Team India : टीम इंडियाची 1 नंबर कामगिरी, 4 दिवसातच इंग्लंडचा माज उतरवला

टीम इंडियाने न्यूझीलंडवर तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात 90 धावांनी शानदार विजय मिळवला. या विजयासह भारताने धमाकेदार कामगिरी केली. टीम इंडिया एकदिवसीय रँकिगमध्ये अव्वलस्थानी पोहचली.

Team India : टीम इंडियाची 1 नंबर कामगिरी, 4 दिवसातच इंग्लंडचा माज उतरवला
Follow us
| Updated on: Jan 24, 2023 | 10:17 PM

इंदूर : टीम इंडियाने न्यूझीलंडवर तिसऱ्या वनडेत 90 धावांनी विजय मिळवला. या विजयासह टीम इंडियाने न्यूझीलंडला क्लीन स्वीप केलं. विशेष म्हणजे टीम इंडियाने आयसीसी वनडे रॅकिंगमध्ये अव्वल स्थान पटकावलं. टीम इंडिया 1 नंबर टीम झाली आहे. इंग्लंडला अवघे 4 दिवसच अव्वलस्थानी राहता आलं. टीम इंडियाने न्यूझीलंडला दुसऱ्या वनडेत 21 जानेवारीला 8 विकेट्सने पराभूत केलं होतं. त्यानंतर न्यूझीलंडची रँकिंगमध्ये घसरण होऊन इंग्लंड अव्वलस्थानी पोहचली होती. तर न्यूझीलंड दुसऱ्या क्रमांकावर फेकली गेली होती.

दुसऱ्या वनडे विजयासह टीम इंडियाने चौथ्या क्रमांकावरुन थेट तिसऱ्या क्रमांकावर झेप घेतली. तर आता इंदूरमध्ये 90 धावांनी विजय मिळवून टीम इंडियाने एकूण 2 स्थानाने झेप घेतली आहे. इंदूर वनडेआधी टीम इंडिया, न्यूझीलंड आणि इंग्लंड तिघांचेही रेटिंग्स बरोबर होत्या. तिन्ही टीमचे रेटिंग्स पॉइंट्स 113 इतके होते.

एकूण पॉइंट्सच्या आधारावर इंग्लंड अव्वलस्थानी होतं. मात्र टीम इंडियाने इंदूर विजयासह 1 रेटिंग पॉइंट मिळवला आणि 114 पॉइंट्ससह अव्वलस्थानही काबीज केलं. आता इंग्लंड दुसऱ्या आणि न्यूझीलंड चौथ्या स्थानावर आहे.

हे सुद्धा वाचा

सामन्याचा धावता आढावा

टीम इंडियाने निर्धारित 50 ओव्हरमध्ये 9 विकेट्स गमावून 385 धावा केल्या. त्यामुळे न्यूझीलंडला विजयासाठी 386 धावांचं आव्हान मिळालं. टीम इंडियाकडून शुबमन गिल आणि कॅप्टन रोहित शर्मा या सलामी जोडीने शतकी खेळी केली. शुबमनने सर्वाधिक 112 धावा केल्या. तर रोहितने 3 वर्षानंतर शतक ठोकलं. रोहितने 101 रन्सचं योगदान दिलं.

त्यानंतर विजयी आव्हानासाठी न्यूझीलंड मैदानात आली. किवींनी विजयासाठी 386 धावांचे लक्ष्य होते. मात्र टीम इंडियाच्या गोलंदाजांनी न्यूझीलंडला 41.2 ओव्हरमध्ये 295 धावांवरत ऑलआऊट केलं.

न्यूझीलंडकडून डेव्हॉन कॉनवेने सर्वाधिक 138 धावांची खेळी केली. तर हेनरी निकोलसने 42 रन्स केल्या. या दोघांव्यतिरिक्त भारतीय गोलंदाजांनी न्यूझीलंडच्या फलंदाजांना मैदानात फार टिकू दिलं नाही.

टीम इंडियाकडून शार्दुल ठाकूर आणि कुलदीप यादव या दोघांनी प्रत्येकी 3 विकेट्स घेतल्या. युझवेंद्र चहलने 2 फलंदाजांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. तर हार्दिक पांड्या आणि उमरान मलिक या दोघांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.

टीम इंडिया प्लेइंग इलेव्हन : रोहित शर्मा (कॅप्टन), शुबमन गिल, विराट कोहली, ईशान किशन, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, वॉशिंगटन सुंदर, शार्दुल ठाकुर, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल आणि उमरान मलिक.

न्यूझीलंड प्लेइंग इलेव्हन : फिन एलन, डेवन कॉनवे, हेनरी निकल्स, डॅरेल मिचेल, टॉम लॅथम, ग्लेन फिलिप्स, मायकल ब्रेसवेल, मिचेल सँटनर, जॅकब डफी, ब्लेयर टकनर आणि लॉकी फर्ग्यूसन.

Non Stop LIVE Update
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.
ही धमकी समजा नाहीतर... , राज ठाकरेंच्या टीकेवरून मनसेचा राऊतांना इशारा
ही धमकी समजा नाहीतर... , राज ठाकरेंच्या टीकेवरून मनसेचा राऊतांना इशारा.
सांगलीत तिहेरी लढत, मविआतच बंड अन् ठाकरेंचं वाढलं टेन्शन
सांगलीत तिहेरी लढत, मविआतच बंड अन् ठाकरेंचं वाढलं टेन्शन.
अमरावतीत शरद पवारांचा माफीनामा, ... तेव्हा चूक झाली, यापुढं होणार नाही
अमरावतीत शरद पवारांचा माफीनामा, ... तेव्हा चूक झाली, यापुढं होणार नाही.
वंचित उमेदवाराची माघार, भाजपची डोकेदुखी तर काँग्रेसला मिळणार दिलासा
वंचित उमेदवाराची माघार, भाजपची डोकेदुखी तर काँग्रेसला मिळणार दिलासा.
शिंदेंच्या बंडाचा आणखी एक पत्ता उघडला, टपरीवरून शिंदेंचा ठाकरेंना फोन
शिंदेंच्या बंडाचा आणखी एक पत्ता उघडला, टपरीवरून शिंदेंचा ठाकरेंना फोन.
विशाल पाटलांची बंडखोरी कायम, माघार नाहीच; ‘या’ चिन्हावर लोकसभा लढणार
विशाल पाटलांची बंडखोरी कायम, माघार नाहीच; ‘या’ चिन्हावर लोकसभा लढणार.