IND vs ENG Odi Series : 6 फेब्रुवारीपासून वनडे सीरिज, सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?
IND vs ENG ODI LIVE Streaming: टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यातील एकदिवसीय सामने टीव्ही आणि मोबाईलवर कुठे पाहायला मिळतील? जाणून घ्या सर्वकाही.

टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यातील टी 20i मालिकेची सांगता मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर झाली. टी 20i मालिकेतील पाचवा आणि शेवटचा सामना हा भारताने जिंकला. टीम इंडियाने यासह ही मालिका 4-1 अशा फरकाने आपल्या नावावर केली. आता वेळ आहे एकदिवसीय मालिकेची. टीम इंडिया टी 20i प्रमाणे वनडेतही अप्रतिम कामगिरी करण्याच्या प्रयत्नात असणार आहे. तर पराभूत इंग्लंड एकदिवसीय मालिकेतून पलटवार करण्याच्या हिशोबाने मैदानात उतरणार आहे. अशात ही मालिका चुरशीची होणार आहे. मालिकेतील सर्व सामने कुठे पाहायला मिळतील? सामन्यांना केव्हा सुरुवात होईल? या सर्व प्रश्नांची उत्तरं आपण जाणून घेऊयात
इंडिया इंग्लंड यांच्यातील एकदिवसीय मालिकेत 3 सामने खेळवले जाणार आहेत. सलामीचा सामना हा नागपूरमध्ये, दुसरा कटक तर तिसरा आणि अंतिम सामना हा अहमदाबामध्ये पार पडणार आहे. तिन्ही सामने 2 दिवसांच्या अंतराने खेळवण्यात येणार आहे. सलामीचा सामना हा 6 फेब्रुवारीला होणार आहे. त्यानंतर दुसरा सामना 9 तर तिसरा सामना 12 फेब्रुवारीला पार पडणार आहे.
इंडिया विरुद्ध इंग्लंड एकदिवसीय मालिका केव्हापासून?
इंडिया विरुद्ध इंग्लंड एकदिवसीय मालिकेला 6 फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे.




इंडिया विरुद्ध इंग्लंड एकदिवसीय मालिकेतील सामन्यांना किती वाजता सुरुवात होणार?
इंडिया विरुद्ध इंग्लंड एकदिवसीय मालिकेतील सामन्यांना दुपारी 1 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होईल. तर 1 वाजता टॉस होईल.
इंडिया विरुद्ध इंग्लंड एकदिवसीय मालिकेतील सामने टीव्हीवर कुठे पाहायला मिळतील?
इंडिया विरुद्ध इंग्लंड एकदिवसीय मालिकेतील सामने टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहायला मिळतील.
इंडिया विरुद्ध इंग्लंड एकदिवसीय मालिकेतील सामने मोबाईलवर कुठे पाहता येतील?
इंडिया विरुद्ध इंग्लंड एकदिवसीय मालिकेतील सामने मोबाईलवर डिज्ने प्लस हॉटस्टार एपवर पाहायला मिळलीत.
वनडे सीरिजसाठी इंग्लंड टीम : जोस बटलर (कॅप्टन), जोफ्रा आर्चर, गस ऍटकिन्सन, जेकब बेथेल, हॅरी ब्रूक, ब्रायडन कार्स, बेन डकेट, जेमी ओव्हरटन, लियाम लिव्हिंगस्टोन, आदिल रशीद, जो रूट, साकिब महमूद, फिल सॉल्ट आणि मार्क वुड.
वनडे सीरिजसाठी टीम इंडिया : रोहित शर्मा (कॅप्टन), शुबमन गिल (उपकर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंह, यशस्वी जयस्वाल, ऋषभ पंत, रवींद्र जडेजा आणि हर्षित राणा (बुमराहचा बॅकअप).