AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs NZ 1st ODI न्यूझीलंड विरुद्ध टीम इंडियाने टॉस जिंकला, अशी आहे Playing 11

IND vs NZ 1st ODI: आजपासून टीम इंडिया आणि न्यूझीलंडमध्ये वनडे सीरीज सुरु होत आहे. हैदराबादमध्ये पहिला सामना होत आहे. पहिल्या वनडेसाठी अशी आहे टीम इंडियाची प्लेइंग इलेव्हन

IND vs NZ 1st ODI न्यूझीलंड विरुद्ध टीम इंडियाने टॉस जिंकला, अशी आहे Playing 11
ind vs nz 1st odi
| Updated on: Jan 18, 2023 | 2:39 PM
Share

India vs New Zealand, 1st ODI Live Updates: न्यूझीलंडची टीम भारत दौऱ्यावर आली आहे. आजपासून दोन्ही टीममध्ये वनडे सीरीज सुरु होत आहे. सीरीजचा पहिला सामना हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळला जाणार आहे. न्यूझीलंडचा नियमित कॅप्टन केन विलियमसन या सीरीजचा भाग नाहीय. विकेटकीपर बॅट्समन टॉम लॅथमकडे टीमच नेतृत्व दिलय. टीम इंडियाचे दोन खेळाडू केएल राहुल आणि ऑलराऊंडर अक्षर पटेल या सीरीजमध्ये खेळत नाहीय. मागच्यावर्षातील शेवटच्या वनडे सीरीजमध्ये टीम इंडियाचा पराभव झाला. बांग्लादेशने टीम इंडियाला 2-1 असं पराभूत केलं. त्यानंतर टीम इंडियाने नव्या वर्षाची दमदार सुरुवात केली.

कोणी जिंकला टॉस

टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्माने टॉस जिंकलाय. त्याने पहिली बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. न्यूझीलंडची टीम प्रथम गोलंदाजी करणार आहे.

टीम इंडियाची प्लेइंग 11

रोहित शर्मा (कॅप्टन), शुभमन गिल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, इशान किशन, हार्दिक पंड्या, शार्दुल ठाकुर, वॉशिंगटन सुंदर, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज

विजयी सुरुवातीच लक्ष्य

श्रीलंकेविरुद्धच्या वनडे सीरीजमध्ये भारताने क्लीन स्वीप केलं. टीम इंडियाने 3-0 ने सीरीज जिंकली. आता न्यूझीलंड विरुद्ध सीरीजही अशाच प्रकारे जिंकण्याचा टीम इंडियाचा इरादा आहे.

रोहित-विराट दोघेही फॉर्ममध्ये

अंगठ्याला झालेल्या दुखापतीनंतर रोहित शर्माने श्रीलंकेविरुद्धच्या सीरीजमधून पुनरागमन केलं. तो चांगल्या फॉर्ममध्ये आहे. विराट कोहली सुद्धा फॉर्ममध्ये आहे. त्याने दोन शतक झळकावलीत. इशान किशनच्या जागी शुभमन गिलला संधी दिली. त्याने सुद्धा सलामीच्या जागेसाठी योग्य दावेदार असल्याच सिद्ध केलय. शुभमन गिलने एक शतक आणि अर्धशतक झळकावलं. तिरुअनंतपूरममध्य शुभमन गिलने सेंच्युरी ठोकली. त्यामुळे आजपासून न्यूझीलंड विरुद्ध सुरु होत असलेल्या सीरीजमध्ये तो सलामीला येईल. इशान किशनची बॅटिंग पोजिशन बदलणार

इशान किशनला श्रीलंकेविरुद्धच्या वनडे सीरीजमध्ये संधी मिळाली नाही. पण न्यूझीलंड विरुद्धच्या मालिकेत त्याचा टीममध्ये समावेश केला जाईल. फक्त त्याची बॅटिंग पोजिशन बदलली जाणार आहे. रोहित शर्माने पत्रकार परिषदेत हे सांगितलं. इशान किशन न्यूझीलंड विरुद्ध पहिल्या वनडे सामन्यात मीडल ऑर्डरमध्ये बॅटिंग करताना दिसेल. बांग्लादेश विरुद्ध शेवटच्या वनडेमध्ये त्याने डबल सेंच्युरी झळकवली होती.

Follow Us
परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स...
FDA Raid | परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्सचा अन्न परवाना निलंबित
गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात...
Mumbai | गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात फलकांवर बंदी; उल्लंघन केल्यास कारवाई होणार
पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात
Nashik | पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात; संतप्त नागरिकांचा महापालिकेत ठिय्या
बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर
Navi Mumbai | बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर; दुकान मालकाने चूक मान्य करत...
मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात..
Mumbai Local | मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात रुळावरून पायी चालण्याची आली वेळ
अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा
Amit Shah | अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा, पुढे म्हणाले...
नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब...
Nanded | नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब; शेतकऱ्यांनी चौकात मांडली करपलेल्या पिकांची व्यथा
जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू...
Radhakrishna Vikhepatil | जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू... मराठा आरक्षणावर मोठी अपडेट समोर
तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं!
Shivendraraje Bhonsle | तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं! शिवेंद्रराजे भोसले स्पष्टच बोलले, पुढे म्हणाले...
संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; बन यांचा सडेतोड पलटवार
Sanjay Raut Vs Navnath Ban | संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; नवनाथ बन यांचा सडेतोड पलटवार, मुंबई दौऱ्यावरून वार- पलटवार सुरूच