AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs SL फायनल सामन्याआधी पावसाबाबत मोठी अपडेट समोर, व्हिडीओ आला समोर!

Ind vs ban Asia cup final : भारत आणि श्रीलंकेमध्ये होणाऱ्या सामन्यामध्ये पावसाचं संकट आहे. पावसाने खोडा घातला तरी एक दिवस राखीव आहे. त्याआधी आजचं कोलंबोमधील वातावरण कसं ते पाहून घ्या>

IND vs SL फायनल सामन्याआधी पावसाबाबत मोठी अपडेट समोर, व्हिडीओ आला समोर!
| Updated on: Sep 17, 2023 | 11:51 AM
Share

मुंबई :  आशिया कप 2023  मध्ये भारत आणि श्रीलंका आमने-सामने येणार आहेत. आज म्हणजेच रविवारी 17 सप्टेंबर रोजी दुपारी तीन वाजता सामन्याला सुरूवात होणारआहे. आशिया कपच्या फायनल सामन्याकडे क्रिकेट जगताचं लक्ष लागलेलं असणार आहे. आतापर्यंत पावसाने आशिया कपमधील अनेक सामन्यांमध्ये खोडा घातला आहे. या सामन्यावर पावसाचं संकट असणार असून हा पावसाबाबत मोठी अपडेट समोर आली आहे.

सामन्याच्या दिवशी दिवसभर ढगाळ वातावरण असणा आहे. त्यामुळे सामन्यात केव्हाही पाऊस खोडा घालू शकतो. अंदाजानुसार, संध्याकाळी पावसाची 90 टक्के शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यासोबतच सामन्याआधी 1 ते 2 या वेळेत वादळाचाही अंदाज वर्तवण्यात आला आहे. मात्र गेले दोन दिवसही पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला मात्र पाऊस काही झाला नाही.

पाहा व्हिडीओ-

हवामानामध्ये अचानक बदल होऊ शकतो, त्यामुळे आता आभाळ मोकळं असलं तरी वातावरणामध्ये कधीही होण्याची शक्यता आहे. मात्र सर्वा चाहते आज पाऊस पडायला नको अशी प्रार्थना करत असतील. जरी पाऊस आला तरी काही काळजी करण्याचं कारण नाही. आजचा सामना रद्द झाला तरी उद्या म्हणेजच 18 सप्टेबर हा दिवस राखून ठेवला आहे. मात्र आजचा सनडेला फुल अँड फायनल काय तो निकाल लागायला हवा.

 पावसाने सामना रद्द झाला तर…

जर पावसाने आजही एन्ट्री केली आणि उद्याचा राखीव दिवस ठेवला आहे. पण जर राखीव दिवशीसुद्धा पावसाने आगमन केलं तर आशिया कप फालनलची ट्रॉफी कोणाच्या पदरात पडणार असा सवाल चाहत्यांना पडला आहे. जर दुसऱ्याही दिवशी पावसाचं आगमन झालं आणि सामना रद्द झाला तप भारत आणि श्रीलंका दोघांना विजेतेपद वाटून देण्यात येणार आहे. याआधी चॅम्पियन ट्रॉफीसुद्धा पावसामुळे सामना रद्द झाल्याने भारत आणि श्रीलंकेमध्ये विजेतेपद वाटून देण्यात आलं होतं.

दरम्यान, आजचा फायनल सामना कोलंबोमधील प्रेमदासा स्टेडिअममध्ये दुपारी तीन वाजता होणार आहे.  या सामन्यात भारताच्या प्लेइंग 11 मध्ये बदल पाहायला मिळू शकतो. रोहित अँड कंपनीला आठव्यांदा आशिया कपची ट्रॉफी भारताच्या नावावर करण्याची नामी संधी आहे.

वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.