IND vs NZ, T20 World Cup Final Score Update : टीम इंडिया चॅम्पियन, सलग दुसऱ्यांदा जेतेपदावर नाव कोरलं
India vs New Zealand Final Match Score Updates and Highlights In Marathi T20 world cup 2026 : भारताने अंतिम फेरीत न्यूझीलंडचा 96 धावांनी धुव्वा उडवला. या सामन्यात भारताने विजयासाठी 255 धावांचं आव्हान ठेवलं होतं. पण न्यूझीलंडचा संघ 159 धावा करू शकला. भारताने सलग दुसऱ्यांदा जेतेपद मिळवलं आहे.

आयसीसी टी 20I वर्ल्ड कप स्पर्धेतील 10 व्या पर्वात भारताने जेतेपदावर नाव कोरलं आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यात अंतिम फेरीचा सामना झाला. या सामन्यात न्यूझीलंडने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि भारताला प्रथम फलंदाजी दिली. पण हा निर्णय चुकला असंच म्हणावं लागेल. कारण भारताने या सामन्यात 255 धावा केल्या आणि न्यूझीलंडसमोर मोठं आव्हान ठेवलं. हे आव्हान गाठताना न्यूझीलंडचा संघ 159 धावा करू शकला. भारताने हा सामना 96 धावांनी जिंकला आणि जेतेपदावर तिसऱ्यांदा नाव कोरलं.
LIVE Cricket Score & Updates
-
T20 World Cup 2026 Final IND vs NZ Live Score : टीम इंडिया चॅम्पियन, सलग दुसऱ्यांदा जेतेपदावर नाव कोरलं
टीम इंडियाने अंतिम सामन्यात न्यूझीलंडला पराभूत करून जेतेपदावर नाव कोरलं आहे. भारताने सलग दुसऱ्यांदा जेतेपदावर नाव कोरलं आहे. भारताने न्यूझीलंडसमोर 255 धावांचं लक्ष ठेवलं होतं. पण न्यूझीलंडने या धावांचा पाठलाग करताना नांगी टाकली. न्यूझीलंडचा संघ 159 धावा करू शकला. भारताने हा सामना 96 धावांनी जिंकला आणि जेतेपद मिळवलं.
-
T20 World Cup 2026 Final IND vs NZ Live Score : न्यूझीलंडला नववा धक्का
न्यूझीलंडला मिचेल सँटनरच्या रुपाने नववा धक्का बसला आहे. आता हा सामना केवळ औपचारिक राहिला आहे. भारताने हा सामना जिंकला आहे. जसप्रीत बुमराहने मिचेल सँटनरची विकेट काढली आणि संघाला विजयाचा जवळ आणलं.
-
-
T20 World Cup 2026 Final IND vs NZ Live Score : बुमराहचे दोन चेंडूत दोन विकेट
जसप्रीत बुमराहने 16 व्या षटकात कमाल केली. जीमी नीशमची विकेट काढल्यानंतर दुसऱ्या चेंडूवर मॅट हेन्रीला चालतं केलं. त्यामुळे जसप्रीत बुमराहला हॅटट्रीकची संधी होती. पण हॅटट्रीकची संधी हुकली. आता सामन्यावर भारताची पकड आहे.
-
T20 World Cup 2026 Final IND vs NZ Live Score : न्यूझीलंडला सातवा धक्का, भारताचा विजय कन्फर्म
टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारत विजयाच्या जवळपास पोहोचला आहे. न्यूझीलंडला जेमी नीशमच्या रुपाने सातवा धक्का बसला आहे. त्यामुळे न्यूझीलंडच्या हातून हा सामना पूर्णपणे गेला आहे. जसप्रीत बुमराहने सातवं यश मिळवून दिलं.
-
T20 World Cup 2026 Final IND vs NZ Live Score : न्यूझीलंडला सहावा धक्का
न्यूझीलंडला डॅरेल मिचेलच्या रुपाने सहावा धक्का बसला आहे. त्यामुळे टीम इंडिया विजयाच्या वेशीवर येऊन ठेपली आहे. आता शेपटच्या फलंदाजांना झटपट बाद करण्याचं आव्हान आहे. डेरिल मिचेल 17 धावा करून बाद झाला.
