IND vs SL: चित्त्याच्या चपळाईने Ishan Kishan ने मागे पळत जाऊन पकडली जबरदस्त कॅच VIDEO

IND vs SL: हर्षल पटेल ही कॅच सहज पकडू शकला असता. पण इशानने त्याला थांबायला सांगितलं आणि अद्भूत कॅच पकडली

IND vs SL: चित्त्याच्या चपळाईने Ishan Kishan ने मागे पळत जाऊन पकडली जबरदस्त कॅच VIDEO
Ind vs SL ishan kishan catchImage Credit source: Screengrab
Follow us
| Updated on: Jan 04, 2023 | 9:13 AM

मुंबई: टीम इंडियाने श्रीलंकेविरुद्ध पहिला T20 सामना 2 रन्सनी जिंकला. दीपक हुड्डा, अक्षर पटेलचा आणि इशान किशनचा अपवाद वगळता अन्य भारतीय फलंदाज फार चमक दाखवू शकले नाहीत. कालच्या मॅचमध्ये गोलंदाजांनी कमाल केली. त्यांनी श्रीलंकन फलंदाजांना क्रीजवर टीकू दिलं नाही. फिल्डिंग सुद्धा कमालीची होती. इशान किशनने या मॅचमध्ये पकडलेल्या एका कॅचची सर्वत्र चर्चा आहे. चित्त्याच्या चपळाईने मागे पळत जाऊन इशानने ही कॅच पकडली. 8 व्या ओव्हरमध्ये हा झेल घेतला. उमरान मलिकच्या चेंडूवर चरिथ असालंकाने पुल फटका खेळण्याचा प्रयत्न केला. पण चेंडू बॅटच्या वरच्या भागाला लागला.

इशानची नजर फक्त चेंडूवर

चेंडू फाइन लेगच्या दिशेला हवेत गेला. हर्षल पटेल कॅच घेण्यासासाठी डीपवरुन धावत येत होता. पण इशान किशनची नजर चेंडूवर होती. त्याची नजर वर चेंडूकडे होती. त्याने हर्षलला थांबण्याचा इशारा केला व चित्त्याच्या चपळाईने हवेत झेपावून झेल पकडला. कॅप्टन हार्दिक पंड्याला सुद्धा ही कॅच पाहून आश्चर्य वाटलं. त्याच्या चेहऱ्यावर हास्य होतं.

इशानला सलाम

इशान किशनच्या कॅचमुळे असालंकाचा डाव 12 धावांवर आटोपला. इशानच्या या कॅचच सर्वत्र कौतुक होतय. माजी ऑलराऊंडर इरफान पठानने सुद्धा टि्वट केलय. अलीकडच्या काही दिवसात कुठल्या विकेटकीपरने पकडलेली ही सर्वोत्तम कॅच आहे. इशानने बॅटनेही कमाल केली

विकेटच्यापाठी इशानने कमाल केलीच. पण बॅटने सुद्धा त्याने चांगल्या धावा केल्या. दीपक हुड्डानंतर य़ा सामन्यात सर्वाधिक धावा इशानने केल्या. त्याने 37 धावा केल्या. त्याने 29 चेंडूत या धावा फटकावताना 3 चौकार आणि 2 षटकार लगावले. हुड्डाने नाबाद 41 धावा केल्या. अक्षर पटेल नाबाद 31 धावांची इनिंग खेळला. या तिघांशिवाय कॅप्टन हार्दिक पंड्याने 29 रन्सच योगदान दिलं. त्याशिवाय अन्य भारतीय फलंदाज फार चालले नाहीत. शुभमन गिल, सूर्यकुमार यादव, संजू सॅमसन फ्लॉप ठरले.

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.