
आयसीसी अंडर 19 वर्ल्ड कप 2026 स्पर्धेतील अंतिम सामन्यात टीम इंडियाने इंग्लंडवर मात केली. भारताने 412 धावांचा पाठलाग करणाऱ्या इंग्लंडला 311 रन्सवर ऑलआऊट केलं. भारताने अशाप्रकारे हा सामना जिंकला. भारताने यासह अंडर 19 वर्ल्ड कप ट्रॉफीवर नाव कोरलं. भारताने आयुष म्हात्रे याच्या नेतृत्वात ही कामगिरी भारताची ही इंग्लंड विरुद्ध अंडर 19 वर्ल्ड कप जिंकण्याची दुसरी आणि एकूण सहावी वेळ ठरली. भारताने याआधी 2022 साली इंग्लंडला पराभूत करत पाचव्यांदा वर्ल्ड चॅम्पियन होण्याचा बहुमान मिळवला होता. हरारे स्पोर्ट्स क्लबमधील स्टेडियममध्ये वैभव सूर्यवंशी याने केलेल्या 175 रन्सच्या जोरावर भारताने 9 विकेट्स गमावून 50 ओव्हरमध्ये 411 रन्स केल्या. इंग्लंडला प्रत्युत्तरात 40.2 ओव्हरमध्ये ऑलआऊट 311 धावाच करता आल्या.
अंडर 19 वनडे वर्ल्डकप स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारताने इंग्लंडचा 100 धावांनी पराभव केला. या सामन्यात कॅलेब फाल्कनरने झुंजार खेळी केली. पण त्याचं शतक वाया गेलं. भारताने विजयासाठी 411 धावांचं आव्हान ठेवलं होतं. पण इंग्लंडचा संघ 311 धावा करू शकला. खरं तर वैभव सूर्यवंशीने 175 धावांची खेळी नसती, तर कदाचित चित्र वेगळं असू शकलं असतं. पण शेवटी विजयी मिळवतो तोच संघ जेतेपदाचा मानकरी ठरतो. त्यामुळे जर तरला काही अर्थच उरत नाही.
लॅमी लुम्सडेनच्या रुपाने इंग्लंडला नववा धक्का बसला आहे. 10 चेंडूत 3 धावा करून तंबूत परतला आहे. त्यामुळे टीम इंडियाचा विजय पक्का झाला आहे. आता टीम इंडियाला अवघ्या एक विकेटची आवश्यकता आहे.
इंग्लंडला जेम्स मिंटोच्या रूपाने आठवा धक्का बसला आहे. टीम इंडियाला आता विजयासाठी फक्त दोन विकेटची आवश्यकता आहे. 265 धावांवर इंग्लंडची आठवी विकेट पडली.
टीम इंडिया विजयाच्या वेशीवर आहे. पण शेपटाच्या फलंदाजांनी भारतीय गोलंदाजांना चांगलंच झुंजवलं आहे. तीन विकेटसाठी भारतीय गोलंदाजांची धडपड सुरू आहे.
टीम इंडिया विजयाच्या वेशीवर येऊन ठेपली आहे. इंग्लंडचे सात विकेट पडले असून बऱ्याच धावांची आवश्यकता आहे. त्यामुळे टीम इंडिया विजयापासून 3 पावलं दूर आहे.
दीपेश देवेंद्रन याने धमाका केला आहे. दीपेश देवेंद्रन याने इंग्लंडला एकाच ओव्हरमध्ये इंग्लंडला 2 झटके दिले आहेत. दीपेशने इंग्लंडच्या फरहान अहमद याला विकेटकीपर अभिज्ञान कुंदु याच्या हाती कॅच आऊट केलं. फरहान अहमद याने 1 धाव करुन मैदानाबाहेरचा रस्ता धरला. त्यानंतर दीपेशने सेबॅस्टियन मॉर्गन याला आपल्याच बॉलिंगवर कॅच आऊट केलं. इंग्लंडने अशाप्रकारे एकूण 7 विकेट्स गमावले आहेत.
