
टीम इंडियाने चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेतील शेवटच्या सामन्यात 2 मार्च रोजी न्यूझीलंडवर 44 धावांनी मात करत सलग तिसरा विजय मिळवला. दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये हा सामना खेळवण्यात आला. भारतीय संघाने या सामन्यात प्रथम फलंदाजी करत 249 धावा केल्या. भारताकडून श्रेयस अय्यरने सर्वाधिक 79 धावा केल्या. तर न्यूझीलंडकडून वेगवान गोलंदाज मॅट हेन्रीने 5 विकेट्स घेतल्या. प्रत्युत्तरादाखल संपूर्ण न्यूझीलंडचा डाव फक्त 205 धावांवर आटोपला. टीम इंडियाकडून फिरकी गोलंदाज वरुण चक्रवर्ती याने 5 विकेट्स घेतल्या. केन विल्यमसन याने 81 धावा करुन न्यूझीलंडला विजयी करण्याचे प्रयत्न केले. मात्र त्या धावा न्यूझीलंडला जिंकण्यासाठी पुरेशा नव्हत्या. भारताचा आता उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाशी सामना होईल. तर न्यूझीलंडचा सामना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणार आहे.
टीम इंडियाने दुबईत न्यूझीलंडवर 44 धावांनी विजय मिळवला आहे. टीम इंडियाने न्यूझीलंडसमोर 250 धावांचं आव्हान ठेवलं होतं. मात्र टीम इंडियाने न्यूझीलंडला 205 धावांवर रोखत 44 धावांनी विजय मिळवला. वरुन चक्रवर्ती हा टीम इंडियाच्या विजयाचा हिरो ठरला. वरुणने सर्वाधिक 5 विकेट्स घेतल्या. तर इतर गोलंदाजानीही विजयात योगदान दिलं. टीम इंडियाचा हा साखळी फेरीतील एकूण आणि सलग तिसरा विजय ठरला. टीम इंडियाने याआधी पाकिस्तान आणि बांगलादेशचा धुव्वा उडवला होता.
न्यूझीलंडने आठवी विकेट गमावली आहे. वरुण चक्रवर्ती याने कॅप्टन मिचेल सँटनर याला 28 धावांवर क्लिन बोल्ड केलं आहे.
अक्षर पटेल याने न्यूझीलंडला मोठा झटका दिला आहे. विकेटकीपर केएल राहुल याने विलियमसनला 81 रन्सवर स्टंपिंग केलं. टीम इंडियाने यासह विजयाच्या दिशेने एक पाऊल टाकलं आहे.
न्यूझीलंडने सहावी विकेट गमावली आहे. वरुण चक्रवर्ती याने मायकल ब्रेसवेल याला एलबीडब्ल्यू आऊट केलं आहे. ब्रेसवेल याने 2 धावा केल्या.
न्यूझीलंडने पाचवी विकेट गमावली आहे. ग्लेन फिलिप्स 12 धावा करुन आऊट झाला. वरुण चक्रवर्ती याने ग्लेनला एलबीडब्ल्यू आऊट केलं. ग्लेन फिलिप्स याने 12 धावा केल्या.
रवींद्र जडेजाने न्यूझीलंडच्या चौथ्या फलंदाजाला मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. न्यूझीलंडने टॉम लेथम याच्या रुपात चौथी विकेट गमावली आहे. जडेजाने लेथमला 14 धावांवर एलबीडब्ल्यू केलं.
कुलदीप यादव याने टीम इंडियाला तिसरी विकेट मिळवून दिली आहे. किवींनी डॅरेल मिचेल याच्या रुपात तिसरी विकेट गमावली. कुलदीपने मिचेलला 17 धावांवर एलबीडबल्यू आऊट केलं.
टीम इंडियाने 250 धावांचा पाठलाग करणाऱ्या न्यूझीलंडला 2 झटके दिले आहेत. किवींनी 23 ओव्हरमध्ये 2 विकेट्स गमावून 87 धावा केल्या आहेत. टीम इंडियाने न्यूझीलंडला 12 व्या ओव्हरमध्ये दुसरा झटका दिला. त्यामुळे टीम इंडिया तिसऱ्या विकेटच्या शोधात आहे.
मिस्ट्री स्पिनर वरुण चक्रवर्ती याने विल यंग याला क्लिन बोल्ड करत चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतील पहिलीवहिवी वैयक्तिक विकेट मिळवली आहे. न्यूझीलंडलने यासह दुसरी विकेट गमावली.
हार्दिक पंड्या याने रचीन रवींद्र याला अक्षर पटेल याच्या हाती कॅच आऊट करत टीम इंडियाला पहिली विकेट मिळवून दिली. आहे. अक्षर पटेल याने अप्रतिम कॅच घेतली. रचीनने 6 धावा करुन मैदानाबाहेरचा रस्ता धरला.
न्यूझीलंडच्या बॅटिंगला सुरुवात झाली आहे. विल यंग-रचीन रवींद्र सलामी जोडी मैदानात आली आहे. टीम इंडियाने न्यूझीलंडसमोर 250 धावांचं आव्हान ठेवलं आहे.
टीम इंडियाने न्यूझीलंडसमोर विजयासाठी 250 धावांचं आव्हान ठेवलं आहे. भारताच्या डावाची सुरुवात अडखळत झाली. तीन विकेट झटपट बाद झाल्यानंतर श्रेयस अय्यरने डाव सावरला. त्याच्या खेळीच्या जोरावर टीम इंडियाने 50 षटकात 9 गडी गमवून 249 धावा केल्या.
