IND vs SA, 1st ODI: पिंपरी-चिंचवडच्या ऋतुराजची पाच सामन्यात चार शतक तरी 56 धावा करणाऱ्या फलंदाजाला संधी?

"मागच्या दोन वर्षात हार्दिक पांड्या दुखापतग्रस्त झाल्याने सहाव्या गोलंदाजाच्या पर्यायाने भारतीय संघाची डोकेदुखी वाढवली आहे"

IND vs SA, 1st ODI: पिंपरी-चिंचवडच्या ऋतुराजची पाच सामन्यात चार शतक तरी 56 धावा करणाऱ्या फलंदाजाला संधी?
Ruturaj Gaikwad
Follow us
| Updated on: Jan 19, 2022 | 9:02 AM

पार्ल: आजपासून दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तीन वनडे सामन्यांच्या मालिकेला सुरुवात होणार आहे. नुकत्यात संपलेल्या कसोटी मालिकेत दक्षिण आफ्रिकेने भारतावर 2-1 असा विजय मिळवला. पार्लच्या बोलँड पार्क स्टेडियमवर भारत आणि दक्षिण आफ्रिकेत सलामीचा सामना होणार आहे. काल सामन्याच्या पूर्वसंध्येला कर्णधार केएल राहुलने (KL Rahul) शिखर धवनसोबत (Shikhar Dhawan) सलामीला उतरणार असल्याचे संकेत दिले आहेत. नियमित कर्णधार रोहित शर्मा दुखापतग्रस्त असल्याने त्याच्याजागी राहुलला कर्णधारपद भूषवण्याची संधी मिळाली आहे. तीन सामन्यांच्या या मालिकेत वेंकटेश अय्यरला हार्दिक पांड्याचा पर्याय म्हणून तयार केले जाऊ शकते. दुखापत आणि खराब फॉर्ममुळे पांड्या संघाबाहेर आहे. शिखर धवनला संधी दिली तर महाराष्ट्राच्या ऋतुराज गायकवाडची (Ruturaj Gaikwad) प्रतिक्षा लांबू शकते.

केएल राहुल म्हणाला “मागच्या दोन वर्षात हार्दिक पांड्या दुखापतग्रस्त झाल्याने सहाव्या गोलंदाजाच्या पर्यायाने भारतीय संघाची डोकेदुखी वाढवली आहे. आता संघ व्यवस्थापन वेंकटेश अय्यरला संधी देण्यासाठी उत्साहित आहे” असे केएल राहुलने सांगितले. “वेंकटेशने आयपीएलमध्ये केकेआर बरोबर खेळायला सुरुवात केल्यापासून चांगली कामगिरी केली आहे. न्यूझीलंड विरुद्धच्या टी-20 मालिकेत त्याचा संघात समावेश करण्यात आला होता. त्याने चांगली कामगिरी केली होती” असे राहुल म्हणाला.

ऋतुराज गायकवाडचा परफॉर्मन्स विजय हजारे वनडे टुर्नामेंटमध्ये पाच सामन्यात ऋतुराज गायकवाडने चार शतक झळकावली आहेत. त्याने 600 पेक्षा अधिक धावा केल्या. त्याशिवाय आयीपएल 2021 मध्ये सुद्धा चौफेर फटकेबाजी करुन खोऱ्याने धावा वसूल केल्या आहेत. त्याचवेळी शिखर धवनने पाच सामन्यात फक्त 56 धावा केल्या आहेत. दोघेही सलामीवीर म्हणून खेळतात.

गोलंदाजांवर वर्चस्व गाजवावं “अनुभवी शिखर धवनने गोलंदाजांवर वर्चस्व गाजवावं, तशा खेळाची त्याच्याकडून अपेक्षा असल्याने राहुलने सांगितलं. शिखर धवन सीनियर आणि अनुभवी खेळाडू आहे. संघाला काय अपेक्षा आहेत, हे त्यांना माहित आहे. तो इथे येऊन क्रिकेटचा आनंद घेतोय. मी स्वत: शिखर धवनला वनडेमध्ये गोलंदाजांवर वर्चस्व गाजवताना पाहिलय” असं राहुल म्हणालां.

फिरकी गोलंदाजांना संधी? पहिल्या दोन वनडेमध्ये आर. अश्विन आणि युजवेंद्र चहल दोघांना स्थान देण्याची राहुलची भूमिका आहे. “आमच्याकडे शानदार स्पिनर आहेत. अश्विनने वनडेमध्ये पुनरागमन केलय. त्याची क्षमता आपल्या सर्वांना ठाऊक आहे. चहल मागच्या काही वर्षांपासून आपली भूमिका चोख बजावतोय. खेळपट्टीकडून गोलंदाजांना मदत मिळू शकते” असे राहुल म्हणाला.

संबंधित बातम्या: IPL 2022: सहा सीजनमध्ये फक्त चार फिफ्टी, बेभरवशाच्या खेळाडूवर पैशांचा पाऊस, मिळणार 11 कोटी रुपये IND vs SA 1st ODI LIVE Streaming: कधी आणि कुठे पाहाल सामना IND vs SA, 1st ODI: पहिल्या वनडेवर पावसाचे सावट? जाणून घ्या पार्लचा वेदर रिपोर्ट

india vs south Africa kl rahul will open shikhar dhawan likely to be preferred over ruturaj gaikwad

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.