live Updates : टीम इंडियाची संभाव्य प्लेइंग ईलेव्हन

    टीम इंडियाची संभाव्य प्लेइंग ईलेव्हन : स्मृती मंधाना, प्रतिका रावल, हरलीन देओल, हरमनप्रीत कौर (कर्णधार), जेमिमाह रॉड्रिग्स, दीप्ती शर्मा, रिचा घोष (विकेटकीपर), अमनजोत कौर, स्नेह राणा, श्रीचरणी/राधा यादव आणि रेणुका ठाकुर.

  • 12 Oct 2025 01:33 PM (IST)

    IND vs AUS Womens Wc Live Updates : ऑस्ट्रेलिया वूमन्स टीम

    ऑस्ट्रेलिया वूमन्स टीम : एलिसा हीली (कॅप्टन), फोबी लिचफिल्ड, एलिस पेरी, बेथ मूनी, अ‍ॅनाबेल सदरलँड, अ‍ॅशले गार्डनर, ताहलिया मॅकग्रा, जॉर्जिया वेअरहॅम, किम गार्थ, अलाना किंग, मेगन शट, हीदर ग्राहम, सोफी मोलिनेक्स, डार्सी ब्राउन आणि जॉर्जिया वोल.

  • 12 Oct 2025 01:32 PM (IST)

    IND vs AUS Womens Wc Live Updates : वूमन्स टीम इंडिया

    वूमन्स टीम इंडिया: प्रतीका रावल, स्मृती मानधना, हरलीन देओल, हरमनप्रीत कौर (कर्णधार), जेमिमा रॉड्रिग्ज, दीप्ती शर्मा, अमनजोत कौर, रिचा घोष (विकेटकीपर), स्नेह राणा, क्रांती गौड, श्री चरणी, राधा यादव, अरुंधती रेड्डी, रेणुका सिंग ठाकुर आणि उमा छेत्री.

  • 12 Oct 2025 01:20 PM (IST)

    IND vs AUS Womens Wc Live Updates : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामना

    टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया दोन्ही संघ या मोहिमेतील तिसऱ्या विजयासाठी आमनेसामने आहेत. हा सामना विशाखापट्टणममध्ये आयोजित करण्यात आला आहे. ऑस्ट्रेलिया या स्पर्धेत अजिंक्य आहे. तर भारताला गेल्या सामन्यात पराभूत व्हावं लागलंय. त्यामुळे भारतासमोर कांगारुंना पराभूत करुन विजयी ट्रॅकवर परतण्याचं आव्हान आहे.

Published On - Oct 12,2025 1:20 PM

Follow us
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.