AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rohit Sharma On Team : टीम बाहेर असलेल्या खेळाडूंबाबत कर्णधार रोहित शर्मा याचं मोठं वक्तव्य, स्पष्टच सांगितलं की…

Asia Cup 2023 Team India : आशिया कप स्पर्धा अवघ्या काही तासांवर येऊन ठेपली असताना कर्णधार रोहित शर्मा याच्या वक्तव्याने सर्वांच लक्ष वेधून घेतलं आहे. स्पर्धेसाठी 17 खेळाडूंच्या नावाची घोषणा झाली आहे.

Rohit Sharma On Team : टीम बाहेर असलेल्या खेळाडूंबाबत कर्णधार रोहित शर्मा याचं मोठं वक्तव्य, स्पष्टच सांगितलं की...
Rohit Sharma On Team : टीममध्ये निवड न झालेल्या खेळाडूंबाबत कर्णधार रोहित शर्मा असं काय म्हणाला की...
| Updated on: Aug 28, 2023 | 6:38 PM
Share

मुंबई : वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेपूर्वी टीम इंडियाची आशिया कप स्पर्धेत कसोटी लागणार आहे. आशिया कप स्पर्धेसाठी 17 सदस्यीय टीमची घोषणा झाली आहे. निवड झालेल्या खेळाडूंना या स्पर्धेत आपलं कर्तृत्व सिद्ध करून दाखवावं लागणार आहे. कारण याच चमूतून वर्ल्डकपसाठी 15 खेळाडूंची निवड केली जाणार आहे. म्हणजेच काही खेळाडूंना बाहेरचा रस्ता दाखवला जाणार आहे. वनडे वर्ल्डकप स्पर्धेला 5 ऑक्टोबरपासून सुरुवात होईल आणि 19 नोव्हेंबर 2023 स्पर्धेतील अंतिम सामना असणार आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वातील संघाला गेल्या दहा वर्षातील आयसीसी चषकांचा दुष्काळ संपवण्याची संधी आहे. कारण गेल्या दहा वर्षात टीम इंडियाने आयसीसी स्पर्धेत एकही जेतेपद मिळवलेलं नाही. त्यामुळे आशिया कप स्पर्धेसोबत वनडे वर्ल्डकप संघाबाबत खलबतं सुरु झाली आहे. असं असताना कर्णधार रोहित शर्मा याने संघ निवडीबाबत मोठं वक्तव्य केलं आहे.

‘आम्ही काहीच करू शकत नाही’

रोहित शर्मा याने पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत आपली बाजू स्पष्ट केली. “जर संघात कोणाला संधी मिळाली नाही तर त्यामागे काही कारण असतात. याचा अर्थ असा नाही की, त्याला पसंत केलं जात नाही. कर्णधाराची वैयक्तिक आवड आणि नाआवड याचा येथे प्रश्नच उद्भवत नाही. जर एखादा खेळाडू टीमबाहेर असेल तर त्यामागे काही कारणं आहेत. त्यात मी काहीच करू शकत नाही.”, असं रोहित शर्मा याने स्पष्टपणे सांगितलं.

रोहित शर्मा याने आपलं दु:ख केलं व्यक्त

रोहित शर्मा याने वर्ल्डकपच्या त्या कटू आठवणींना उजाळा दिला. रोहित शर्मा 2011 मध्ये वर्ल्डकप जिंकणाऱ्या संघात नव्हता. त्यामुळे त्याने आपलं दु:ख व्यक्त केलं. रोहित शर्मा याने सांगितलं की, “माझी संघात निवड झाली नव्हती म्हणून मी दु:खी होतो. काही खेळाडू आपला निश्चित ठेवून विचार करत असतात. जेव्हा 2011 च्या संघात मी नव्हतो तेव्हा मला खूप वाईट वाटलं होतं आणि एका खोलीत स्वत:ला बंद करून ठेवलं होतं. तेव्हा युवराज सिंग याने माझी समजूत काढली होती. युवराज मला डिनरवर घेऊन गेला. तसेच पुढे खेळण्यासाठी बऱ्याच संधी असल्याचं सांगितलं. तसेच आपला खेळ सुधारून पुनरागमन करू शकतो, असं युवराज सिंग म्हणाला होता होतं.”

Follow Us
ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी काँग्रेसचा एल्गार; कार्यकर्ते थेट..
Nagpur : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी काँग्रेसचा एल्गार; कार्यकर्ते थेट बॅरिकेड्सवर चढले, पुतळा जाळत...
मला एकटं पाडण्याचा अन्....; मनोज जरांगे पाटलांचा गंभीर दावा
Manoj Jarange Patil : मला एकटं पाडण्याचा अन्....; मनोज जरांगे पाटलांचा गंभीर दावा, पुढे म्हणाले...
गोरेगावमधील अवैध झोपड्यांवर BMCची कारवाई; थेट बुलडोझर...
Goregaon : गोरेगावमधील अवैध झोपड्यांवर BMCची कारवाई; थेट बुलडोझर...
ज्ञानेश कुमारांनी तात्काळ राजीनामा द्यावा; काँग्रेस रस्त्यावर...
Pune : ज्ञानेश कुमारांनी तात्काळ राजीनामा द्यावा; मतचोरीच्या आरोपांवर काँग्रेस रस्त्यावर, पुण्यात जोरदार आंदोलन
खाकी वर्दीतच दारूचा धिंगाणा; काळाचौकी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडलं?
Mumbai Crime : खाकी वर्दीतच दारू पिऊन कॉन्स्टेबलचा धिंगाणा; काळाचौकी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडलं?
लोकशाहीचाच मेंदू चोरण्याचा प्रयत्न; राऊतांचा निवडणूक आयोगावर घणाघात
Sanjay Raut : लोकशाहीचाच मेंदू चोरण्याचा प्रयत्न; संजय राऊतांचा निवडणूक आयोगावर घणाघात, फडणवीसांनाही केले थेट सवाल
ॲमेझॉन-फ्लिपकार्टला CCPAचा मोठा दणका! विना नोंदणी विक्रीप्रकरणी थेट...
Amazon: Flipkart : ॲमेझॉन-फ्लिपकार्टला CCPAचा मोठा दणका! विना नोंदणी कीटकनाशकांच्या विक्रीप्रकरणी थेट...
आधी स्वतःचा विभाग स्वच्छ करा...; संजय राऊतांचं तुकाराम मुंढेंना पत्र
Sanjay Raut :आधी स्वतःचा विभाग स्वच्छ करा...; संजय राऊतांचं तुकाराम मुंढेंना पत्र, FDAतील कथित गैरकारभारावर थेट सवाल
अजितदादा, तुमच्याविना यंदाचा गणेशोत्सव...; रोहित पवारांचं भावनिक ट्विट
Rohit Pawar : अजितदादा, तुमच्याविना यंदाचा गणेशोत्सव...; रोहित पवार यांचं भावनिक ट्विट चर्चेत
राज्यातील दुष्काळावर रोहित पवारांनी मांडली चिंताजनक आकडेवारी, म्हणाले
Rohit Pawar : सरकारी आकडेवारीपेक्षा परिस्थिती अधिक गंभीर?; राज्यातील दुष्काळावर रोहित पवारांनी मांडली चिंताजनक आकडेवारी