टीम इंडियाने 21 व्या ओव्हरमध्ये इंग्लंडला 2 झटके देत सामन्यावर पूर्ण पकड मिळवली आहे. भारताचा कर्णधार आयुष म्हात्रे याने 21 वी ओव्हर टाकली. आयुषने इंग्लंडचा ओपनर बेन डॉकिन्स याला आऊट करत भारताला मोठी विकेट मिळवून दिली. बेन डॉकिन्स याने 66 धावा केल्या. त्यानंतर खिलान पटेल आणि विकेटकीपर अभिज्ञान कुंदु या दोघांनी राल्फी अल्बर्ट याला रन आऊट केलं. राल्फी अल्बर्ट याला भोपळाही फोडता आला नाही.
टीम इंडियाला मोठी विकेट मिळाली आहे. टीम इंडियाने इंग्लंडचा कर्णधार आऊट झाला आहे. कनिष्क चौहान याने त्याच्याच बॉलिंगवर थॉमस रेव याला आऊट केलं. थॉमस रेव याने 18 बॉलमध्ये 31 रन्स केल्या.
टीम इंडियाने इंग्लंडला दुसरा झटका दिला आहे. हेनिल पटेल याने खिलान पटेलच्या बॉलिंगवर सुंदर कॅच घेतला. भारताने अशाप्रकारे बेन मेस याला मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. बेनने 28 बॉलमध्ये 45 रन्स केल्या.
भारताने इंग्लंडसमोर 412 धावांचं आव्हान ठेवलं आहे. इंग्लंडने या धावांचा पाठलाग करताना 7 ओव्हरमध्ये 1 विकेट गमावून 25 धावा केल्या आहेत. तर टीम इंडिया दुसऱ्या विकेटच्या शोधात आहे.
टीम इंडियाने इंग्लंडला पहिला झटका दिला आहे. भारताचा वेगवान गोलंदाज आर एस अंब्रिश याने जोसेफ मूर्स याला बोल्ड केलं. जोसेफ मूर्स याने 16 बॉलमध्ये 4 फोरसह 17 रन्स केल्या.
इंग्लंडच्या बॅटिंगला सुरुवात झाली आहे. इंग्लंडकडून बेन डॉकिन्स आणि जोसेफ मूर्स ही सलामी जोडी मैदानात आली आहे. टीम इंडियाने इंग्लंडसमोर तब्बल 412 धावांचं आव्हान ठेवलं आहे.
टीम इंडियाने 50 षटकात 9 गडी गमवून 411 धावा केल्या आहे. तसेच इंग्लंडसमोर विजयासाठी 412 धावांचं मोठं लक्ष्य ठेवलं आहे. वैभव सूर्यवंशीने या सामन्यात एकट्याने 175 धावांची खेळी केली. मोठं लक्ष्य असल्याने इंग्लंडवर दडपण वाढलं आहे.
हेनिल पटेल 7 चेंडूत 5 धावा करून बाद झाला. धाव घेताना फसला आणि धावचीत होत तंबूत गेला. त्याच्या रूपाने टीम इंडियाला नववा धक्का बसला.
टीम इंडियाला खिलन पटेलच्या रूपाने आठवा धक्का बसला आहे. खिलन पटेल 4 चेंडूत 3 धावा करून बाद झाला. शेवटच्या 2 विकेट हाती असून 400 धावा गाठणार का? असा प्रश्न आहे.
आरएस अंब्रिशच्या रुपाने भारताला सातवा धक्का बसला आहे. अंब्रिश 24 चेंडूत 18 धावा करून बाद झाला आहे. सातव्या विकेटनंतर 400 धावांच्या दिशेने कूच करत असताना धक्का बसला आहे. आता शेवटच्या तीन विकेट हाती असताना 400 धावा गाठणार का? असा प्रश्न क्रीडाप्रेमींना पडला आहे.
टीम इंडियाला अभिज्ञान कुंडूच्या रुपाने सहावा धक्का बसला आहे. अभिज्ञान कुंडू 31 चेंडूत 40 धावा करून बाद झाला. सुरुवात धीमी केली होती. पण त्यानंतर आक्रमक फटकेबाजी करत इंग्लंड संघावर दडपण आणलं होतं.
भारताने 44 षटकांपर्यंत 350 धावांपर्यंत मजल मारली आहे. यात आखणी धावांची भर पडणार यात काही शंका नाही. अभिज्ञान कुंडूने 44व्या षटकात आक्रमण केलं. त्यामुळे भारत 400 पार धावा करेल असं स्पष्ट दिसत आहे.