-
India vs New Zealand Live : टीम इंडियाची सामन्यावर घट्ट पकड, सूर्यासेना विजयाच्या दिशेने!
टीम इंडियाने सामन्यावर घट्ट पकड मिळवली आहे. टीम इंडियाने न्यूझीलंडसमोर 256 रन्सचं टार्गेट ठेवलं आहे. न्यूझीलंडने या धावांचा पाठलाग करताना 12 ओव्हरमध्ये 5 विकेट्स गमावून 119 धावा केल्या आहेत. त्यामुळे न्यूझीलंडला विजयासाठी आणखी 48 बॉलमध्ये137 रन्सची गरज आहे.
-
India vs New Zealand Live : इशानची कमाल कॅच, टीम सायफर्ट आऊट, न्यूझीलंडला पाचवा झटका
वरुण चक्रवर्ती याने टीम सायफर्ट याला सामन्यातील नवव्या ओव्हरमधील पहिल्या बॉलवर इशान किशन याच्या हाती कॅच आऊट केलं. इशानने सायफर्टचा बाउंड्री लाईनवर जबरदस्त कॅच घेतली. सायफर्टने 26 बॉलमध्ये 52 धावा केल्या.
-
India vs New Zealand Live : हार्दिकला पहिलं यश, मार्क चॅपमॅन आऊट, न्यूझीलंडला चौथा धक्का
हार्दिक पंड्या याने मार्क चॅपमन याला 3 रन्सवर आऊट करत न्यूूझीलंडला चौथा झटका दिला आहे. हार्दिकने आठव्या ओव्हरमधील चौथ्या बॉलवर मार्कला बोल्ड केलं. यासह हार्दिकने वैयक्तिक पहिली विकेट मिळवली.
-
India vs New Zealand Live : बापू सरस, अक्षरकडून ग्लेन फिलिप्स क्लिन बोल्ड, न्यूझीलंडला तिसरा झटका
अक्षर पटेल यान ग्लेन फिलिप्स याला 5 रन्सवर बोल्ड करत वैयक्तिक दुसरी विकेट मिळवसी आहे. टीम इंडियाने यासह न्यूझीलंडला तिसरा झटका दिला आहे. त्यामुळे न्यूझीलंडची 5 ओव्हरमध्ये 3 आऊट 47 अशी स्थिती झाली आहे.
-
India vs New Zealand Live : इशानकडून जबरदस्त कॅच, रचीन रवींद्र आऊट न्यूझीलंडला दुसरा झटका
जसप्रीत बुमराह याने त्याच्या कोट्यातील पहिल्या आणि डावातील तिसऱ्या ओव्हरमधील पहिल्या बॉलवर रचीन रवींद्र याला आऊट केलं. इशान किशन याने रचीन रवींद्र याचा अप्रतिम कॅच घेतला. रचीनने 2 बॉलमध्ये 1 धाव केली.
-
India vs New Zealand Live : गेला रे, फिन एलन 9 धावांवर आऊट, न्यूझीलंडला पहिला झटका, भारताला मोठा दिलासा
टीम इंडियाने फिन एलन आऊट करत न्यूझीलंडला पहिला झटका दिला आहे. शिवम दुबे याने फिन एलन याचा झिरोवर कॅच सोडला होता. त्यामुळे टीम इंडियाचं टेन्शन वाढलं होतं. मात्र अक्षरने न्यूझीडंलच्या डावातील तिसऱ्या ओव्हरमधील चौथ्या बॉलवर फिन एलन याला तिलक वर्मा याच्या हाती कॅच आऊट केलं. एलनने 9 धावा केल्या.
