
प्रसिध कृष्णा याने 48 व्या ओव्हरमधील पाचव्या बॉलवर ओटनील बार्टमॅन याला बोल्ड करत चौथी विकेट घेतली. यासह दक्षिण आफ्रिकेचा डाव 270 धावांवर आटोपला आहे. टीम इंडियासाठी प्रसिध व्यतिरिक्त कुलदीप यादव यानेही 4 विकेट्स घेतल्या. तर दक्षिम आफ्रिकेसाठी क्विंटन डी कॉक याने सर्वाधिक धावा केल्या. डी कॉक याने 106 धावा केल्या. त्यामुळे आता टीम इंडिया 271 रन्स करण्यात यशस्वी ठरणार का? हे थोड्याच वेळात स्पष्ट होईल.
कुलदीप यादव याने चौथी विकेट घेत दक्षिण आफ्रिकेला नववा झटका दिला आहे. कुलदीपने लुंगी एन्गिडी याला एलबीडब्ल्यू आऊट केलं. लुंगी 1 रन करुन माघारी परतला.
कुलदीप यादव याने 43 व्या ओव्हरमधील तिसऱ्या बॉलवर कॉर्बिन बॉश याला आऊट करत दक्षिण आफ्रिकेला आठवा झटका दिला आहे. कुलदीपने कॉर्बिनला आपल्याच बॉलिंगवर कॅच आऊट केलं.
प्रसिध कृष्णा याच्यानंतर कुलदीप यादव याने कमाल केली आहे. कुलदीपने दक्षिण आफ्रिकेकला 3 बॉलमध्ये 2 झटके दिले आहेत. कुलदीपने डवाल्ड ब्रेव्हीस आणि मार्को यान्सेन या धोकादायक जोडीला आऊट केलं. कुलदीपने आधी डेवाल्ड ब्रेव्हीस याला रोहित शर्मा याच्या हाती कॅच आऊट केलंय. त्यानंतर कुलदीपने मार्को यान्सेन याला रवींद्र जडेजा याच्या हाती कॅच आऊट केलं.
प्रसिध कृष्णा याने घेतलेल्या झटपट 3 विकेट्सच्या जोरावर टीम इंडियाने सामन्यात जोरदार कमबॅक केलं आहे. तसेच टीम इंडियाच्या गोलंदाजांनी चिवट बॉलिंग केली आहे. भारताने यासह धावांवर ब्रेक लावला आहे. दक्षिण आफ्रिकेने 38 ओव्हरमध्ये 5 विकेट्स गमावून 234 रन्स केल्या आहेत.
टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज प्रसिध कृष्णा याने कमाल केली आहे. प्रसिधने 6 ओव्हरमध्ये दक्षिण आफ्रिकेला 3 झटके दिले आहेत. प्रसिधने आधी एका ओव्हरमध्ये मॅथ्यू ब्रिट्झके आणि एडन मार्रक्रम या दोघांना आऊट केलं. त्यानंतर आता प्रसिधने सेट क्विंटन डी कॉक याला बोल्ड केलं आहे. प्रसिधने डी कॉक याला 106 रन्सवर मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला.
क्विंटन डी कॉक याने शतक पूर्ण केलं आहे. डी कॉक याने 30 व्या ओव्हरमधील तिसऱ्या बॉलवर सिक्स लगावत शतक पूर्ण केलं. डी कॉकने 80 बॉलमध्ये शतक पूर्ण केलं.
प्रसिध कृष्णा याने धमाका केला आहे. प्रसिधने दक्षिण आफ्रिकेला एकाच ओव्हरमध्ये 2 झटके दिले आहेत. प्रसिधने 29 व्या ओव्हरमध्ये ही कामगिरी केली. प्रसिधने दुसऱ्या बॉलवर मॅथ्यू ब्रिट्झके याला आऊट केलं. तर सहाव्या आणि शेवटच्या बॉलवर एडन मार्रक्रम याला विराट कोहली याच्या हाती 1 रनवर कॅच आऊट केलं. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेचा स्कोअर 4 आऊट 170 असा झाला आहे.
प्रसिध कृष्णा याने दक्षिण आफ्रिकेला तिसरा झटका देत आपली पहिली विकेट मिळवली आहे. प्रसिधने मॅथ्यू ब्रिट्झके याला एलबीडबल्यू आऊट केलं. मॅथ्यूने 23 बॉलमध्ये 24 रन्स केल्या.
दक्षिण आफ्रिकेने 28 ओव्हरनंतर 2 विकेट्स गमावून 167 धावा केल्या आहेत. ओपनर क्विंटन डी कॉक शतकाच्या आणखी जवळ पोहचला आहे. डी कॉक 75 बॉलमध्ये 92 रन्सवर नॉट आऊट खेळत आहे. तर मॅथ्यू ब्रिट्झके याने 24 रन्स केल्या आहेत.
दक्षिण अफ्रिकेला टेम्बा बावुमाच्या रूपाने दुसरा धक्का बसला आहे. त्याचं अर्धशतक अवघ्या 2 धावांनी हुकलं. त्याने 67 चेंडूत 48 धावा केल्या. रवींद्र जडेजाच्या गोलंदाजीवर विराट कोहलीने त्याचा झेल पकडला आणि तंबूचा रस्ता दाखवला.
