Ind vs Eng : ‘ठाकूर’ आठव्या नंबरला आला आणि ‘गब्बर’ झाला, शाब्बास ठाकूर !

| Updated on: Sep 06, 2021 | 6:16 AM

शार्दूलने दुसऱ्या डावात 72 बॉल्समध्ये 60 धावांची महत्वाची खेळी खेळली. शार्दूलनं ज्या पद्धतीनं बॅटींग केली, त्यामुळे टीम इंडियाची मिडल ऑर्डरची परेशानी बरीचशी कमी झाली. आता टेस्ट जिंकण्याची जबाबदारी टीम इंडियाच्या बॉलर्सवर आहे.

Ind vs Eng : ठाकूर आठव्या नंबरला आला आणि गब्बर झाला, शाब्बास ठाकूर !
शार्दूल ठाकूर
Follow us on

India vs England : शार्दूल ठाकूर…. (Shardul Thackur) एक असं नाव जे सध्या इतर कुठल्याही क्रिकेटपटूपेक्षा जास्त चर्चेत आहे आणि त्याला कारणही तसच आहे. शार्दूलनं कसोटीत आठव्या नंबरला येऊन जी कामगिरी केलीय ती भल्या भल्यांना जमलेली नाही. शार्दूलला आपण ऑलराऊंडर म्हणून ओळखतो. ओळखीला साजेशीच त्यानं कामगिरी केलीय. काही जण त्याला आता हार्दीक पांड्या म्हणायला लागलेत. का तर बॅटींग आणि बॉलिंग दोन्हीतही तो कमाल करतोय. ओवल टेस्टमध्ये शार्दूलनं खतरनाक बॅटींग केलीय. त्यामुळे मोठमोठ्या खेळाडूंच्या पंगतीत आता तो जाऊन बसलाय. शार्दूलच्या नावावर आठव्या नंबरच्या बॅटींगचा रेकॉर्ड तयार झालाय.

शार्दूल ठाकूरचा रेकॉर्ड

शार्दूल ठाकूर जागतिक क्रिकेटमधला आता सहावा असा बॅटसमन बनलेला आहे ज्यानं आठव्या नंबरवर खेळताना एकाच कसोटीच्या दोन्ही डावात अर्धशतक ठोकलय.शार्दूलशिवाय भारताकडून असा रेकॉर्ड फक्त हरभजनसिंग आणि रिद्धीमान साहाच्या नावावर आहे. ह्या दोघांनीही आठव्या नंबरवर खेळताना एकाच कसोटीच्या दोन्ही डावात अर्धशतकं झळकावली होती. नंबर आठनंतर म्हणजेच नवव्यानंबर असा कारनामा करण्याचं रेकॉर्ड भुवनेश्वरकुमारच्या नावावर आहे. त्यानं एकाच टेस्टच्या दोन्ही डावात अर्धशतक ठोकलं होतं तेही इंग्लंडच्याचविरोधात. कसोटी होती 2014 साली खेळली गेलेली नॉटिंघम.

शार्दूल ठाकूरच्या बॅटींगची कमाल

ओवलवर जी कसोटी खेळली जातेय, त्यात शार्दूल दोन मॅचनंतर खेळायला उतरला. पहिल्या डावात भारताचा स्कोअर होता 117 धावांवर सहा विकेट. अशा स्थितीत शार्दूल खेळायला उतरला आणि त्यानं भारताला 191 पर्यंत घेऊन गेला. पहिल्या डावात शार्दूलनं 36 बॉल्समध्ये शानदार 57 रन्स ठोकल्या. यात त्यानं 7 चौके आणि 3 छक्के मारले.

एवढच नाही तर दुसऱ्या डावातही शार्दूलनं कमाल केली. विशेष म्हणजे पहिल्या डावापेक्षा दुसऱ्या डावात शार्दूलनं मोठी जबाबदारी निभावली. दुसऱ्या डावात भारतानं 312 रन्सवर सहा विकेट गमावल्या त्यावेळेस शार्दूल मैदानात उतरला. टीम इंडियाकडे 211 रन्सची आघाडी होती. त्यानंतर शार्दूलनं ऋषभ पंतसोबत 100 धावांची महत्वाची पार्टनरशिप करत टीम इंडियाची आघाडी तीनशे पार पोहोचवली. शार्दूलच्याच खेळाच्या जोरावर टीम इंडिया इंग्लंडसमोर 368 धावाचं आव्हान उभं करु शकली.

शार्दूलने दुसऱ्या डावात 72 बॉल्समध्ये 60 धावांची महत्वाची खेळी खेळली. शार्दूलनं ज्या पद्धतीनं बॅटींग केली, त्यामुळे टीम इंडियाची मिडल ऑर्डरची परेशानी बरीचशी कमी झाली. आता टेस्ट जिंकण्याची जबाबदारी टीम इंडियाच्या बॉलर्सवर आहे. त्यातही शार्दूल काय करतो ते पहाणं औत्सुक्याचं ठरेल.

(India vs England Shardul thackur fifty in both inning 4th oval test)

हे ही वाचा :

IND vs ENG : आऊट झाल्यावर चुकीचं वागणं अंगाशी, ICC ने केएल राहुलला धडा शिकवला!

IND vs ENG : विराटची शतकाची प्रतिक्षा लांबली, ड्रेसिंग रुममध्ये परतताना विराट कमालीचा नाराज, पाहा PHOTO

जोस बटलरच्या घरी अवतरली परी, राजस्थान रॉयल्सने दिल्या खास शुभेच्छा, फोटोही केला शेअर