-
India vs New Zealand Live : शिवम दुबेकडून घोडचूक, फिन एलन याला झिरोवर जीवनदान
शिवम दुबेकडून घोडचूक झाली आहे. शिवमने न्यूझीलंडचा स्फोटक फलंदाज फिन एलन याला झिरोवर जीवनदान दिलं आहे. पहिल्याच ओव्हरमध्ये अर्शदीप सिंह याने टाकलेल्या पाचव्या बॉलवर फिनने मोठा फटका मारला. शिवमला ही कॅच घेऊन फिनला आऊट करण्याची संधी होती. मात्र शिवमने कॅच सोडला.
-
India vs New Zealand Live : न्यूझीलंडच्या बॅटिंगला सुरुवात, एलन-सायफर्ट सलामी जोडी मैदानात
न्यूझीलंडच्या बॅटिंगला सुरुवात झाली आहे. टीम इंडियाने न्यूझीलंडसमोर 256 रन्सचं टार्गेट ठेवलं आहे. न्यूझीलंडकडून टीम सायफर्ट आणि फिन एलन ही सलामी जोडी मैदानात आहे. तर टीम इंडियाकडून अर्शदीप सिंह पहिली ओव्हर टाकत आहे.
-
India vs New Zealand Live : शिवमचा फिनिशिंग टच, टीम इंडियाच्या अंतिम सामन्यात 255 धावा, न्यूझीलंड जिंकणार?
टीम इंडियाच्या फलंदाजांनी केलेल्या वादळी खेळीच्या जोरावर न्यूझीलंड विरुद्ध 250 पार मजल मारली आहे. टीम इंडियाने न्यूझीलंडसमोर 256 धावांचं आव्हान ठेवलं आहे. टीम इंडियाने 20 ओव्हरमध्ये 5 विकेट्स गमावून 255 धावा केल्या. टीम इंडियासाठी टॉप ऑर्डरमधील 3 फलंदाजांनी 50+ धावा केल्या. तर शिवम दुबे याने शेवटच्या ओव्हरमध्ये 24 धावा करुन फिनिशिंग टच दिला. शिवमने नाबाद 26 धावांची खेळी केली. आता न्यूझीलंड कशी सुरुवात करते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.ं
-
India vs New Zealand Live : हार्दिक पंड्या आऊट, न्यूझीलंडने भारताला रोखलं
न्यूझीलंडने टीम इंडियाला पाचवा झटका दिला आहे. न्यूझीलंडने हार्दिक पंडया याला आऊट करत भारताला पाचवा झटका दिला. हार्दिकने 18 धावा केल्या. मॅट हॅन्री याने हार्दिकला मिचेल सँटनर याच्या हाती कॅच आऊट केलं.
-
India vs New Zealand Live : जेम्स निशामची गेमचेजिंग ओव्हर, टीम इंडियाला एकाच ओव्हरमध्ये 3 झटके
जेम्स निशाम याने टीम इंडियाला एकाच ओव्हरमध्ये 3 झटके देत धावसंख्येला ब्रेक लावला आहे. जेम्सने 16 व्या ओव्हरमध्ये संजू सॅमसन, इशान किशन आणि त्याच्यानंतर शेवटच्या बॉलवर सूर्यकुमार यादव याला आऊट केलं. संजूने 89 आणि इशानने 54 धावा केल्या. तर सूर्या झिरोवर आऊट झाला.
-
India vs New Zealand Live : संजू सॅमसनच्या फायर खेळीचा शेवट, 89 धावांवर आऊट, भारताला दुसरा झटका
टीम इंडियाला दुसरा झटका लागला आहे. न्यूझीलंडने सेट संजू सॅमसन याला आऊट करत शतकापासून रोखलं आहे. संजू सलग दुसऱ्या सामन्यात 89 धावा करुन आऊट झाला. त्यामुळे टीम इंडियाचा 15.1 ओव्हरमध्ये 2 आऊट 203 असा स्कोअर झाला आहे.
-
India vs New Zealand Live : अभिषेक, संजूनंतर इशानचाही तडाखा, न्यूझीलंड विरुद्ध कडक अर्धशतक
अभिषेक शर्मा, संजू सॅमसन याच्यानंतर इशान किशन यानेही न्यूझीलंड विरुद्ध कडक अर्धशतक झळकावलं आहे. अभिषेकने 23 बॉलमध्ये अर्धशतक पूर्ण केलं. भारताच्या यासह 15 ओव्हरमध्ये 1 आऊट 203 रन्स झाल्या आहेत.
-
India vs New Zealand Live : संजूचा झंझावात सुरुच, ओपनर शतकाच्या दिशेने
टीम इंडियाचा ओपनर संजू सॅमसन याने अर्धशतकानंतरही झंझावात कायम ठेवला आहे. अभिषेकने रचीन रवींद्र याच्या बॉलिंगवर 14 व्या ओव्हरमधील शेवटच्या 3 चेंडूत 3 सिक्स लगावले. संजूने अशाप्रकारे इशान किशन याच्या मदतीने फटकेबाजी करत टीम इंडियाला 14 ओव्हरनंतर 191 धावांपर्यंत पोहचवलं आहे. संजू 44 बॉलमध्ये 88 रन्सवर नॉट आऊट आहे. तर इशान 19 बॉलमध्ये 43 रन्स करुन नॉट आऊट खेळत आहे. तर अभिषेक शर्मा 52 धावा करुन आऊट झाला.
-
India vs New Zealand Live : संजूचा धमाका, अंतिम सामन्यात कडक अर्धशतक
संजू सॅमसन याने आपला तडाखा कायम ठेवत फायनालमध्ये धमाका केला आहे. संजूने न्यूझीलंड विरुद्ध अर्धशतक झळकावलं आहे. अभिषेकचं हे सलग तिसरं अर्धशतक ठरलं. टीम इंडियाने अशाप्रकारे 11 ओव्हरमध्ये 1 विकेट गमावून 137 धावा केल्या आहेत.
-
India vs New Zealand Live : टीम इंडियाला मोठा धक्का, सेट अभिषेक शर्मा आऊट
रचीन रवींद्र याने टीम इंडियाला पहिला आणि मोठा झटका दिला आहे. रवींद्र याने टीम इंडियाला आठव्या ओव्हरमधील पहिल्या बॉलवर अभिषेक शर्मा याला 52 धावांवर विकेटकीपर याच्या हाती कॅच आऊट केलं. यासह टीम इंडियाची 98 धावांची सलामी भागीदारी मोडीत निघाली.
-
India vs New Zealand Live : अभिषेक शर्माचा धमाका, न्यूझीलंड विरुद्ध अर्धशतक
अभिषेक शर्मा याने न्यूझीलंड विरुद्ध अंतिम सामन्यात अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये फक्त 18 बॉलमध्ये अर्धशतक झळकावलं आहे. अभिषेकने षटकारासह हे अर्धशतक पूर्ण केलं. भारताने अशाप्रकारे पावरप्लेमध्ये बिनबाद 92 धावा ठोकल्या आहेत.
-
India vs New Zealand Live : टीम इंडियाची जबरदस्त सुरुवात, सलामी जोडीची अर्धशतकी भागीदारी
संजू सॅमसन आणि अभिषेक शर्मा या सलामी जोडीने भारताला जबरदस्त अशी सुरुवात करुन दिली आहे. टीम इंडियाच्या या सलामी जोडीने 4 ओव्हरमध्ये 51 रन्स जोडल्या आहेत. संजू 24 आणि अभिषेक 23 रन्सवर नॉट आऊट खेळत आहेत.
-
India vs New Zealand Live : टीम इंडियाची संयमी सुरुवात, संजू-अभिषेक मैदानात
टीम इंडियाने न्यूझीलंड विरुद्ध संयमी सुरुवात केली आहे. संजू सॅमसन आणि अभिषेक शर्मा या दोघांनी पहिल्या 2 ओव्हरमध्ये बिनबाद 12 धावा केल्या आहेत.
-
India vs New Zealand Live : टीम इंडियाच्या बॅटिंगला सुरुवात, संजू-अभिषेक मैदानात
आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेतील अंतिम सामन्याला सुरुवात झाली आहे. न्यूझीलंडने टीम इंडियाला टॉस जिंकून बॅटिंगसाठी भाग पाडलं आहे. टीम इंडियाकडून संजू सॅमसन आणि अभिषेक शर्मा ही सलामी जोडी मैदानात आली आहे.
-
T20 World Cup 2026 Final IND vs NZ Live Score : संजू सॅमसन आणि अभिषेक शर्मा जोडी मैदानात
संजू सॅमसन आणि अभिषेक शर्मा ही जोडी मैदानात उतरली आहे. अभिषेक शर्मा काय करतो याकडे लक्ष लागून आहे. कारण त्याने या स्पर्धेत निराशाजनक कामगिरी केली आहे.
-
T20 World Cup 2026 Final IND vs NZ Live Update : न्यूझीलंडची प्लेइंग 11
न्यूझीलंड (खेळणारा इलेव्हन): टिम सेफर्ट (विकेटकीपर), फिन ऍलन, रचिन रवींद्र, ग्लेन फिलिप्स, मार्क चॅपमन, डॅरिल मिचेल, जेम्स नीशम, मिचेल सँटनर (कर्णधार), मॅट हेन्री, लॉकी फर्ग्युसन, जेकब डफी
-
T20 World Cup 2026 Final IND vs NZ Live Update : भारताची प्लेइंग 11
भारत (प्लेइंग इलेव्हन): अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (विकेटकीपर), इशान किशन, सूर्यकुमार यादव (कर्णधार), तिलक वर्मा, हार्दिक पांड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, वरुण चक्रवर्ती, अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह
-
T20 World Cup 2026 Final IND vs NZ Live Update : सूर्यकुमार यादव म्हणाला की..
सूर्यकुमार यादव म्हणाला की, आम्ही चांगली कामगिरी करत असल्याने प्रथम फलंदाजी करण्यास आनंद झाला. उपांत्य फेरीत किंवा अंतिम फेरीत धावा असणे नेहमीच चांगले. आता हा इतिहास आहे, नवीन विश्वचषक आहे आणि आम्ही त्यासाठी उत्सुक आहोत. ते आधीच पूर्णपणे दिसत आहे आणि आता फक्त नाणेफेकीची वेळ आहे आणि आशा आहे की आम्ही त्यांना चांगला खेळ दाखवू. तो संघ घेऊन खेळू.
-
T20 World Cup 2026 Final IND vs NZ Live Update : मिचेल सँटनर म्हणाला की…
मिचेल सँटनर म्हणाला की, आपण प्रथम गोलंदाजी करणार आहोत. हे खूपच चांगले दिसते. आपण काही करतो का ते पाहू आणि त्यांना धावसंख्येपर्यंत मर्यादित ठेवण्याचा प्रयत्न करू. मुले चांगली आहेत. म्हणूनच आपण खेळत आहोत. ते झाले. उत्तम संधी, उपांत्य फेरी आणि खेळाडू त्यातून आत्मविश्वास घेतील. हा सर्वात मोठा टप्पा आहे आणि सर्वजण तयार आहेत. मॅककॉन्ची नाही, डफी खेळत आहे.
-
T20 World Cup 2026 Final IND vs NZ Live Update : नाणेफेकीचा कौल न्यूझीलंडच्या बाजूने
टी20 वर्ल्डकप स्पर्धेतील अंतिम फेरीत नाणेफेकीचा कौल हा न्यूझीलंडच्या बाजने लागला. कर्णधार मिचेल सँटनरने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. भारत प्रथम फलंदाजी करेल.
-
India vs New Zealand Live : फायनलआधी क्लोजिंग सेरेमनीची रंगत
इंडिया-इंग्लंड फायनलआधी अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये क्लोजिंग सेरेमनीला सुरुवात झाली आहे. या क्लोजिंज सेरेमनीत कलाकार आपली कला सादर करुन उपस्थित क्रिकेट चाहत्यांचं लक्ष वेधून घेत आहेत. या क्लोजिंग सेरेमनीनंतर टॉस होणार आहे.
-
India vs New Zealand Live : आयपीएलच्या 19 व्या मोसमाची तारीख ठरली, केव्हापासून सुरुवात?
क्रिकेट चाहत्यांमध्ये आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 फायनलची उत्सूकता आहे. अशात आता भारतीय क्रिकेट वर्तुळातून मोठी बातमी समोर आली आहे. आयपीएलच्या 19 व्या मोसमाची तारीख अखेर ठरली आहे. 19 व्या मोसमाला 28 मार्चपासून सुरुवात होणार आहे. स्टार स्पोर्ट्सकडून याबाबतची माहिती देण्यात आली आहे. मात्र आयपीएल किंवा बीसीसीआयकडून याबाबतची अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.
28 मार्चपासून आयपीएलच्या 19 व्या मोसमाचा थरार
🚨 IPL 2026 STARTS ON MARCH 28th 🚨 pic.twitter.com/z5JuJZRC0P
— Johns. (@CricCrazyJohns) March 8, 2026
-
India vs New Zealand Live : हिटमॅन आला रे, वर्ल्ड कप फायनलसाठी रोहित अहमदाबादमध्ये दाखल
आयसीसी टी 20i वर्लव्ज कप 2026 स्पर्धेतील अंतिम सामन्याला थोड्याच वेळात सुरुवात होणार आहे. त्याआधी या सामन्यासाठी टीम इंडियाचा माजी वर्ल्ड कप विजेता कर्णधार रोहित शर्मा अहमदाबादमधील विमानतळावर पोहचला आहे. यावेळेस रोहितसोबत त्याची पत्नी रितीका ही देखील होती.
-
अहमदाबादमध्ये तिरंगा फडकणार!- रीमा मल्होत्रा
भारत हिस्ट्री रिपीट करेल आणि अहमदाबादमध्ये तिरंगा फडकवेल असा विश्वास महिला क्रिकेटपटू रीमा मल्होत्रा यांनी व्यक्त केला आहे. न्यूझीलंडवर विजयासाठी ‘टीम इंडिया’ने एकजुटीने खेळावे अशाही शुभेच्छा ठाण्यातील स्पर्धेच्या उद्घाटनावेळी रीमा मल्होत्रा यांनी व्यक्त केल्या आहेत.
-
India vs New Zealand Live : टीम इंडिया आणि न्यूझीलंडचे खेळाडू स्टेडियममध्ये दाखल
टीम इंडिया आणि न्यूझीलंडचे खेळाडू महाअंतिम सामन्यासाठी थोड्याच वेळेआधी आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेतील अंतिम सामन्यासाठी अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये पोहचले आहेत.
-
India vs New Zealand Live : टीम इंडिया चौथ्यांदा फायनलमध्ये
इंडिया आयसीसी टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेच्या इतिहासात अंतिम फेरीत सर्वाधिक चौथ्यांगा पोहचणारी पहिली टीम आहे. याआधी पाकिस्तान, श्रीलंका आणि इंग्लंड या 3 संघांनी प्रत्येकी 3 वेळा अंतिम फेरीत प्रवेश मिळवला आहे.ं
-
India vs New Zealand Final Live Updates : कुलदीप यादवला संधी मिळेल का?
कर्णधाराने जाहीरपणे कुलदीप यादव प्लेइंग 11 मध्ये असेल की नाही हे सांगितलेलं नाही. त्यामुळे कुलदीप यादवला संधी मिळेल का? असा प्रश्न आहे. कुलदीपने या वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानविरुद्ध फक्त एकच सामना खेळला. यात त्याने 14 धावा देऊन 1 बळी घेतला. त्यामुळे त्याला संधी मिळण्याची शक्यता दिसते.
-
India vs New Zealand Final Live Updates : वरूण चक्रवर्तीचा प्लेइंग 11 मधून पत्ता कट!
क्रिकबझच्या वृत्तानुसार, नेटमध्ये सामन्याच्या सुरुवातीला गोलंदाजी करणाऱ्या वरुण चक्रवर्तीने यावेळी तसे केले नाही. डावखुरा फिरकी गोलंदाज कुलदीप यादवने यावेळी नेटमध्ये सराव केला. वरुण चक्रवर्ती ड्रिंक्स काउंटरवर बसून त्यांना पाहत होता.त्यामुळे प्लेइंग 11 मध्ये एक बदल अपेक्षित मानला जात आहे.
-
India vs New Zealand Final Live Updates : कोण इतिहास रचणार? भारत की न्यूझीलंड!
भारत न्यूझीलंड सामना संध्याकाळी 7 वाजता सुरू होईल. भारतीय संघ तिसऱ्या टी20 ट्रॉफीवर लक्ष केंद्रित करून आहे. भारत जेतेपद राखणारा पहिला संघ ठरू शकतो. दुसरीकडे, न्यूझीलंड क्रिकेटसाठी ही एक महत्त्वाची संधी आहे. त्यांनी कधीही टी20 वर्ल्डकप जिंकलेला नाही. कोणताही संघ जिंकेल तो निश्चितच इतिहास रचेल.
-
India vs New Zealand Final Live Updates : अहमदाबाद स्टेडियमबाहेर बेकायदेशीर तिकीट विक्री करणाऱ्या दोघांना अटक
देशभरातील लोक भारत न्यूझीलंड टी20 वर्ल्डकप 2026 सामना पाहण्यासाठी उत्सुक आहेत. विविध राज्यांमधून लोक अहमदाबादमध्ये येत आहेत. चाहते अजूनही तिकिटे खरेदी करण्यासाठी स्टेडियमबाहेर गर्दी करत आहेत. लोक कोणत्याही किंमतीत तिकिटे खरेदी करण्यास तयार आहेत. अहमदाबाद शहर गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली आहे. अहमदाबाद क्राइम ब्रांचने अंतिम सामन्याच्या तिकिटांच्या बेकायदेशीर विक्री प्रकरणी दोन जणांना अटक केली आहे.
-
India vs New Zealand Live : भारत-न्यूझीलंड अंतिम सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?
भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील सामन्याला संध्याकाळी 7 वाजता सुरुवात होणार आहे. तर 6 वाजून 30 मिनिटांनी नाणेफेकीचा कौल लागणार आहे. या सामन्यातील नाणेफेकीचा कौल निर्णायक ठरणार आहे. त्यामुळे कोणता संघ नाणेफेक जिंकतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
-
India vs New Zealand Live : न्यूझीलंडने अंतिम फेरीत पोहचेपर्यंत किती सामने गमावले?
न्यूझीलंडने साखळी फेरीत 4 पैकी 3 सामने जिंकले. त्यानंतर सुपर 8 फेरीत 3 पैकी फक्त 1 सामन्यातच त्यांना यश आलं. एका सामन्यात न्यूझीलंडचा पराभव झाला. तर 1 सामना पावसामुळे रद्द करण्यात आला. तर न्यूझीलंडने सेमी फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेला पराभूत केलं.
-
India vs New Zealand Live : टीम इंडियाची या स्पर्धेतील आतापर्यंतची कामगिरी
टीम इंडियाने या स्पर्धेत आतापर्यंत 7 पैकी 6 सामने जिंकले आहेत. भारताने साखळी फेरीत 4 पैकी 4 सामन्यांत विजय मिळवला आहे. तर भारताला सुपर 8 फेरीत 3 पैकी फक्त एकदाच पराभवाचा सामना करावा लागला आहे. त्यानंतर भारताने उपांत्य फेरीत सलग दुसऱ्यांदा इंग्लंडला पराभूत करत अंतिम फेरीत प्रवेश मिळवलाय. आता टीम इंडियाचं लक्ष्य वर्ल्ड कप ट्रॉफी आहे.
-
India vs New Zealand Live : भारत टी 20i सामन्यांत न्यूझीलंडपेक्षा सरस, दोन्ही संघ किती सामने खेळलेत?
भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात आतापर्यंत एकूण 30 टी 20i सामने खेळवण्यात आले आहेत. भारताने त्यापैकी सर्वाधिक 18 तर न्यूझीलंडने 11 सामने जिंकले आहेत. तर उभयसंघातील 1 सामना टाय झाला होता ज्याचा निकाल पावसामुळे लागला नाही. भारताने मायदेशात न्यूझीलंड विरुद्ध 16 पैकी 11 सामने जिंकले आहेत.
-
India vs New Zealand Live : न्यूझीलंड टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेत टीम इंडियावर वरचढ, किती सामने जिंकलेत?
आयसीसी टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेच्या इतिहासात न्यूझीलंड टीम इंडियावर वरचढ असल्याचं आकड्यांवरुन स्पष्ट होतं. उङयसंघात एकूण 3 सामने खेळवण्यात आले आहेत. न्यूझीलंडने या तिन्ही सामन्यांत भारताला पराभूत केलं आहे. त्यामुळे आता टीम इंडिया चौथ्या सामन्यात विजय मिळवून गेल्या 3 पराभवांचा हिशोब करणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
-
India vs New Zealand Live : न्यूझीलंडसमोर भारताचं आव्हान, पहिल्या टी 20i वर्ल्ड कप ट्रॉफीची प्रतिक्षा संपवणार?
न्यूझीलंडची आयसीसी टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहचण्याची ही दुसरी वेळ आहे. न्यूझीलंडला पहिल्या प्रयत्नात उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं होतं. त्यामुळे आता न्यूझीलंड दुसऱ्या प्रयत्नात टी 20i वर्ल्ड कप ट्रॉफीवर आपलं नाव कोरण्यात यशस्वी ठरणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
-
India vs New Zealand Live : टीम इंडिया तिसऱ्या टी 20i वर्ल्ड कप ट्रॉफीसाठी सज्ज, जिंकणार?
टीम इंडिया सलग दुसऱ्या आणि एकूण तिसऱ्या टी 20i वर्ल्ड कप ट्रॉफीसाठी मैदानात उतरणार आहे. टीम इंडियाने 2007 आणि त्यानंतर 2024 मध्ये टी 20i वर्ल्ड कप जिंकला होता. त्यानंतर आता टीम इंडिया वर्ल्ड चॅम्पियन होण्यापासून एक पाऊल दूर आहे.
-
India vs New Zealand Live : टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेसाठी न्यूझीलंड टीम
टीम सायफर्ट (विकेटकीपर), फिन ऍलन, रचीन रवींद्र, ग्लेन फिलिप्स, मार्क चॅपमन, डॅरेल मिचेल, जेम्स नीशम, मिशेल सँटनर (कॅप्टन), कोल मॅककॉन्ची, मॅट हेन्री, लॉकी फर्ग्युसन, डेव्हॉन कॉनवे, काइल जेमिसन, ईश सोढी आणि जेकब डफी.
-
India vs New Zealand Live : टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेसाठी भारतीय क्रिकेट संघ
अभिषेक शर्मा, संजू सॅमसन(विकेटकीपर), इशान किशन, सूर्यकुमार यादव(कर्णधार), तिलक वर्मा, हार्दिक पंड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, रिंकू सिंग, वॉशिंग्टन सुंदर आणि कुलदीप यादव.
-
T20 WC Final Match 2026 : टी 20I वर्ल्ड कप स्पर्धेतील महाअंतिम सामना, न्यूझीलंडसमोर भारताचं आव्हान
न्यूझीलंडसमोर आयसीसी टी 20I वर्ल्ड कप 2026 स्पर्धेतील अंतिम सामन्यात यजमान आणि गतविजेता टीम इंडियाचं आव्हान आहे. न्यूझीलंडलने याआधी एकदाही टी 20I वर्ल्ड कप जिंकलेला नाही. न्यूझीलंडची अंतिम फेरीत पोहचण्याची ही दुसरी वेळ आहे. न्यूझीलंडला पहिल्या फेरीत अपयश आलं होतं. त्यामुळे यंदा न्यूझीलंडचा विजय मिळवण्याचा प्रयत्न असणार आहे. मात्र न्यूझीलंडसमोर गतविजेत्या भारताचं आव्हान आहे. त्यामुळे किवींचा चांगलाच कस लागणार आहे.