AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs SL, 3rd T20I, LIVE Streaming: जाणून घ्या कधी आणि कुठे पाहता येईल सामना?

धरमशाला येथे झालेल्या दुसऱ्या टी 20 सामन्यात भारताने श्रीलंकेवर (India vs Srilanka) शानदार विजय मिळवला. श्रेयस अय्यर (Shreyas iyer) आणि रवींद्र जाडेजा (Ravindra jadeja) भारताच्या विजयाचे हिरो ठरले. दोघांनी मिळून चौथ्या विकेटसाठी 58 धावांची विजयी भागीदारी केली.

IND vs SL, 3rd T20I, LIVE Streaming: जाणून घ्या कधी आणि कुठे पाहता येईल सामना?
Team India - भारत आणि श्रीलंका यांच्यातील T20 मालिकेतील शेवटचा सामना धरमशाला येथे खेळवला जाणार आहे. Image Credit source: BCCI Twitter
| Updated on: Feb 27, 2022 | 11:09 AM
Share

धरमशाला : येथे झालेल्या दुसऱ्या टी 20 सामन्यात भारताने श्रीलंकेवर (India vs Srilanka) शानदार विजय मिळवला. श्रेयस अय्यर (Shreyas iyer) आणि रवींद्र जाडेजा (Ravindra jadeja) भारताच्या विजयाचे हिरो ठरले. दोघांनी मिळून चौथ्या विकेटसाठी 58 धावांची विजयी भागीदारी केली. श्रेयसच्या 44 चेंडूत नाबाद 74 धावा आणि रवींद्र जाडेजाच्या 18 चेंडूत नाबाद 45 धावांच्या बळावर भारताने श्रीलंकेवर सात विकेट राखून विजय मिळवला. भारताने मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे. उभय संघांमध्ये आज तिसरा सामना खेळवला जाणार आहे. भारताने मालिका कालच खिशात घातली आहे त्यामुळे आज होणारा तिसरा सामना फक्त औपचारिकता मात्र आहे. T20 मालिकेतील शेवटचा सामना धरमशाला येथे खेळवला जाणार आहे. हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशनच्या या मैदानावर रविवारी हा सामना होणार आहे.

अशी असू शकते भारताची प्लेइंग इलेवन

रोहित शर्मा (कर्णधार), संजू सॅमसन (विकेटकीपर), मयंक अग्रवाल, श्रेयस अय्यर, दीपक हुड्डा, वेंकटेश अय्यर, रवींद्र जडेजा, युजवेंद्र चहल, मोहम्मद सिराज, भुवनेश्वर कुमार आणि जसप्रीत बुमराह

भारताचा टी-20 संघ

रोहित शर्मा (कर्णधार), मयंक अग्रवाल, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, संजू सॅमसन, इशान किशन (विकेटकीपर), व्यंकटेश अय्यर, दीपक चाहर, दीपक हुडा, रवींद्र जडेजा, युजवेंद्र चहल, रवी बिश्नोई, कुलदीप यादव, मोहम्मद. सिराज, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), आवेश खान

भारत आणि श्रीलंका यांच्यातील दुसरा T20 सामना कधी खेळवला जाईल? भारत आणि श्रीलंका

यांच्यातील दुसरा T20 सामना 27 फेब्रुवारी (रविवार) रोजी खेळवला जाणार आहे.

भारत आणि श्रीलंका यांच्यातील दुसरा T20 सामना कुठे खेळवला जाईल? भारत आणि श्रीलंका

यांच्यातील हा सामना धर्मशाला येथील हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर खेळवला जाणार आहे.

भारत आणि श्रीलंका यांच्यातील दुसरा T20 सामना कधी सुरू होईल? भारत आणि श्रीलंका यांच्यातील हा

सामना संध्याकाळी 07:00 वाजता सुरू होईल, तर नाणेफेक संध्याकाळी 6:30 वाजता होईल.

भारत आणि श्रीलंका यांच्यातील दुसऱ्या T20 सामन्याचे थेट प्रक्षेपण (लाईव्ह टेलिकास्ट) कुठे पाहू शकता?

भारत आणि श्रीलंका यांच्यातील हा सामना स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या चॅनेलवर वेगवेगळ्या भाषांमध्ये पाहता येईल.

भारत आणि श्रीलंका यांच्यातील दुसऱ्या T20I सामन्याचे लाइव्ह स्ट्रीमिंग कुठे पाहता येईल?

सबस्क्रिप्शनसह हॉटस्टारवर सामन्याचे ऑनलाइन लाईव्ह स्ट्रीमिंग पाहता येईल. याशिवाय tv9marathi.com वरही सामन्याचे लाईव्ह अपडेट्स वाचता येतील.

इतर बातम्या

IND vs SL: रोहित शर्माचा जगभरात डंका, पण श्रीलंकेच्या गोलंदाजासमोर मैदानात उभं राहणं अवघड, 26 चेंडूत 5 वेळा बाद

IND vs SL: श्रेयस अय्यर-जाडेजाने लंकेच्या गोलंदाजांना धु धु धुतलं, लिहिली भारताच्या विजयाची स्क्रिप्ट

IND vs SL T-20: रवींद्र जाडेजाच्या पहिल्या तीन चेंडूंवर 6,4,6 त्यानंतर पुढच्या चेंडूवर असा केला पलटवार

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.