टीम इंडियाने सातवी विकेट गमावली आहे. न्यूझीलंडचा अनुभवी खेळाडू केन विलियमसन याने जडेजाचा अप्रतिम कॅच घेतला. जडेजा 16 धावा करुन माघारी परतला.
टीम इंडियाने सहावी विकेट गमावली आहे. केएल राहुल कॅच आऊट झाला आहे. केएलने 29 बॉलमध्ये 23 रन्स केल्या.
टीम इंडियाने श्रेयस अय्यर याच्या रुपात पाचवी विकेट गमावली आहे . श्रेयस अय्यर याने 98 बॉलमध्ये 2 सिक्स आणि 4 फोरसह 79 रन्स केल्या.
न्यूझीलंडच्या रचीन रवींद्र याने श्रेयस अय्यर-अक्षर पटेल सेट जोडी फोडली आहे. रचीनने अक्षर पटेल याला 42 धावांवर केन विलियमसन याच्या हाती कॅच आऊट केलं.
श्रेयस अय्यर याने न्यूझीलंडविरुद्ध निर्णायक क्षणी अर्धशतकी खेळी करत टीम इंडियाचा डाव सावरला आहे. श्रेयसने 75 बॉलमध्ये 4 फोरसह हे अर्धशतक झळकावलं. तर दुसऱ्या बाजूने अक्षर पटेल याने श्रेयसला चांगली साथ दिली.
श्रेयस अय्यर-अक्षर पटेल जोडी सेट झाली आहे. या दोघांनी चौथ्या विकेटसाठी नाबाद अर्धशतकी भागीदारी केली आहे. टीम इंडियाने 30 धावांवर तिसरी विकेट गमावली होती. त्यानंतर या दोघांनी टीम इंडियाचा डाव सावरला.
टीम इंडियाने 30 धावांवर तिसरी विकेट गमावली. विराट कोहली आऊट झाला. त्यानंतर आता श्रेयस अय्यर आणि अक्षर पटेल ही जोडी झुंज देत आहे. या जोडीवर मोठी जबाबदारी आहे.
टीम इंडियाने 30 धावांवर तिसरी आणि मोठी विकेट गमावली आहे. विराट कोहली 300 व्या एकदिवसीय सामन्यात 11 धावांवर आऊट झाला. ग्लेन फिलिप्स याने अप्रतिम कॅच घेत विराटला मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला.
शुबमन गिलनंतर कर्णधार रोहित शर्मा 15 धावा करून तंबूत परतला आहे. जेमिसनने त्याला बाद केलं.
दोन सामन्यात चमकदार कामगिरी केल्यानंतर तिसऱ्या सामन्यात शुबमन गिल फेल गेला आहे. अवघ्या 2 धावा करून तंबूत परतण्याची वेळ आली आहे.
न्यूझीलंड विरुद्ध टीम इंडिया सामन्याला सुरुवात झाली आहे. न्यूझीलंडने टॉस जिंकून टीम इंडियाला बॅटिंगसाठी भाग पाडलं आहे. टीम इंडियाकडून कर्णधार रोहित शर्मा आणि उपकर्णधार शुबमन गिल सलामी जोडी मैदानात आली आहे.
भारत (प्लेइंग इलेव्हन): रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, अक्षर पटेल, केएल राहुल (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती.
न्यूझीलंड (प्लेइंग 11): विल यंग, रचिन रवींद्र, केन विल्यमसन, डॅरिल मिशेल, टॉम लॅथम (विकेटकीपर), ग्लेन फिलिप्स, मायकेल ब्रेसवेल, मिशेल सँटनर (कर्णधार), मॅट हेन्री, काइल जेमिसन, विल्यम ओरोर्क.
नाणेफेकीचा कौल न्यूझीलंडच्या बाजूने लागला असून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे.
न्यूझीलंडविरुद्धचा हा सामना टीम इंडियाचा अनुभवी फलंदाज आणि माजी कर्णधार विराट कोहली याच्या एकदिवसीय कारकीर्दीतील 300 वा सामना ठरणार आहे. टीम इंडियाकडून आतापर्यंत सचिन तेंडुलकर, महेंद्रसिंह धोनी, राहुल द्रविड, मोहम्मद अजहरुद्दीन, सौरव गांगुली आणि युवराज सिंह या 6 खेळाडूंनी टीम इंडियाचं 300 पेक्षा अधिक एकदिवसीय सामन्यांमध्ये प्रतिनिधित्व केलं आहे.
मिचेल सँटनर (कर्णधार), विल यंग, डेव्हॉन कॉनवे, केन विल्यमसन, रचिन रवींद्र, टॉम लॅथम (विकेटकीपर), ग्लेन फिलिप्स, मायकेल ब्रेसवेल, मॅट हेन्री, काइल जेमिसन, विल्यम ओरुर्के, डॅरिल मिशेल, नॅथन स्मिथ, मार्क चॅपमन आणि जेकब डफी.
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, अक्षर पटेल, केएल राहुल (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, हर्षित राणा, मोहम्मद शमी, कुलदीप यादव, ऋषभ पंत, वॉशिंग्टन सुंदर, वरुण चक्रवर्ती आणि अर्शदीप सिंग
टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड यांच्यापैकी जो सामना जिंकेल त्यानंतर उपांत्य फेरीत कोण कुणाविरुद्ध भिडणार? हे स्पष्ट होईल. टीम इंडियाने न्यूझीलंडविरुद्ध विजय मिळवल्यास रोहितसेना उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध भिडेल. तसेच टीम इंडिया न्यूझीलंडविरुद्ध पराभूत झाली तर सेमी फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळावं लागेल.