IND vs SA: टीम इंडियाला मोठा झटका, कॅप्टनशिपमध्ये मोठा बदल, हार्दिक पंड्या बनला व्हाइस कॅप्टन
IND vs SA: दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पाच टी 20 सामन्यांची मालिका सुरु होण्याआधी टीम इंडियाला एक मोठा झटका बसला आहे.

मुंबई: दक्षिण आफ्रिकेविरुद्ध (IND vs SA) पाच टी 20 सामन्यांची मालिका सुरु होण्याआधी टीम इंडियाला एक मोठा झटका बसला आहे. कॅप्टन केएल राहुल (KL Rahul) दुखापतीमुळे संपूर्ण मालिकेला मुकणार आहे. राहुलच्या जागी आता विकेटकीपर फलंदाज ऋषभ पंतकडे (Rishabh Pant) संघाचं नेतृत्व सोपवण्यात आलं आहे. ऋषभ पंतला संघ निवड झाली, त्यावेळी उपकर्णधार बनवण्यात आलं होतं. केएल राहुलला हॅमस्ट्रिंगची दुखापत झाली आहे. त्याला ग्रोइन इंजरी आहे. भारताला उद्यापासून सुरु होणाऱ्या मालिकेआधी दुहेरी झटका बसला आहे. कुलदीप यादवही दुखापतग्रस्त असून तो ही मालिकेत खेळू शकणार नाहीय. कुलदीप यादवला सरावादरम्यान दुखापत झाली. आयपीएलमध्ये गुजरात टायटन्सचे यशस्वी नेतृत्व करणाऱ्या हार्दिक पंड्याला उपकर्णधार बनवण्यात आलं आहे. भारताने या मालिकेसाठी आधीच सीनियर खेळाडूंना विश्रांती दिली आहे. रोहित शर्मा, विराट कोहली आणि जसप्रीत बुमराहशिवाय भारतीय संघ या मालिकेत खेळतोय.
राहुलच नाही कुलदीप यादवही संघाबाहेर
भारतीय संघासमोरच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत. कुलदीप यादवही चागंल्या फॉर्ममध्ये होता. आयपीएल 2022 मध्ये कुलदीपने दमदार प्रदर्शन केलं होतं. राहुल आणि कुलदीपच्या जागी दुसऱ्या खेळाडूचं नाव जाहीर झालेलं नाही. राहुल आणि कुलदीपला बंगळुरुच्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत पाठवलं जाईल. उद्या दोन्ही संघांमध्ये दिल्लीत पहिला सामना होईल.
NEWS ?- KL Rahul and Kuldeep Yadav ruled out of #INDvSA series owing to injury.
The All-India Senior Selection Committee has named wicket-keeper Rishabh Pant as Captain and Hardik Pandya as vice-captain for the home series against South Africa @Paytm #INDvSA
— BCCI (@BCCI) June 8, 2022
भारत-दक्षिण आफ्रिकेत कोणाचं पारड जडं?
भारत आणि दक्षिण आफ्रिकेच्या संघातला हा 16 वा सामना आहे. या आधी खेळल्या गेलेल्या 15 सामन्यात भारताचं पारड जड आहे. भारताने 9 सामने जिंकलेत, तर दक्षिण आफ्रिकेने सहा. दक्षिण आफ्रिकन संघासाठी एक चांगली बाब आहे, ती म्हणजे भारतीय मैदानांवर त्यांची कामगिरी चांगली आहे. भारतात टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिकेचा संघ 4 सामने खेळलाय. त्यात 3 सामने त्यांनी जिंकलेत. भारतात टीम इंडियाला फक्त एका सामन्यात विजय मिळवता आलाय.
