IND vs SA T 20 Match: दक्षिण आफ्रिकेने जिंकला टॉस, अखेर पुण्याच्या मुलाला मिळाली संधी

IND vs SA T 20 Match: भारत आणि दक्षिण आफ्रिका (IND vs SA) यांच्यात आजपासून 5 T20 सामन्यांची मालिका सुरु झाली आहे. पहिला सामना दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर (Arun Jaitley Stadium) खेळला जात आहे.

IND vs SA T 20 Match: दक्षिण आफ्रिकेने जिंकला टॉस, अखेर पुण्याच्या मुलाला मिळाली संधी
IND vs SA
Follow us
| Updated on: Jun 09, 2022 | 6:42 PM

नवी दिल्ली : भारत आणि दक्षिण आफ्रिका (IND vs SA) यांच्यात आजपासून 5 T20 सामन्यांची मालिका सुरु झाली आहे. पहिला सामना दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर (Arun Jaitley Stadium) खेळला जात आहे. दक्षिण आफ्रिकेचा कॅप्टन टेंबा बावुमाने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. भारताची प्रथम फलंदाजी आहे. दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज एडन मार्करामला कोविडची बाधा झाली आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या या मालिकेसाठी रोहित शर्माच्या अनुपस्थितीत कर्णधारपदाची जबाबदारी केएल राहुलकडे सोपवण्यात आली होती. मात्र, सामना सुरू होण्यापूर्वीच राहुल दुखापतीमुळे पाचही सामन्यांना मुकणार आहे. त्यामुळे बीसीसीआय आणि निवड समितीनं ऋषभ पंतची (Rishabh Pant) कर्णधारपदी नियुक्ती केली आहे. हार्दिक पंड्या उपकर्णधार आहे. भारताला आज जिंकून वर्ल्ड रेकॉर्ड करण्याची संधी आहे. कारण भारताने टी 20 मध्ये सलग 12 सामने जिंकले आहेत. आज 13 वा सामना जिंकण्याची संधी आहे. भारताला आम्ही टी 20 मध्ये विजयाचा वर्ल्ड रेकॉर्ड करुन देणार नाही, असं दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेंबा बावुमाने आधीच म्हटलय.

भारत आणि दक्षिण आफ्रिकेत हा कितवा T 20 सामना?

भारत आणि दक्षिण आफ्रिकेच्या संघातला हा 16 वा सामना आहे. या आधी खेळल्या गेलेल्या 15 सामन्यात भारताचं पारड जड आहे. भारताने 9 सामने जिंकलेत, तर दक्षिण आफ्रिकेने सहा. दक्षिण आफ्रिकन संघासाठी एक चांगली बाब आहे, ती म्हणजे भारतीय मैदानांवर त्यांची कामगिरी चांगली आहे. भारतात टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिकेचा संघ 4 सामने खेळलाय. त्यात 3 सामने त्यांनी जिंकलेत. भारतात टीम इंडियाला फक्त एका सामन्यात विजय मिळवता आलाय.

ऋषभ पंत युवा कॅप्टन

ऋषभ पंत हा T20 क्रिकेटमधला भारताचा दुसरा सर्वात तरुण कर्णधार ठरणार आहे हे विशेष. तो 24 वर्षे 249 दिवस वयाच्या क्रिकेटच्या सर्वात लहान फॉरमॅटमध्ये कर्णधार म्हणून पदार्पण करणार आहे.

नवीन सलामीची जोडी

राहुल बाहेर गेल्यामुळे टीम इंडियाचं प्लेइंग 11 चं समीकरणही बदलणार आहे. राहुल फक्त कॅप्टनच नाहीय, तर चांगला सलामीवीरही आहे. आता टीम इंडियाला नवीन जोडी मैदानात उतरवावी लागणार आहे. केएल राहुलच्या दुखापतीमुळे ऋतुराज गायकवाडला फायदा होणार आहे.

भारताची playing 11 ऋषभ पंत, (कॅप्टन) इशान किशन, श्रेयस अय्यर, ऋतुराज गायकवाड, हार्दिक पंड्या, दिनेश कार्तिक, अक्षर पटेल, हर्षल पटेल, भुवनेश्वर कुमार, युजवेंद्र चहल आणि आवेश खान,

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.