AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Prasidh Krishna | आयपीएलमध्ये 2018 साली पदार्पण, 3 वर्षांनी टीम इंडियामध्ये संधी, कोण आहे प्रसिद्ध कृष्णा?

इंग्लंड विरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी (india vs england odi series) प्रसिद्ध कृष्णाची (Prasidh Krishna) निवड करण्यात आली आहे.

Prasidh Krishna | आयपीएलमध्ये 2018 साली पदार्पण, 3 वर्षांनी टीम इंडियामध्ये संधी, कोण आहे प्रसिद्ध कृष्णा?
इंग्लंड विरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी (india vs england odi series) प्रसिद्ध कृष्णाची (Prasidh Krishna) निवड करण्यात आली आहे.
| Updated on: Mar 19, 2021 | 5:42 PM
Share

अहमदाबाद : इंग्लंड विरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी 18 सदस्यीय टीम इंडियाची (India vs England Odi Series) घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये 3 नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. (Suryakumar Yadav) सूर्यकुमार यादव, कृणाल पांड्या (Krunal Pandya) आणि प्रसिद्ध कृष्णा (Prasidh Krishna). यापैकी आपल्याला सूर्यकुमार आणि कृणाल माहिती आहे. पण प्रसिद्ध कृष्णाबाबत सर्वांनाच माहिती आहे, असं नाही. प्रसिद्धला या मालिकेसाठी संधी मिळाली आहे. यानिमित्ताने आपण प्रसिद्धबाबत जाणून घेणार आहोत. (india vs england odi series Prasidh Krishna has got a chance)

फर्स्ट क्लास क्रिकेट

प्रसिद्धचा जन्म 1996 मध्ये बंगळुरुत झाला होता. त्याने 2015 मध्ये प्रथम श्रेणी क्रिकेटला सुरुवात केली. प्रसिद्धने बांगलादेश ए संघाविरोधातील पदार्पणातील सामन्यात 49 धावा देत 5 विकेट्स घेण्याची कामगिरी केली होती. प्रसिद्धच्या शानदार गोलंदाजीच्या जोरावर कर्नाटकाने हा सामना 4 विकेट्सने जिंकला होता. प्रसिद्धने नुकत्याच झालेल्या विजय हजारे स्पर्धेत 7 सामन्यात 24.5 च्या सरासरीने 14 विकेट्स घेतल्या होत्या.

लिस्ट ए पदार्पण

प्रसिद्धने 2016-17 मध्ये कर्नाटकाकडून लिस्ट ए क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. विजय हजारे स्पर्धेतून त्याने पदार्पण केलं. प्रसिद्धने 2017-18 मध्ये मुश्ताक अली ट्रॉफीदरम्यान कर्नाटककडून टी 20 डेब्यू करण्याची संधी मिळाली. ऑगस्ट 2018 मध्ये कृष्णाला टीम इंडिया एकडून संघात स्थान देण्यात आलं. तसेच डिसेंबर 2018 मध्येच एमर्जिंग आशिया कप अंडर 23 संघात स्थान मिळालं.

प्रसिद्धने आतापर्यंत एकूण 9 प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये 34 विकेट्स घेण्याची कामगिरी केली आहे. यामध्ये त्याने एकदा 5 विकेट्स पटाकवल्या आहेत. तसेच त्याने 48 लिस्ट ए सामन्यात 81 फलंदाजांना बाहेरचा रस्ता दाखवला आहे. तसेच 40 टी 20 सामन्यात 33 विकेट्स मिळवल्या आहेत.

आयपीएलमध्ये 2018 साली पदार्पण

प्रसिद्धला 2018 मध्ये आयपीएलमध्ये खेळण्याची संधी मिळाली. कोलकाता नाईट रायडर्सने प्रसिद्धला आपल्या ताफ्यात घेतलं होतं. तेव्हापासून ते आतापर्यंत तो कोलकाताचे प्रतिनिधित्व करतोय. त्याने आयपीएलच्या 24 सामन्यात 44.50 च्या सरासरीने 18 विकेट्स घेतल्या आहेत.

निवड झाल्यानंतर पहिली प्रतिक्रिया

देशाकडून खेळण्यासाठी निवड होणं हे स्वप्नवत असतं. संघात निवड होण हे एका स्वप्नासारखं असतं. टीम इंडियाच्या विजयात मी योगदान देण्यासाठी तयार आहे. मला संधी दिली, यासाठी मी बीसीसीआयचा आभारी आहे. मी आता खेळण्यासाठी आणखी वाट पाहू शकत नाही, अशी प्रतिक्रिया प्रसिद्धने दिली.

दरम्यान या 3 सामन्यांच्या वनडे सीरिजला 23 मार्चपासून सुरुवात होत आहे. या मालिकेतील तिनही सामने पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या गंहुजे स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहेत.

एकदिवसीय मालिकेचे वेळापत्रक

23 मार्च | पहिली मॅच, गहुंजे स्टेडियम, पुणे | दुपारी 1 वाजून 30 मिनिटं

26 मार्च | दूसरी मॅच, गहुंजे स्टेडियम, पुणे | दुपारी 1 वाजून 30 मिनिटं

28 मार्च | तिसरी मॅच, गहुंजे स्टेडियम, पुणे | दुपारी 1 वाजून 30 मिनिटं

एकदिवसीय मालिकेसाठी टीम इंडिया

विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, शिखर धवन, शुभमन गिल, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, रिषभ पंत, केएल राहुल, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, कृणाल पंड्या, वॉशिंग्टन सुंदर, टी नटराजन, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा आणि शार्दुल ठाकूर.

संबंधित बातम्या :

India vs England Odi Series 2021 | इंग्लंड विरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा, ‘या’ गोलंदाजाला संधी

(india vs england odi series Prasidh Krishna has got a chance)

T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर
T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर.
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास.
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया.
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम.
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल.
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट.
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव.
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.