India vs england 1st Test | बुम बुम ! ‘यॉर्कर किंग’ जसप्रीत बुमराहचा वर्ल्ड रेकॉर्ड

India vs england 1st Test | बुम बुम ! 'यॉर्कर किंग' जसप्रीत बुमराहचा वर्ल्ड रेकॉर्ड
जसप्रीत बुमराह

जसप्रीत बुमराहने (Jasprit Bumrah) या विश्व विक्रमासह आणखी एका विक्रमाची बरोबरीही केली आहे. बुमराह टीम इंडियाचा हुकमाचा एक्का आहे.

sanjay patil

|

Feb 05, 2021 | 10:31 PM

चेन्नई : टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड (India vs england 1st test) यांच्यात चेन्नईत टेस्ट सीरिजमधील पहिली मॅच खेळवण्यात येत आहे. या टेस्ट मॅचनिमित्ताने टीम इंडियाच्या अनेक खेळाडूंनी कमबॅक केलं. कर्णधार विराट कोहली, वेगवान गोलंदाज इशांत शर्मा आणि यॉर्कर किंग जसप्रीत बुमराहने (Yorker King Japrit Bumrah) पुनरागमन केलं. बुमराहने इंग्लंड विरुद्धच्या सामन्यातून कमबॅक करताच विश्व विक्रमाला गवसणी घातली आहे. परदेशात सर्वाधिक कसोटी खेळल्यानंतर मायभूमीत पहिला कसोटी सामना खेळण्याचा रेकॉर्ड बुमराहने केला आहे. (India vs England 1st test yorker king jasprit bumrah most away test matches played at time maiden home test india)

जवागल श्रीनाथ

बुमराहच्या आधी हा विक्रम टीम इंडियाचा माजी खेळाडू जवागल श्रीनाथच्या नावावर होता. श्रीनाथने कसोटीमध्ये परदेशात 12 सामने खेळल्यानंतर भारतात टेस्ट खेळण्याची संधी मिळाली होती. याशिवाय आरपी सिंहला (11), सचिन तेंडुलकरला (10) आणि आशिष नेहराला 10 कसोटींनंतर मायभूमीत कसोटी सामना खेळण्याची संधी मिळाली होती.

आणखी एका विक्रमाची बरोबरी

बुमराहने वेस्टइंडिजच्या डॅरेन गंगाच्या विक्रमाची बरोबरी केली आहे. गंगा आणि बुमराह या दोघांनी आपल्या कसोटी कारकिर्दीतील पहिले 17 सामने हे परदेशात खेळले होते. यानंतर त्यांना आपल्या देशात खेळण्याची संधी मिळाली.

बुमराहची कसोटी कारकिर्द

बुमराहने 2018 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी पदार्पण केलं होतं. त्याने आतापर्यंत एकूण 17 सामन्यांमध्ये एकूण 79 विकेट्स त्याने घेतल्या आहेत. विशेष म्हणजे त्याने एकदा हॅटट्रिक देखील घेतली आहे. बुमराह टीम इंडियाचा महत्वाचा गोलंदाज आहे. त्याने कमी कालावधीत आपली उपयुक्तता सिद्ध केली आहे. बुमराहने टीम इंडियाला निर्णायक क्षणी विकेट्स मिळवून दिल्या आहेत.

दरम्यान इंग्लंडने पहिल्या दिवसखेर 3 विकेट्स गमावून 262 धावा केल्या. इंग्लंडकडून सर्वाधिक धावा या कर्णधार जो रुटने केल्या. इंग्लंडकडून कर्णधार जो रुटने दिवसखेर नाबाद 128 धावा केल्या. तर डोमिनिक सिब्लीने 87 धावांची खेळी केली. तर सलामीवीर रॉरी ब्रन्सने 33 धावा केल्या. टीम इंडियाकडून जसप्रीत बुमराहने 2 तर अश्विनने 1 विकेट घेतला.

संबंधित बातम्या :

India vs england 1st Test Day 1 HighLights | जो रुटचे शानदार शतक, डोमिनिक सिब्लीची दमदार खेळी, पहिल्या दिवसावर इंग्लंडचे वर्चस्व

India vs england 1st test | इंग्लंडचा कॅप्टन जो रुटचा भीमपराक्रम, 100 व्या मॅचमध्ये धडाकेबाज शतक

(India vs England 1st test yorker king jasprit bumrah most away test matches played at time maiden home test india)

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें