IND vs SA: कसोटी जिंकण्यासाठी बुमराह, सिराज, शामी आणि ठाकूर करीयरमधला सर्वोत्तम स्पेल आज टाकतील?

| Updated on: Jan 04, 2022 | 7:00 AM

वाँडर्स स्टेडियमचा इतिहास भारताच्या बाजूने राहिला आहे. मालिकेत दक्षिण आफ्रिकेला पुनरागमन करण्यापासून कसं रोखायचं? ते आता गोलंदाजांच्या हातात आहे.

IND vs SA: कसोटी जिंकण्यासाठी बुमराह, सिराज, शामी आणि ठाकूर करीयरमधला सर्वोत्तम स्पेल आज टाकतील?
Follow us on

जोहान्सबर्ग: जोहान्सबर्ग कसोटीच्या पहिल्या दिवसाच्या खेळावर गोलंदाजांच्या बळावर दक्षिण आफ्रिकेने वर्चस्व गाजवलं. आफ्रिकन गोलंदाजांनी मोठी धावसंख्या उभारण्याचे भारताचे मनसुबे उधळून लावले. पहिल्या कसोटी प्रमाणे दुसऱ्या कसोटीतही भारतीय फलंदाजांचा संघर्ष कायम दिसून आला. दक्षिण आफ्रिकेतील वेगवान खेळपट्ट्यांवर मयंक-राहुल वगळता अन्य फलंदाज झगडताना दिसत आहेत. त्यांना फलंदाजीचं ते तंत्र आत्मसात करता आलेलं नाहीय. परिणामी भारताचा डाव अवघ्या 202 धावात गडगडला. (india vs south africa 2st test match johannesburg Wanderers Stadium Will indian bowlers show best spell today)

फलंदाजांनी घात केला

फलंदाजीमुळे घात होऊ शकतं असं म्हटलं होतं. काल वाँडर्सच्या खेळपट्टीवर तेच घडलं. एकही फलंदाज मोठी धावसंख्या, मोठी भागीदारी करु शकला नाही. कसोटी सामन्यांमध्ये सामना जिंकण्यासाठी शतकी खेळी, मोठ्या भागीदाऱ्या आवश्यक असतात. राहुल-मयंक वगळता अन्य फलंदाजांना तेच जमत नाहीय. पहिल्या कसोटीच्या पहिल्या डावात दमदार सलामी दिल्यामुळे भारताचा नंतरचा मार्ग सुकर झाला होता. मधल्याफळीतील फलंदाजी हे भारताचं मुख्य अपयश आहे.

तरच टीम इंडियाची दुसऱ्या कसोटीत वापसी

कमी धावसंख्येमुळे आज दुसऱ्यादिवशी सर्व मदार गोलंदाजांवर असेल. दक्षिण आज एक बाद 35 वरुन डाव पुढे सुरु करेल. अजूनही ते 167 धावांनी पिछाडीवर आहेत. त्यांना लवकरात लवकर गुंडाळण्याचं कसब गोलंदाजांना दाखवाव लागेल. कारण आता सर्वकाही गोलंदाज आणि क्षेत्ररक्षणावर अवलंबून आहे. शामी, सिराज, बुमराह आणि ठाकूर यांना करीयरमधील सर्वोत्तम स्पेल टाकावे लागतील. तरच टीम इंडियाची दुसऱ्या कसोटीत वापसी होऊ शकते. अन्यथा दक्षिण आफ्रिका मोठी आघाडी घेईल. वाँडर्स स्टेडियमचा इतिहास भारताच्या बाजूने राहिला आहे. मालिकेत दक्षिण आफ्रिकेला पुनरागमन करण्यापासून कसं रोखायचं? ते आता गोलंदाजांच्या हातात आहे. तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारत 1-0 ने आघाडीवर आहे. भारताला जोहान्सबर्ग नवा इतिहास रचण्याची संधी आहे.

संबंधित बातम्या: 

IND vs SA: VIDEO: पहिल्या सामन्यात कॅप्टन राहुलने मागितली माफी, मैदानावर असं काय घडलं?
पाच महिने संघाबाहेर होता, द्रविड कोच होताच ‘या’ खेळाडूचं पालटलं नशीब
इंडिगो पेंटवाला घोडा आहे का? घोड्यासोबत धोनीचा फोटो व्हायरल

(india vs south africa 2st test match johannesburg Wanderers Stadium Will indian bowlers show best spell today)