AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

T20 World Cup 2026 Prize Money : वर्ल्डकप जिंकताच टीम इंडिया मालामाल, संघावर बक्षीसांचा पाऊस, न्युझीलंडला किती मिळालं बक्षीस?

T20 वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये काल टीम इंडियाने न्युझीलंडला हरवत सलग दुसऱ्यांदा वर्ल्डकप जिंकला तर टी 20 वर्ल्डकप एकूण 3 वेळा जिंकल्याचा विक्रमही भारताच्याच नावावर आहेय कालच्या विजयानंतर टीम इंडियाला किती बक्षीस मिळालं ?

T20 World Cup 2026 Prize Money : वर्ल्डकप जिंकताच टीम इंडिया मालामाल, संघावर बक्षीसांचा पाऊस, न्युझीलंडला किती मिळालं बक्षीस?
टीम इंडिया अजिंक्यImage Credit source: social media
| Updated on: Mar 09, 2026 | 9:38 AM
Share

T20 World Cup 2026 Prize Money: आयसीसी मेन्स टी20 वर्ल्ड कप 2026 (T20 World Cup 2026 ) अंतिम सामन्यात न्यूझीलंडचा 96 धावांनी पराभव करून भारताने (India) इतिहास रचला. कर्णधार सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने तिसऱ्यांदा टी-20 विश्वचषक जिंकला. महत्त्वाचे म्हणजे, भारतीय संघाने सलग दुसऱ्यांदा ट्रॉफी जिंकली असून तो पहिल्यांदाच घरच्या मैदानावर विश्वविजेता बनला आहे.

या मोठ्या विजयासह इतिहास रचणाऱ्या टीम इंडियाला केवळ ट्रॉफीच नव्हे तर बक्षीसाची मोठी रक्कमही मिळाली. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) या स्पर्धेसाठी13.5 मिलियन डॉलर म्हणजे जवळपास 120 कोटी रुपयांचा रेकॉर्ड प्राईज पूल ठेवला होता, जो मागील आवृत्तीपेक्षा जवळजवळ 20 टक्के जास्त आहे.

भारताला कोट्यवधींचं बक्षीस

टी20 वर्ल्ड कप 2026 जिंकल्यानंतर भारतीय संघाला 3 दशलक्ष डॉलर्स म्हणजे अंदाजे 27.5 कोटी रुपयांची बक्षीस रक्कम मिळाली. ही रक्कम प्रथम भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला दिली जाईल आणि नंतर बोनस, सामना शुल्क आणि इतर बक्षिसांच्या स्वरूपात खेळाडूंमध्ये ती वाटली जाईल.

न्युझीलंडलाही मोठं बक्षीस

कालचा अंतिम सामना हरला असला तरी, न्यूझीलंडच्या संघालाही मोठ्या प्रमाणात बक्षीसाची रक्कम मिळाली. उपविजेते म्हणून, न्यूझीलंडला 1.6 मिलियन डॉलर म्हणजे जवळपास 14.7 कोटी रुपये बक्षीस देण्यात आले.

सेमीफायनलपर्यंत पोहोचलेल्या टीम्सची कमाई

या स्पर्धेच्या उपांत्य फेरीत पोहोचलेल्या इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिकेच्या संघांनाही मोठ्या प्रमाणात बक्षिसं देण्यात आली. दोन्ही संघांना अंदाजे 7.24 कोटी रुपये बक्षीस देण्यात आले.

सुपर-८ मध्ये गाठणाऱ्या संघांसाठी बक्षिसं

स्पर्धेच्या सुपर ८ टप्प्यात पोहोचलेल्या संघांनाही भरीव बक्षिसे मिळाली. झिम्बाब्वे, पाकिस्तान, श्रीलंका आणि वेस्ट इंडिज यांना अंदाजे 3.48 कोटी रुपये बक्षिसे देण्यात आली.

गट फेरीतून बाहेर पडलेल्या संघांनाही मिळणार रक्कम

सर्व 20 संघांना प्रोत्साहन देण्यासाठी, आयसीसीने गट टप्प्यातून बाहेर पडलेल्या संघांना बक्षीस देखील दिले. अफगाणिस्तान, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, आयर्लंड, इटली, नामिबिया, नेपाळ, नेदरलँड्स, ओमान, स्कॉटलंड, युएई आणि युनायटेड स्टेट्स यांना अंदाजे 2.3 कोटी रुपये मिळाले.

संजू सॅमसन प्लेअर ऑफ द टूर्नामेंट

संपूर्ण स्पर्धेत चमकदार कामगिरी करणारा, भारतीय फलंदाज संजू सॅमसनला प्लेअर ऑफ द टूर्नामेंट म्हणून गौरविण्यात आले. अंतिम सामन्यात 46 चेंडूत 89 धावा करत त्याने टीम इंडियाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली.

Follow Us
शरद पवारांचा गट NDAच्या वाटेवर? थेट अमित शाहांसोबतच... पडद्याआड मोठ्या
शरद पवारांचा गट NDAच्या वाटेवर? थेट अमित शाहांसोबतच... पडद्याआड मोठ्या राजकीय हालचाली!
पंतप्रधानांनी कॅमेरा अँगल नव्हे तर हृदयाचा... -प्रियांका गांधी
पंतप्रधानांनी कॅमेरा अँगल नव्हे तर हृदयाचा... नीट पेपरफुटीवर बोलताना प्रियंका गांधी हे काय बोलून गेल्या?
मंत्री-सचिव सगळेच घामाघुम! शिंदेंच्या आढावा बैठकीत मोठं घडलं? शिक्षण..
मंत्री-सचिव सगळ्यांनाच फुटला घाम! शिंदेंच्या आढावा बैठकीत मोठं घडलं? शिक्षण खातं...
विद्यार्थी दहशतवादी होते का? संसदेत प्रियंका गांधींचा सरकारला थेट सवाल
Priyanka Gandhi | विद्यार्थी दहशतवादी होते का? संसदेत प्रियंका गांधींचा सरकारला थेट सवाल; लाठीचार्जवरून मोदी-शहांकडे मागितलं उत्तर
परीक्षा सुधारणा विधेयकाबाबत लोकसभेत चर्चा, मंत्री जितेंद्र सिंह...
परीक्षा सुधारणा विधेयकाबाबत लोकसभेत चर्चा, मंत्री जितेंद्र सिंह यांनी दिली मोठी अपडेट
मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी मंत्रालयांच्या सचिवांसोबत बैठक
मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी मंत्रालयांच्या सचिवांसोबत उच्चस्तरीय बैठक, ईराण-अमेरिका तणावादरम्यान...
मोठा निर्णय! CJP आंदोलनातील विद्यार्थ्यांवरील सर्व गुन्हे मागे...
मोठा निर्णय! CJP आंदोलनातील विद्यार्थ्यांवरील सर्व गुन्हे मागे; मुख्यमंत्री फडणवीसांचे पोलिसांना तातडीचे आदेश
पुणे विद्यापीठात बनावट डिग्रीचा खेळ खल्लास; 70 हजारांच्या व्यवहारानंतर
मोठा खुलासा! पुणे विद्यापीठात बनावट डिग्रीचा खेळ खल्लास; 70 हजारांच्या व्यवहारानंतर एकच खळबळ
शेतकऱ्यांना थोडा त्रास झाला तर सहन करू, पण उद्योजकांना त्रास...
शेतकऱ्यांना थोडा त्रास झाला तर सहन करू, पण उद्योजकांना त्रास... गुलाबराव पाटलांचं विधान तुफान चर्चेत
उत्तम शिंदेंविरोधात गुन्हा दाखल; सहकारी संघाच्या इमारतीवर बेकायदेशीर..
मोठी कारवाई! शिंदेंविरोधात गुन्हा दाखल; सहकारी संघाच्या इमारतीवर बेकायदेशीर ताब्याचा आरोप