AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gautam Gambhir : सोशल मीडिया नव्हे, ड्रेसिंग रुममधल्या त्या लोकांनाच… वर्ल्डकप जिंकताच टीकाकारांवर बरसला गंभीर

2007 चा टी20 वर्ल्डकप आणि 2011 सालच्या वनडे वर्ल्डकपमध्ये जिंकणाऱ्या संघात, गौतम गंभीर हा होता. तर प्रशिक्षक म्हणून त्याच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने आयसीसी चँपियन्स ट्रॉफी 2025 जिंकली. तर काल, गंभीरच्याच प्रशिक्षणाखाली, भारतीय संघाने 2026 चा टी-20 विश्वचषक देखील जिंकलाय.

Gautam Gambhir : सोशल मीडिया नव्हे, ड्रेसिंग रुममधल्या त्या लोकांनाच... वर्ल्डकप जिंकताच टीकाकारांवर बरसला गंभीर
टीम इंडियाचा कोच गौतम गंभीरImage Credit source: social media
| Updated on: Mar 09, 2026 | 10:02 AM
Share

अहमदाबादच्या मोदी स्टेडियममध्ये भारतीय संघाने काल इतिहास रचला. आयसीसी मेन्स टी-20 वर्ल्डकप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात टीम इंडियाने न्यूझीलंडचा 96 धावांनी पराभव करून विजेतेपद पटकावले. काल, 8 मार्च रोजी अहमदाबाद झालेल्या सामन्यात भारतीय संघाने किवींसमोर विजयासाठी 256 धावांचे लक्ष्य ठेवले. मात्र या टार्गेटचा पाठलाग करताना किवींचा संघ 159 धावांवरच गारद झाला.

या ऐतिहासिक विजयानंतर, भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर (Gautam Gambhir) याने टीकाकारांवर जोरदार हल्ला चढवला. मॅच नंतर पत्रकांराशी त्याने व कॅप्टन सूर्यकुमार यादवने संवाद साधला. त्यावेळी गंभीरने महत्वाचं विधान केलं. मी फक्त ड्रेसिंग रूममधील लोकांना उत्तर देण्यास बांधील आहे. माझी जबाबदारी फक्त संघ आणि सपोर्ट स्टाफपर्यंत आहे. सोशल मीडियावरील टीकेला उत्तर देण्यास मी बांधील नाही. त्या टीकेचा माझ्यावर परिणाम होत नाही असं गंभीरने स्पष्ट केलं. यासोबत गंभीरने कालचा विजय आणि भारताने जिंकलेला टी-20 वर्ल्डकप हा दिग्गज खेळाडू व्हीव्हीएस लक्ष्मण आणि राहुल द्रविड यांना समर्पित केला.

मी त्यांना बांधील नाही..

” सोशल मीडियावरच्या लोकांना उत्तर देणं माझी जबाबदार नाही, ड्रेसिंग रूममधील 30 लोकांशी मी बांधील आहे, माझ्यावर त्यांची जबाबदारी आहे ” असं गंभीरने नमूद केलं. 2007 साली भारताने पहिल्यांदा टी-20 वर्ल्डकप जिंकला, त्या संघाचा गंभीर (खेळाडू म्हणून) महत्वाचा भाग होता. आता, 2026 मध्ये, प्रशिक्षक म्हणून त्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने टी20 वर्ल्डकप जिंकत नवा इतिहास रचला.

“एक प्रशिक्षक त्याच्या संघाइतकाच चांगला असतो. खेळाडूच मला प्रशिक्षक म्हणून घडवतात” असं तो पुढे म्हणाला. दरम्यान भारताच्या कालच्या विजयात यष्टीरक्षक संजू सॅमसन (89 धावा), सलामीवीर अभिषेक शर्मा (53 धावा) आणि इशान किशन (54 धावा) यांच्या खेळीची मोलाची भर पडली.

माइलस्टोन नव्हे, ट्रॉफी असते महत्वाची

यावेळी बोलताना गंभीर म्हणाला की, भारतीय क्रिकेटमध्ये आता वैयक्तिक विक्रमांपेक्षा ट्रॉफींना प्राधान्य दिले पाहिजे. बऱ्याच काळापासून आपण टप्पे (माइलस्टोन्स) साजरे करतोय, पण माइलस्टोन्स महत्त्वाचे नसतात; ट्रॉफी महत्त्वाच्या असतात, असं त्याने नमूद केलं. मी हे विजेतेपद राहुल द्रविड आणि व्हीव्हीएस लक्ष्मण यांना समर्पित करतो. राहुल भाईंनी भारतीय क्रिकेटसाठी केलेल्या सर्व गोष्टींसाठी आणि व्हीव्हीएस लक्ष्मण यांनी सेंटर ऑफ एक्सलन्स (सीओई) चे नेतृत्व ज्या पद्धतीने केले आहे त्यासाठी” असंही गंभीर म्हणाला.

