AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ICC T20 World Cup मध्ये भारत आणि पाकिस्तान आमने-सामने, कोणाचं पारडं जड?

यंदाचा टी-20 विश्वचषक 17 ऑक्टोबर ते 14 नोव्हेंबर दरम्यान युएईमध्ये होणार आहे. या चषकातील सर्वांत उत्कटांवर्धक सामना म्हटलं तर तो भारत विरुद्ध पाकिस्तान हाच असणार आहे.

ICC T20 World Cup मध्ये भारत आणि पाकिस्तान आमने-सामने, कोणाचं पारडं जड?
भारत विरुद्ध पाकिस्तान
| Edited By: | Updated on: Aug 18, 2021 | 6:53 PM
Share

मुंबई : आंतरराष्ट्रीय टी-20 विश्वचषकाच्या तारखा काही दिवसांपूर्वीच आयसीसीने जाहीर केल्या होत्या. त्यानंतर मंगळवारी (17 ऑगस्ट) आयसीसीने प्रत्येक गटातील संघाचे सामने कधी कोणासोबत असणार हे जाहीर केले आहे. यामध्ये सर्व क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागून राहिलेल्या ग्रुप 2 मधील भारत, पाकिस्तान संघातील सामन्याची तारीखही जाहीर करण्यात आली आहे. 24 ऑक्टोबर, 2021 रोजी दुबईच्या मैदानात खेळवल्या जाणाऱ्या या सामन्यापूर्वी आतापर्यंतच्या टी20 इतिहासात कोणत्या संघाचं पारडं अधिक जड आहे याच्यावर एक नजर फिरवू…

भारताचा टी20 वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानविरुद्ध विजयाचा रेकॉर्ड 5-0 आहे. भारताने पाकिस्तानला 5 वेळा पछाडलं आहे. सर्वात शेवटी म्हणजे 2016 च्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये भारताने पाकिस्तानला 6 विकेट्सने मात दिली होती. पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करत 5 विकेटच्या बदल्यात 118 धावा केल्या ज्या भारताने केवळ 4 विकेट गमावर पूर्ण केल्या.

2 वर्षानंतर भारत, पाकिस्तान आमने-सामने

भारत आणि पाकिस्तान (India vs Pakistan) हे दोन्ही संघ तब्बल 2 वर्षानंतर क्रिकेटच्या मैदानावर आमने सामने असतील. याआधी 2019 च्या एकदिवसीय वर्ल्ड कपमध्ये भारत आणि पाकिस्तान संघ आमने-सामने होती. ज्यावेळी भारताने 89 धावांनी पाकिस्तानवर विजय मिळवला होता.

भारताचे विश्वचषकातील सामने

भारत आणि पाकिस्तान या दोघांसह ग्रुप-2 मध्ये न्यूझीलंड आणि अफगानिस्तान हे संघही आहेत. तसेच ग्रुप स्टेजमधून पात्र होणारे दोन संघही याच ग्रुपमध्ये येणार असून या सर्वांच्या सामन्याला 24 ऑक्टोबरपासून सुरुवात होईल. दरम्यान भारताचे ग्रुपमधील सामने पुढीलप्रमाणे-

  • भारत विरुद्ध पाकिस्तान (24 ऑक्टोबर)
  • भारत विरुद्ध न्यूझीलंड (31 ऑक्टोबर)
  • भारत विरुद्ध अफगाणिस्तान (3 नोव्हेंबर)
  • भारत विरुद्ध ग्रुप स्टेजमधील पात्र संघ 1 (5 नोव्हेंबर)
  • भारत विरुद्ध ग्रुप स्टेजमधील पात्र संघ 2(8 नोव्हेंबर)

संबंधित बातम्या 

T20 World Cup Ind vs Pak : टी 20 च्या मैदानात सर्वात मोठा सामना, भारत वि पाकिस्तान मॅचचं टाईम टेबल जाहीर

T20 World Cup 2021 चे ग्रुप जाहीर, भारतासोबत गटात ‘हे’ संघ, भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याबाबत मोठी माहिती समोर

IND vs ENG : बुमराह नडला, सिराज लॉर्ड्सवर थेट भिडला, भारताचा इंग्लंडवर थरारक विजय

(India vs Pakistan match in ICC t20 worldcup know head to head india vs pakistan till now)

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.