IND vs NZ 3rd ODI : कॉल देऊन इशान फसला, अखेर सीनियरसाठी द्यावा लागला बळी, VIDEO

IND vs NZ 3rd ODI : टीम इंडियाने काल न्यूझीलंड विरुद्ध तिसरा वनडे सामना जिंकून मालिकेत क्लीन स्वीप केलं. टीम इंडियाने मॅच जिंकली. पण समन्वयाच्या अभावामुळे टीम इंडियाने इशान किशन सारख्या चांगल्या बॅट्समनचा विकेट स्वस्तात गमावला.

IND vs NZ 3rd ODI : कॉल देऊन इशान फसला, अखेर सीनियरसाठी द्यावा लागला बळी, VIDEO
ind vs nz 3rd odi Image Credit source: BCCI
Follow us
| Updated on: Jan 25, 2023 | 7:55 AM

इंदोर – टीम इंडियाने काल न्यूझीलंड विरुद्ध तिसरा वनडे सामना जिंकून मालिकेत क्लीन स्वीप केलं. टीम इंडियाने मॅच जिंकली. पण समन्वयाच्या अभावामुळे टीम इंडियाने इशान किशन सारख्या चांगल्या बॅट्समनचा विकेट स्वस्तात गमावला. इशान विकेटवर टिकला असता, कदाचित टीम इंडियाने काल 400 धावांचा टप्पा ओलांडला असता. इशान किशन आणि विराट कोहलीमध्ये सिंगल धावा घेताना गफलत झाली. परिणामी इशान रनआऊट झाला. विराटला धाव घेण्यासाठी कॉल करणं इशानला चांगलच महाग पडलं. तिसऱ्या वनडेमध्ये कॅप्टन रोहित शर्मा आणि शुभमन गिलने पहिल्या विकेटसाठी 212 धावांची भागीदारी केली.

त्यांच्याकडून होत्या अपेक्षा

हे सुद्धा वाचा

ही जोडी तुटल्यानंतर विराट कोहली आणि इशान किशनच्या बॅटिंगवर क्रिकेटप्रेमींच्या नजरा खिळल्या होत्या. दोघे मोठी भागीदारी करतील अशी अपेक्षा होती. पण 35 व्या ओव्हरमध्ये इशान रनआऊट झाला. जेकब डफीच्या ओव्हरमधील तिसऱ्या चेंडूवर इशानने कव्हरमध्ये हिट केलं. कोहलीला सिंगलसाठी कॉल दिला.

क्रिजमध्ये जाण्यासाठी फिरला, पण…

कोहली रन्स घेण्यासाठी धावला. पण त्याचवेळी इशानने आपला इरादा बदलला. कव्हरमध्ये फिल़्डिंग करणाऱ्या हेनरी निकोल्सने चेंडू विकेटकीपरकडे फेकला. कोहली त्यावेळी स्ट्राइकच्या खूप जवळ पोहोचला होता. त्यावेळी इशान क्रिजमध्ये जाण्यासाठी फिरला, पण तो पर्यंत उशीर झाला होता. कोहलीसाठी मागे परतण अशक्य होतं. कोहली इशानच्या आधी स्ट्राइकवर पोहोचला होता. खिन्न अंतकरणाने मैदानातून परतला

अखेर इशानला आपल्या विकेटचा बळी द्यावा लागला. तो 17 धावांवर बाद झाला. इशान सहज क्रिजमध्ये पोहोचू शकत होता, असं रिप्लेमध्ये स्पष्ट दिसत होतं. पण त्याने कोहलीला क्रीजमध्ये पोहोचू दिलं. अशा प्रकारने निराश होऊन इशान मैदानातून परतला.

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.