IND vs SA 2nd T20: आज टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका मॅच होईल? काय आहे वेदर UPDATE

IND vs SA 2nd T20: क्रिकेट चाहते मॅचसाठी खूप उत्सुक. पण हवामान विभागाने काय अंदाज वर्तवलाय.

IND vs SA 2nd T20: आज टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका मॅच होईल? काय आहे वेदर UPDATE
Team indiaImage Credit source: PTI
Follow us
| Updated on: Oct 02, 2022 | 1:01 PM

मुंबई: टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये (IND vs SA) रविवारी 2 ऑक्टोबरला टी 20 सीरीजमधला दुसरा सामना (T20 Match) होणार आहे. या मॅचसाठी चाहते खूप उत्सुक आहेत. अडीच वर्षानंतर गुवाहाटीमध्ये मॅच होणार आहे. याआधी जानेवारी 2020 मध्ये टीम इंडिया (Team india) येथे सामना खेळण्यासाठी आली होती. त्यावेळी या सामन्यात जे घडलं, तो धोका आजही कायम आहे.

मागच्यावेळी कोण विलन बनलं होतं?

गुवाहाटीच्या बारसापारा क्रिकेट स्टेडियमवर आजपर्यंत 3 क्रिकेट सामने झाले आहेत. यात एक मॅच पावसामुळे रद्द झाली होती. टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिकेमधील सामन्याआधी आकाशात ढग दाटले आहेत. त्यामुळे अडीच वर्षापूर्वी जे घडलं, त्याची चिंता कायम आहे. या सामन्यासाठी सर्व तिकीटांची विक्री झाली आहे.

रविवारबद्दल काय अंदाज आहे?

रविवारी गुवाहाटीच्या आकाशात काळे ढग असतील. संध्याकाळच्यावेळी मेघ गर्जनेसह पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. पीटीआयने हवामान विभागाच्या हवाल्याने हे वृत्त दिलय. संध्याकाळी 5 च्या सुमारास पाऊस कोसळू शकतो, असा एक्यूवेदरने अंदाज वर्तवलाय.

आसाम क्रिकेट संघटना पूर्ण तयारीत

संध्याकाळी 7 वाजता मॅच सुरु होईल. त्यावेळी पाऊस कोसळला, तर मॅचवर त्याचा प्रभाव पडू शकतो. पाऊस झाल्यास मैदान सुकवण्यात जास्त वेळ वाया जाऊ शकतो. वेळेचा हा अपव्यय टाळण्यासाठी सर्व व्यवस्था केल्याचं आयोजकांनी सांगितलं.

अमेरिकेहून मागवली स्पेशल कव्हर्स

आसाम क्रिकेट संघटनेने अमेरिकेहून पीच कव्हर मागवली आहेत. या कव्हर्समुळे पाणी पीचमध्ये झिरपणार नाही, असं आसाम क्रिकेट संघटनेचे सचिव देवाजीत सायकिया यांनी सांगितलं.

नागपूरसारखी परिस्थिती निर्माण होऊ नये, अशी भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डाची इच्छा असेल. पाऊस थांबल्यानंतरही मैदान ओलं राहिल्यामुळे बराचवेळ नागपूरमध्ये मॅच सुरु झाली नव्हता. अडीच तास उशिराने सामना सुरु झाला होता. प्रत्येकी 8 ओव्हरची मॅच झाली होती.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.