इंग्लंडने भारताला पाचवा झटका दिला आहे. वेदांत्र त्रिवेदी याच्या रुपात भारताने पाचवी विकेट गमावली आहे. वेदांतने 36 बॉलमध्ये 32 रन्स केल्या. वेदांतने या दरम्यान 2 चौकार लगावले.
इंग्लंडने भारताला चौथा झटका दिला आहे. इंग्लंने भारताचा उपकर्णधार विहान मल्होत्रा याला आऊट केलं आहे. विहानने 36 बॉलमध्ये 2 फोरसह 30 रन्स केल्या. विहानला चांगली सुरुवात मिळाली होती. त्यामुले विहानला अर्धशतक करण्याची संधी होती. मात्र विहान तसं करण्यात अपयशी ठरला.
अखेर वैभव सूर्यवंशी याच्या वादळी खेळीचा शेवट झाल आहे. त्यामुळे वैभवची द्विशतकाची संधी हुकली आहे. वैभवने 15 सिक्स आणि 15 फोरसह 80 बॉलमध्ये 175 रन्स केल्या.
वैभव सूर्यवंशी याने फायनलध्ये धमाका केला आहे. वैभवने इंग्लंड विरुद्ध दीडशतक झळकावलं आहे. वैभवे षटकार झळकावत दीडशतक पूर्ण केलं. वैभवने 32 चेंडूत अर्धशतक आणि त्यानंतर 55 चेंडूत शतक पूर्ण केलं. वैभवने त्यानंतर फक्त 16 चेंडूत 50 धावा जोडत दीडशतक झळकावलं. वैभव असाच खेळत राहिला तर तो सहज द्विशतक पूर्ण करेल.
टीम इंडियाचा ओपनर वैभव सूर्यवंशी याने अंडर 19 वर्ल्ड कप स्पर्धेच्या अंतिम फेरीत शतक झळकावलं आहे. वैभवने चौकार आणि षटकारांचा मदतीने अवघ्या 55 चेंडूत शतक झळकावलंय.
इंग्लंडने भारताला दुसरा आणि मोठा झटका दिला आहे. कर्णधार आयुष म्हात्रे अर्धशतकानंतर दुसऱ्याच बॉलवर आऊट झाला. आयुषने सलग दुसरं अर्धशतक झळकावलं. मात्र आयुष त्यानंतर आऊट झाला. आयुषने 51 बॉलमध्ये 53 रन्स केल्या. तसेच वैभव आणि आयुष या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी 90 बॉलमध्ये 142 रन्सची पार्टनरशीप केली.
टीम इंडियाचा ओपनर वैभव सूर्यवंशी याने वादळी खेळी करत अर्धशतक झळकावलं. त्यानंतर वैभवने गिअर बदलत चौफेर फटकेबाजी केली. आता वैभव शतकात्या उंबरठ्यावर आहे. वैभव 18 ओव्हरनंतर 97 रन्सवर नॉट आऊट खेळत आहे. तर टीम इंडियाने 1 विकेट गमवून 152 धावा केल्या आहेत. आयुष 45 चेंडूत नाबाद 43 धावांवर खेळत आहे.
मालेगावचे वरिष्ठ नेते ओवीसी यांच्या बैठकीत घेतलेल्या निर्णयानुसार पक्षाने महापौर आणि उपमहापौर निवडणुकीत तटस्थ राहण्याचा निर्णय घेतला आहे. जातीयवादी शक्तींना (@BJP4Maharashtra आणि@Shivsenaofc) सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
टीम इंडियाचा ओपनर वैभव सूर्यवंशी याने अंतिम सामन्यात संयमी सुरुवात केली आहे. वैभवने इंग्लंडने विरुद्ध अर्धशतक झळकावलं आहे. वैभवने 32 चेंडूत अर्धशतक पूर्ण केलं आहे.
भारताने अंतिम सामन्यात ॲरॉन जॉर्ज याच्या रुपात पहिली विकेट गमावली. त्यानंतर वैभव सूर्यवंशी याची साथ देण्यासाठी कॅप्टन आयुष म्हात्रे मैदानात आला. आता ही जोडी सेट झालीय. भारताने 10 ओव्हरमध्ये 1 विकेट गमावून 79 धावा केल्यात. वैभव 42 तर आयुष 26 धावांवर खेळत आहे.
इंग्लंडने भारताला पहिला झटका दिला आहे. ॲलेक्स ग्रीन याने ॲरॉन जॉर्ज याला आऊट केलं आहे. ॲरॉनने 11 बॉलमध्ये 9 रन्स केल्या. ॲरॉनने उपांत्य फेरीत अफगाणिस्तान विरुद्ध शतकी खेळी करुन भारताच्या विजयात प्रमुख भूमिका बजावली होती.
भारत विरुद्ध इंग्लंड अंडर 19 वर्ल्ड कप स्पर्धेतील अंतिम सामन्याला सुरुवात झाली आहे. टीम इंडियाने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला आहे. भारताकडून वैभव सूर्यवंशी आणि ॲरॉन जॉर्ज ही सलामी जोडी मैदानात आली आहे. या दोघांवर भारताला चांगली सुरुवात करुन देण्याची जबाबदारी आहे. हे दोघे कशी सुरुवात करतात, याकडे चाहत्यांचं लक्ष असणार आहे.
आयसीसी अंडर 19 वर्ल्ड कप 2026 स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताने टॉस जिंकलाय. कर्णधार आयुष म्हात्रे याने फलंदाजीचा निर्णय घेत इंग्लंडला फिल्डिंगसाठी भाग पाडलं आहे. भारताने अंतिम सामन्यासाठी प्लेइंग ईलेव्हनमध्ये बदल केलेला नाही.
इंग्लंड विरुद्ध इंडिया अंडर 19 वर्ल्ड कप स्पर्धेतील अंतिम सामन्याला भारतीय वेळेनुसार दुपारी 1 वाजता सुरुवात होणार आहे. त्याआधी 12 वाजून 30 मिनिटांनी टॉस होणार आहे.
इंग्लंडने सर्वात आधी अंतिम फेरीत प्रवेश केला. इंग्लंडने गतविजेत्या ऑस्ट्रेलियाला पराभूत करत अंतिम फेरीचं तिकीट मिळवलं. इंग्लंड आता भारतासमोर कशी कामगिरी करते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
टीम इंडियाने उपांत्य फेरीत अफगाणिस्तानवर मात करत फायनलमध्ये धडक दिली होती. ॲरॉन जॉर्ज याने केलेल्या शतकी खेळीच्या जोरावर भारताने 300 पेक्षा अधिक धावांचं आव्हान सहज पूर्ण केलं होतं. त्याआधी टीम इंडिया बाद आणि साखळी फेरीत अजिंक्य होती.
बेन डॉकिन्स, जोसेफ मूर्स, बेन मेस, थॉमस रेव (कर्णधार), कॅलेब फाल्कनर, राल्फी अल्बर्ट, फरहान अहमद, सेबॅस्टियन मॉर्गन, जेम्स मिंटो, मॅनी लम्सडेन, ॲलेक्स फ्रेंच, ॲलेक्स ग्रीन, आयझॅक मोहम्मद, ल्यूक हँड्स, विल बेनिसन आणि अली फारूक.
आरोन जॉर्ज, वैभव सूर्यवंशी, आयुष म्हात्रे (कर्णधार), विहान मल्होत्रा, वेदांत त्रिवेदी, अभिज्ञान कुंडू (विकेटकीपर), आरएस अंबरिश, कनिष्क चौहान, खिलन पटेल, हेनिल पटेल, दीपेश देवेंद्रन, हरवंश पंगालिया, मोहम्मद एनान, उद्धव मोहन आणि किशन कुमार सिंग.
अंडर 19 टीम इंडियाने आयुष म्हात्रे याच्या नेतृत्वात वर्ल्ड कप स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक दिलीय. भारताची ही या स्पर्धेच्या इतिहासात अंतिम फेरीत पोहचण्याची एकूण दहावी तर सलग सहावी वेळ ठरली आहे. भारतासमोर अंतिम सामन्यात इंग्लंडचं आव्हान आहे.
भारत-इंग्लंड अंतिम सामन्यासाठी सज्ज
It’s time for a massive showdown! 🔥
Who will take away the coveted trophy at the #U19WorldCup 2026 🏆
Find out how to watch 👉 https://t.co/xPyPKzGMQU pic.twitter.com/gdZopID6Pk
— ICC (@ICC) February 6, 2026