AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

इंडिगो पेंटवाला घोडा आहे का? घोड्यासोबत धोनीचा फोटो व्हायरल

धोनीने त्याच्या मुलीला झिवाला गिफ्टमध्ये घोड्याचं पिल्लू दिलं आहे. फोटोमध्ये दिसणारं हे तेच पिल्लू आहे.

इंडिगो पेंटवाला घोडा आहे का? घोड्यासोबत धोनीचा फोटो व्हायरल
महेंद्र सिंह धोनीच्या नेतृत्त्वात चेन्नईनं आयपीएलचं 14 पर्वं जिंकलं आहे. धोनींनं संघाला मोठ यश मिळवून दिलेलं आहे. त्यामुळं चेन्नईला धोनीला रिटेन करण्याशिवाय पर्याय नाही असं दिसतंय.
| Edited By: | Updated on: Jan 03, 2022 | 6:28 PM
Share

चेन्नई: भारताचा माजी कर्णधार आणि चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी (Ms Dhoni) सोशल मीडियावर फार सक्रिय नसतो. त्यामुळे मोकळ्या वेळेत धोनीचं काय चाललय? हे त्याच्या चाहत्यांना कळत नाही. अजून आयपीएल सुरु झालेलं नसल्यामुळे धोनी सध्या निवांत आहे. रविवारी धोनीच्या फॅन्सना त्याची एक झलक पाहायला मिळाली. धोनी घोड्याच्या पिल्लाला काहीतरी खाऊ घालत असल्याचा फोटो चेन्नई सुपर किंग्जने त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केला आहे. या फोटोवर ‘लव्ह यू माही’सह अनेक कमेंट आल्या आहेत. एका युजरने इंडिगो पेंटवाला घोडा आहे का? असा प्रश्न विचारला आहे. (MS Dhoni clicked with his pony and the picture is going viral)

धोनीने त्याच्या मुलीला झिवाला गिफ्टमध्ये घोड्याचं पिल्लू दिलं आहे. फोटोमध्ये दिसणारं हे तेच पिल्लू आहे. धोनीला प्राण्यांची प्रचंड आवड आहे. धोनीने अनेक श्वान पाळले आहेत. साक्षी धोनी जेव्हा फोटो पोस्ट करते, तेव्हा हे प्राणी त्यामध्ये दिसतात. धोनीने स्वत:लाच एक घोडा गिफ्ट केला आहे. त्याला त्याने चेतक नाव दिले आहे. काही आठवड्यांनी हे पिल्लू धोनीच्या घरी आले.

सीएसकेचा कॅप्टन धोनी सध्या राचीमध्ये आहे. आयपीएल 2022 मध्ये धोनी आता आपल्याला दिसेल. सीएसकेने धोनीला आपल्याकडे कायम ठेवले आहे. पाचवे विजेतेपद मिळवण्याचा त्याचा प्रयत्न असेल. 15 ऑगस्ट 2020 रोजी धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाला. मागच्यावर्षी त्याच्या नेतृत्वाखाली CSK ने चौथे जेतेपद पटकावले आहे. टी-20 वर्ल्डकपमध्ये धोनीचा टीम इंडियाचा मार्गदर्शकही होता.

संबंधित बातम्या: 

IND vs SA: अजिंक्य रहाणे, पुजाराचं पुढे काय होणार? दोघांचाही पुढचा प्रवास खडतर IND vs SA: अजिंक्य शुन्यावर बाद होताच सोशल मीडिया पेटला, पोट धरुन हसवणारे मीम्स व्हायरल पाच महिने संघाबाहेर होता, द्रविड कोच होताच ‘या’ खेळाडूचं पालटलं नशीब

(MS Dhoni clicked with his pony and the picture is going viral)

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.