AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs SA: VIDEO: पहिल्या सामन्यात कॅप्टन राहुलने मागितली माफी, मैदानावर असं काय घडलं?

मैदानावर प्रेक्षक नसल्यामुळे खेळपट्टीवर होणारा छोट्यातला छोटा संवादही स्टंम्पवरील मायक्रोफोनमुळे समजतो. आज या मायक्रोफोनमुळेच पंच आणि भारताचा नवीन कर्णधार केएल राहुलमध्ये खेळपट्टीवर झालेला संवाद समजला.

IND vs SA: VIDEO: पहिल्या सामन्यात कॅप्टन राहुलने मागितली माफी, मैदानावर असं काय घडलं?
(Twitter screengrab)
| Edited By: | Updated on: Jan 03, 2022 | 8:20 PM
Share

जोहान्सबर्ग: कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरिएंटमुळे दक्षिण आफ्रिकेच्या स्टेडियममध्ये प्रेक्षकांविना सामने सुरु आहेत. प्रेक्षकांना स्टेडियममध्ये प्रवेशबंदी आहे. मैदानावर प्रेक्षक नसल्यामुळे खेळपट्टीवर होणारा छोट्यातला छोटा संवादही स्टंम्पवरील मायक्रोफोनमुळे समजतो. आज या मायक्रोफोनमुळेच पंच आणि भारताचा नवीन कर्णधार केएल राहुलमध्ये खेळपट्टीवर झालेला संवाद समजला. केएल राहुलला (KL Rahul) कर्णधारपदाच्या पहिल्याच सामन्यात पंच माराईस इरास्मस यांच्याकडून वॉर्निंग मिळाली. स्टंम्पवरील मायक्रोफोनने दोघांमधील संभाषण लगेच पकडले. (Umpire warns Rahul for late pull out against Rabada batter says sorry)

तिसरा चेंडू टाकण्यासाठी रबाडा धावत होता

भारताच्या डावातील पाचव्या षटकात दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज कागिसो रबाडा गोलंदाजी करत होता. समोर स्ट्राइकवर भारतीय कर्णधार केएल राहुल होता. षटकातील तिसरा चेंडू टाकण्यासाठी रबाडा धावत असताना, अचानक अखेरच्या क्षणी लक्ष विचलित झाल्यामुळे केएल राहुल स्टंम्प समोरुन बाजूला झाला. त्यामुळे रबाडाची चेंडू टाकण्यासाठीची धाव वाया गेली. राहुलने लगेच माफी मागितली. पण पंच माराईस इरास्मस यांनी दिलेली वॉर्निंग ऐकू आली. “पुढच्यावेळी बाजूला व्हायचं असेल तर थोडं लवकर” असं इरास्मर राहुलला बोलले. राहुलने त्या बद्दल माफी मागितली.

खेळपट्टीवर धूळ असेल किंवा समोरच्या स्क्रिनवर हालचाल दिसली, तर फलंदाजाचे लक्ष विचलित होते व तो स्टंम्पस समोरुन बाजूला होतो. पण हे सर्व होत असताना, गोलंदाजाला त्रास होणार नाही याची काळजी घ्यायची असते. कारण गोलंदाजाला लाँग रनअप घ्यावा लागतो. दरम्यान दुसऱ्या कसोटीच्या पहिल्याच दिवशी भारताचा डाव 202 धावात आटोपला. कर्णधार म्हणून राहुलने सर्वाधिक (50) धावांची खेळी केली.

संबंधित बातम्या: 

पाच महिने संघाबाहेर होता, द्रविड कोच होताच ‘या’ खेळाडूचं पालटलं नशीब इंडिगो पेंटवाला घोडा आहे का? घोड्यासोबत धोनीचा फोटो व्हायरल ‘आता फक्त एकच…’, अजिंक्य रहाणेच्या टेस्ट करीअरबद्दल गावस्करांच मोठं विधान

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.