Rohit Sharma – Live मॅचमध्ये रोहित शर्माचा झाला ‘गजनी’, सगळेच हैराण, VIDEO

टीम इंडिया आणि न्यूझीलंडमध्ये काल रायपूर येथे दुसरा वनडे सामना झाला. ही मॅच टीम इंडियाने आरामात जिंकली. पण या मॅचमध्ये टॉसच्यावेळी जे घडलं, त्याने सगळेच हैराण झाले.

Rohit Sharma - Live मॅचमध्ये रोहित शर्माचा झाला 'गजनी', सगळेच हैराण, VIDEO
ind vs nz Image Credit source: Screengrab
Follow us
| Updated on: Jan 22, 2023 | 8:31 AM

रायपूर – टीम इंडिया आणि न्यूझीलंडमध्ये काल रायपूर येथे दुसरा वनडे सामना झाला. ही मॅच टीम इंडियाने आरामात जिंकली. पण या मॅचमध्ये टॉसच्यावेळी जे घडलं, त्याने सगळेच हैराण झाले. टॉस जिंकल्यानंतर रोहित शर्मा काय सांगायचय, तेच विसरला. काय करायचय, तेच त्याला आठवलं नाही. रोहितने आपलं डोकं पकडलं. न्यूझीलंडचा कॅप्टन टॉम लॅथम आणि कॉमेंटेटर रवी शास्त्री रोहितच्या तोंडाकडे पाहत बसले. जवळपास 1 मिनिट विचार केल्यानंतर रोहितने गोलंदाजी करण्याचा आपला निर्णय सांगितला. टॉस जिंकल्यानंतर असं अचानक काय झालं? ते रोहितने नंतर सांगितलं.

रोहित काय म्हणाला?

टॉस जिंकल्यानंतर काय करायचं? याबद्दल टीममध्ये भरपूर चर्चा झाली होती. त्यामुळे काय निर्णय घ्यायचा? ते 1 मिनिटासाठी मी विसरुन गेलो. दुसऱ्या वनडेसाठी टीम इंडियाने प्लेइंग 11 मध्ये कुठलाही बदल केला नव्हता.

टीम इंडियाचा आरामात विजय

टीम इंडियाने न्यूझीलंडवर दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात 8 विकेट्सने विजय मिळवला. न्यूझीलंडने टीम इंडियाला विजयासाठी 109 धावांचे माफक आव्हान दिले होते. हे आव्हान भारतीय संघाने 2 विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण केलं. टीम इंडियाकडून कॅप्टन रोहित शर्माने सर्वाधिक 51 धावा केल्या. तर शुबमन गिल याने नाबाद 40 धावांचं योगदान दिलं. या विजयासह टीम इंडियाने 3 सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशा एकतर्फी फरकाने मालिकाही जिंकली आहे. व्हिडिओ होतोय व्हायरल

रोहित शर्माच्या टॉसचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. रोहितचा हा व्हिडिओ पाहून युजवेंद्र चहल, मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी आपलं हसू रोखू शकले नाहीत. ते त्याचवेळी वॉर्मअप करत होते. टॉसच्यावेळी जे घडलं, त्यानंतर फॅन्सनी रोहितला गजनी म्हटलं.

Non Stop LIVE Update
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी.
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड.
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा.
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक.
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा.
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?.
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले.
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत.
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.