IND vs ENG: बुम, बुम, बुमराहने इंग्लंडचा ओपनर क्रॉलीला जादू दाखवली, बॉल लेफ्ट करायला गेला आणि…

IND vs ENG: भारताच्या 378 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडने (IND vs ENG) दमदार सुरुवात केली आहे. इंग्लंडच्या सलामीवीरांनी बिनबाद 100 धावांची भागीदारी केली होती.

IND vs ENG: बुम, बुम, बुमराहने इंग्लंडचा ओपनर क्रॉलीला जादू दाखवली, बॉल लेफ्ट करायला गेला आणि...
ind vs eng
Image Credit source: twitter
दीनानाथ मधुकर परब, टीव्ही 9 मराठी डिजीटल

|

Jul 04, 2022 | 8:39 PM

मुंबई: भारताच्या 378 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडने (IND vs ENG) दमदार सुरुवात केली आहे. इंग्लंडच्या सलामीवीरांनी बिनबाद 100 धावांची भागीदारी केली होती. झॅक क्रॉली (Zak Crawley) आणि एलॅक्स लीस या दोन्ही सलामीवीरांना कसं रोखायचं? हा प्रश्न क्रिकेट चाहत्यांना पडला होता. अखेर कॅप्टन जसप्रीत बुमराहने (Jasprit Bumrah) या प्रश्नाचं उत्तर दिलं. इंग्लंडने जबरदस्त सुरुवात केली. शमी, बुमराह, रवींद्र जाडेजा, मोहम्मद सिराज आणि शार्दुल ठाकूर यांच्या गोलंदाजीवर इंग्लिश ओपनर्स सहज धावा काढत होते. एकदम वनडे स्टाइल फलंदाजी सुरु होती. त्यात भारतीय गोलंदाज दीशाहीन गोलंदाजी करत होते. त्यामुळे त्यांचं काम अधिक सोपं झालं. त्या तुलनेत इंग्लिश गोलंदाजांनी अचूक टप्प्यावर गोलंदाजी केली. त्यामुळे भारतीय फलंदाज कालच्या धावसंख्येत फक्त 120 धावांची भर घालू शकले. जेम्स अँडरसन, स्टुअर्ट ब्रॉड यांनी सकाळच्या सत्रात भेदक मारा केला. कॅप्टन बेन स्टोक्सने अचूक टप्प्यावर गोलंदाजी केली व सर्वाधिक चार विकेट काढल्या.

जसप्रीत बुमराहने आपली जादू दाखवली

इंग्लंडला विजयासाठी 271 धावांची आवश्यकता आहे. कसोटी रंगतदार स्थितीमध्ये आहे. भारतीय गोलंदाज विकेट मिळवण्यासाठी संघर्ष करत होते. एलेक्स लीस आणि झॅक क्रॉली भारतीय गोलंदाजांना दाद देत नव्हते. त्यावेळी जसप्रीत बुमराहने आपली जादू दाखवली. चहापानाआधीच्या दुसऱ्या षटकात जसप्रीत बुमराहने भारताला पहिलं यश मिळवून दिलं. बुमराहने एक उत्कृष्ट चेंडूवर क्रॉलीला बोल्ड केलं. क्रॉली बॉल लेफ्ट करायला गेला. पण चेंडूने थेट स्टम्पसचा वेध घेतला.

ऋषभ पंतचा नवीन रेकॉर्ड

पहिल्याडावात शतकी खेळी करणाऱ्या ऋषभ पंतने दुसऱ्याडावात अर्धशतक झळकावलं. परदेशात शतकानंतर अर्धशतक झळकावणारा तो भारताचा पहिला विकेटकीपर फलंदाज ठरला आहे. धोनी पासून फारुख इंजीनियर पर्यंत कोणीही असा कारनामा करु शकलेलं नाही.

मॅककलमला कमकुवत बाजू माहितीय

श्रेयस अय्यर खेळपट्टीवर सेट होत होता. ऋषभ पंत बरोबर संतुलन साधण्याचा प्रयत्न करत होता. त्याने काही चांगले फटके खेळून गोलंदाजांना हैराणही केलं. पण 60 व्या षटकात मॅथ्यू पॉट्सच्या जाळ्यात तो फसला. अय्यरला अडकवण्यासाठी कोच मॅककलम यांनी जाळं विणलं होतं. आयपीएल 2022 मध्ये दोघे एकाच संघात होते. मॅककलम कोलकाता नाइट रायडर्सचे कोचे होते, तर श्रेयस अय्यर टीमचा कॅप्टन. मॅककलम यांना अय्यरची कमजोरी माहित होती. त्यांनी त्याचा फायदा उचलला.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें