AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs NZ: न्यूझीलंड विरुद्ध वनडे सीरीजआधी टीम इंडियाला मोठा झटका, प्रमुख खेळाडू OUT

टीम इंडिया आणि न्यूझीलंडमध्ये 18 जानेवारीपासून 3 वनडे सामन्यांची सीरीज सुरु होणार आहे. या महत्त्वाच्या सीरीजआधी टीम इंडियाला मोठा झटका बसलाय.

IND vs NZ: न्यूझीलंड विरुद्ध वनडे सीरीजआधी टीम इंडियाला मोठा झटका, प्रमुख खेळाडू OUT
Team india
| Updated on: Jan 17, 2023 | 3:38 PM
Share

मुंबई: टीम इंडिया आणि न्यूझीलंडमध्ये 18 जानेवारीपासून 3 वनडे सामन्यांची सीरीज सुरु होणार आहे. या महत्त्वाच्या सीरीजआधी टीम इंडियाला मोठा झटका बसलाय. भारताचा अव्वल फलंदाज श्रेयस अय्यर न्यूझीलंड विरुद्ध 3 वनडे सामन्यांच्या सीरीजना मुकणार आहे. बीसीसीआयने मंगळवारी श्रेयस अय्यर या सीरीजमध्ये खेळणार नसल्याची माहिती दिली. अय्यरच्या पाठीला दुखापत झालीय. तो आता नॅशनल क्रिकेट अकादमीमध्ये जाईल. अय्यरच्या जागी रजत पाटीदारचा टीममध्ये समावेश करण्यात आलाय.

अय्यर बाहेर गेल्यामुळे ‘या’ खेळाडूला प्लेइंग 11 मध्ये स्थान टीम इंडिया आणि न्यूझीलंडमध्ये पहिला वनडे सामना हैदराबादमध्ये खेळला जाईल. दुसरा सामना रायपूर आणि तिसरा सामना इंदूर येथे होईल. अय्यर बाहेर गेल्यामुळे सूर्यकुमार यादवला तिन्ही वनडे सामन्यात संधी मिळण्याची शक्यता आहे.

श्रीलंके विरुद्ध सीरीजमध्ये अय्यरने किती धावा केल्या?

सूर्यकुमार यादवला श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या 3 वनडे सामन्यांपैकी 2 मॅचमध्ये संधी मिळाली नाही. अय्यर श्रीलंकेविरुद्धच्या सीरीजमध्ये टीमचा महत्त्वाचा भाग होता. तीन सामन्यात तो मोठी इनिंग खेळू शकला नाही. श्रीलंकेविरुद्ध पहिल्या वनडेत 28, दुसऱ्या मॅचमध्ये 28 आणि तिसऱ्या वनडेत 38 रन्स केल्या.

रजत पाटीदार फुल फॉर्ममध्ये

श्रेयस अय्यरच्या जागी रजत पाटीदाराचा समावेश करण्यात आलाय. सध्या तो तुफान फॉर्ममध्ये आहे. मागच्यावर्षी लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध प्लेऑफमध्ये त्याने सेंच्युरी झळकवली होती. त्याच्या शतकामुळे रॉयल चॅलेंजर्स बँगलोरला विजय मिळाला. 51 लिस्ट ए सामन्यात त्याने 97.45 च्या स्ट्राइक रेटने 3 सेंच्युरी आणि 8 अर्धशतक झळकवली. एकूण 1648 धावा केल्या. रणजी ट्रॉफीत तो मध्य प्रदेशकडून खेळतो. मागच्या 7 सामन्यात त्याने 6 हाफ सेंच्युरी आणि एक सेंच्युरी झळकवली आहे. या कमालीच्या प्रदर्शनाच त्याला आता इनाम मिळालय. टीम इंडियाचा वनडे स्क्वॉड:

रोहित शर्मा (कॅप्टन), शुभमन गिल, इशान किशन, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, केएस भरत, हार्दिक पंड्या, रजत पाटीदार, वॉशिंगटन सुंदर, शहबाज अहमद, शार्दुल ठाकुर, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमरान मलिक

Follow Us
परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स...
FDA Raid | परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्सचा अन्न परवाना निलंबित
गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात...
Mumbai | गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात फलकांवर बंदी; उल्लंघन केल्यास कारवाई होणार
पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात
Nashik | पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात; संतप्त नागरिकांचा महापालिकेत ठिय्या
बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर
Navi Mumbai | बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर; दुकान मालकाने चूक मान्य करत...
मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात..
Mumbai Local | मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात रुळावरून पायी चालण्याची आली वेळ
अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा
Amit Shah | अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा, पुढे म्हणाले...
नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब...
Nanded | नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब; शेतकऱ्यांनी चौकात मांडली करपलेल्या पिकांची व्यथा
जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू...
Radhakrishna Vikhepatil | जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू... मराठा आरक्षणावर मोठी अपडेट समोर
तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं!
Shivendraraje Bhonsle | तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं! शिवेंद्रराजे भोसले स्पष्टच बोलले, पुढे म्हणाले...
संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; बन यांचा सडेतोड पलटवार
Sanjay Raut Vs Navnath Ban | संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; नवनाथ बन यांचा सडेतोड पलटवार, मुंबई दौऱ्यावरून वार- पलटवार सुरूच