यावेळी गौतम गंभीरने भारतीय संघाच्या निर्भय आणि धाडसी फलंदाजीचंही कौतुक केलं. “आपण आता पराभवाची भीती सोडून दिली पाहिजे. 120 धावांवर बाद होणे ठीक आहे. आपली ताकद धैर्य आणि शौर्यात आहे. उपांत्य फेरी आणि अंतिम फेरीत 2550 धावा करणे हे त्याचा पुरावा आहे” असं गंभीरने सांगितलं.

एवढंच नव्हे तर गंभीरने कॅप्टन सूर्यकुमार यादवचंही कौतुक केलं. वैयक्तिक विक्रमांपेक्षा ट्रॉफी जिंकणे अधिक महत्त्वाचे असल्याचे पुन्हा सांगितले. “सूर्यामुळे माझे काम सोपं झाले. आता आपली जबाबदारी ट्रॉफी जिंकण्याची आहे, यश साजरे करण्याची नाही” असंही त्यांने सांगितलं.

Follow Us
शरद पवारांचा गट NDAच्या वाटेवर? थेट अमित शाहांसोबतच... पडद्याआड मोठ्या
शरद पवारांचा गट NDAच्या वाटेवर? थेट अमित शाहांसोबतच... पडद्याआड मोठ्या राजकीय हालचाली!
पंतप्रधानांनी कॅमेरा अँगल नव्हे तर हृदयाचा... -प्रियांका गांधी
पंतप्रधानांनी कॅमेरा अँगल नव्हे तर हृदयाचा... नीट पेपरफुटीवर बोलताना प्रियंका गांधी हे काय बोलून गेल्या?
मंत्री-सचिव सगळेच घामाघुम! शिंदेंच्या आढावा बैठकीत मोठं घडलं? शिक्षण..
मंत्री-सचिव सगळ्यांनाच फुटला घाम! शिंदेंच्या आढावा बैठकीत मोठं घडलं? शिक्षण खातं...
विद्यार्थी दहशतवादी होते का? संसदेत प्रियंका गांधींचा सरकारला थेट सवाल
Priyanka Gandhi | विद्यार्थी दहशतवादी होते का? संसदेत प्रियंका गांधींचा सरकारला थेट सवाल; लाठीचार्जवरून मोदी-शहांकडे मागितलं उत्तर
परीक्षा सुधारणा विधेयकाबाबत लोकसभेत चर्चा, मंत्री जितेंद्र सिंह...
परीक्षा सुधारणा विधेयकाबाबत लोकसभेत चर्चा, मंत्री जितेंद्र सिंह यांनी दिली मोठी अपडेट
मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी मंत्रालयांच्या सचिवांसोबत बैठक
मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी मंत्रालयांच्या सचिवांसोबत उच्चस्तरीय बैठक, ईराण-अमेरिका तणावादरम्यान...
मोठा निर्णय! CJP आंदोलनातील विद्यार्थ्यांवरील सर्व गुन्हे मागे...
मोठा निर्णय! CJP आंदोलनातील विद्यार्थ्यांवरील सर्व गुन्हे मागे; मुख्यमंत्री फडणवीसांचे पोलिसांना तातडीचे आदेश
पुणे विद्यापीठात बनावट डिग्रीचा खेळ खल्लास; 70 हजारांच्या व्यवहारानंतर
मोठा खुलासा! पुणे विद्यापीठात बनावट डिग्रीचा खेळ खल्लास; 70 हजारांच्या व्यवहारानंतर एकच खळबळ
शेतकऱ्यांना थोडा त्रास झाला तर सहन करू, पण उद्योजकांना त्रास...
शेतकऱ्यांना थोडा त्रास झाला तर सहन करू, पण उद्योजकांना त्रास... गुलाबराव पाटलांचं विधान तुफान चर्चेत
उत्तम शिंदेंविरोधात गुन्हा दाखल; सहकारी संघाच्या इमारतीवर बेकायदेशीर..
मोठी कारवाई! शिंदेंविरोधात गुन्हा दाखल; सहकारी संघाच्या इमारतीवर बेकायदेशीर ताब्याचा आरोप