AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

INDIA vs SRI LANKA : 12 वर्षांआधी याच मैदानावर करोडो भारतीयांचं स्वप्न पूर्ण झालेलं, तसाच योगायोग फक्त…

IND vs SL : मुंबईतील वानखेडे मैदानावर भारत आणि श्रीलंका आज एकमेकांना भिडणार आहेत. या सामन्यामध्ये श्रीलंका पराभूत झाल्यावर वर्ल्ड कपमधून बाहेर पडणार आहे. तर रोहितसेना आपला सलग सातवा विजय मिळवण्यासाठी उत्सुक असेल.

INDIA vs SRI LANKA : 12 वर्षांआधी याच मैदानावर करोडो भारतीयांचं स्वप्न पूर्ण झालेलं, तसाच योगायोग फक्त...
Harish Malusare
Harish Malusare | Updated on: Nov 02, 2023 | 12:23 PM
Share

मुंबई : वर्ल्ड कपमध्ये भारत आणि श्रीलंका (IND vs SL World Cup 2023) भिडणार असून हा सामना मुंबईमधील वानखेडे स्टेडियमवर होणार आहे. या सामन्यात विजय मिळवत भारत सेमी फायनलध्ये आपली जागा पक्की करणार आहे. श्रीलंका आजच्या सामन्यात पराभूत झाली तर ते वर्ल्ड कपमधून बाहेर पडणार आहेत. हा सामना दुपारी दोन वाजता सुरु होईल. याच मैदानावर 12 वर्षांपूर्वी करोडो भारतीयांचं स्वप्न पूर्ण झालेलं. महेंद्र सिंह धोनी याने मारलेला सिक्सर आणि त्यानंतर रवी शास्त्री यांनी केलेली कॉमेंट्री भारतांच्या मनावर कोरलेली आहे. त्याच मैदानावर आज भारत-श्रीलंका आमने-सामने आहेत.

2011 आणि 2023 मधील श्रीलंकेच्या संघात जमीन-आस्मानचा फरक आहे. भारतीय संघाच्या तुलनेत श्रीलंका संघ कमकुवत आहे. भारताने यंदाच्या स्पर्धेमध्ये एकही सामना गमावला नाही. त्यामुळे भारताला पराभूत करणं श्रीलंकेसमोर मोठं आव्हान असणार आहे. चेन्नईमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध 5 धावांवर भारताच्या 3 विकेट गेल्या होत्या. मात्र विराट कोहली आणि के एल राहुल यांनी डाव सावरत संघाला विजय मिळवून दिला. इंग्लंडविरूद्ध फलंदाजी ढेपाळली मात्र गोलंदाजांनी कोणतीही कसर सोडता भारताला विजय मिळवून दिला.

रोहित शर्माने हार्दिक पंड्या दुखापती झाल्यावर मोहम्मद शमी आणु सूर्यकुमार यादव यांना संधी दिली. दोघांनीही आतापर्यंत संघाला जशी गरज असेल तशी कामगिरी केली आहे. आजच्या सामन्यातही भारतीय संघ कोणतेही बदल न करता उतरेल अशीच शक्यता आहे.

भारतीय संघ : रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पांड्या, शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, रविचंद्रन अश्विन, इशान किशन, सूर्यकुमार यादव .

श्रीलंकेचा संघ : कुशल मेंडिस (कर्णधार), कुशल परेरा, पथुम निसांका, दुष्मन चमीरा, दिमुथ करुणारत्ने, सादिरा समरविक्रमा, चारिथ असालंका, धनंजय डी सिल्वा, महेश तिक्शिना, दुनिथ वेलालगे, कसून रजिथा, अँजेलो दुशान, एंजेलो माथे, ड्युशन माथे, ड्युनिथ वेलालगे. चमिका

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?