दक्षिण आफ्रिकेने 100 धावा पूर्ण केल्या आहेत. दक्षिण आफ्रिकेने 19 ओव्हरमध्ये 100 धावा पूर्ण केल्या. टेम्बा बवुमा 38 आणि क्विंटन डी कॉक 60 रन्सवर नॉट आऊट खेळत आहेत.
दक्षिण आफ्रिकेचा ओपनर बॅट्समन आणि विकेटकीपर क्विंटन डी कॉक याला अखेर सुर गवसला आहे. कॉकने अंतिम सामन्यात अर्धशतक ठोकलं आहे. कॉकने 53 बॉलमध्ये 4 सिक्स आणि 4 फोरसह अर्धशतक पूर्ण केलं.
टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेला रायन रिकेल्टन याला झिरोवर आऊट करत पहिला झटका दिला. त्यानंतर क्विंटन डी कॉक आणि टेम्बा बवुमा या जोडीने दुसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली आहे. त्यामुळे टीम इंडियाचा ही जोडी फोडण्याचा प्रयत्न आहे.
टीम इंडियाच्या गोलंदाजांनी पावरप्लेमधील पहिल्या 7 ओव्हरमध्ये चिवट बॉलिंग केली आहे. टीम इंडियाने 7 ओव्हरमध्ये दक्षिण आफ्रिकेला 23 धावा दिल्या आहेत. तर टीम इंडियाकडून अर्शदीप सिंह याने एकमेव विकेट घेतली आहे.
अर्शदीप सिंह याने दक्षिण आफ्रिकेला सामन्यातील पहिल्याच ओव्हरमध्ये झटका दिला आहे. अर्शदीपने रायन रिकेल्टन याला कॅप्टन केएल राहुल याच्या हाती कॅच आऊट केलं आहे. रायनला भोपळाही फोडता आला नाही.
टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका तिसऱ्या आणि अंतिम एकदिवसीय सामन्याला सुरुवात झाली आहे. टीम इंडियाने टॉस जिंकून दक्षिण आफ्रिकेला बॅटिंगसाठी भाग पाडलं आहे. दक्षिण आफ्रिकेकडून क्विंटन डी क़ॉक आणि रायन रिकेल्टन ही सलामी जोडी मैदानात आली आहे.
रोहित शर्मा, यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, ऋतुराज गायकवाड, तिलक वर्मा, केएल राहुल (कॅप्टन आणि विकेटकीपर), रवींद्र जडेजा, हर्षित राणा, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग आणि प्रसीध कृष्णा.
रायन रिकेल्टन, क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), टेम्बा बवुमा (कर्णधार), मॅथ्यू ब्रेट्झके, एडन मार्रक्रम, डेवाल्ड ब्रेव्हीस, मार्को यान्सेन, कॉर्बिन बॉश, केशव महाराज, लुंगी एन्गिडी आणि ओटनील बार्टमन.
टीम इंडियाने तिसऱ्या आणि अंतिम सामन्यात टॉस जिंकला आहे. कॅप्टन केएल राहुल याने फिल्डिंगचा निर्णय घेत दक्षिण आफ्रिकेला बॅटिंगची संधी दिली आहे. टीम इंडियाने या मालिकेतील पहिल्या 2 सामन्यात टॉस गमावून बॅटिंग केली होती.
एडन मार्कराम, क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), टेम्बा बवुमा (कर्णधार), मॅथ्यू ब्रेट्झके, डेवाल्ड ब्रेव्हिस, टोनी डी झोर्झी, मार्को यान्सेन, कॉर्बिन बॉश, केशव महाराज, नांद्रे बर्गर, लुंगी एनगिडी, रायन रिकेल्टन, ओटनील बार्टमन, रुबिन हर्मन आणि प्रिनेलन सुब्रेन.
रोहित शर्मा, यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, ऋतुराज गायकवाड, केएल राहुल (कॅप्टन आणि विकेटकीपर), वॉशिंग्टन सुंदर, रवींद्र जडेजा, हर्षित राणा, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, प्रसिद्ध कृष्णा, ऋषभ पंत, तिलक वर्मा, ध्रुव जुरेल आणि नितीश कुमार रेड्डी.
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका तिसऱ्या आणि अंतिम एकदिवसीय सामन्याला दुपारी 1 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. तर त्याआधी 1 वाजता टॉस होणार आहे. सामन्याचं आयोजन हे विशाखापट्टणममधील एसीए व्हीडीसीए क्रिकेट स्टेडियममध्ये करण्यात आलं आहे.
टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका एकदिवसीय मालिका रंगतदार स्थितीत आहे. आज 6 डिसेंबरला तिसऱ्या आणि अंतिम सामन्यानंतर मालिका विजेता संघ निश्चित होणार आहे. उभयसंघातील 3 सामन्यांची मालिका 1-1 ने बरोबरीत आहे. टीम इंडियाने या मालिकेत विजयी सुरुवात केली. भारताने रांचीत दक्षिण आफ्रिकेवर 17 धावांनी मात केली. तर दक्षिण आफ्रिकेने दुसऱ्या सामन्यात पलटवार करत मालिकेत बरोबरी साधली. आता विशाखापट्टणममध्ये कोणता संघ मालिकेवर नाव कोरणार? याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे. या सामन्यातील प्रत्येक अपडेट आपण या लाईव्ह ब्लॉगद्वारे जाणून घेणार आहोत.