Video : भारताचा युवा स्टार श्रीलंकेत साजरा करतोय वाढदिवस, बीसीसीआयने पोस्ट केला व्हिडीओ

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: |

Updated on: Jul 07, 2021 | 3:56 PM

7 जुलै म्हटलं की भारतीय क्रिकेटप्रेमींना महेंद्रसिंग धोनीचा वाढदिवस आठवतो. पण आज आणखी एका युवा खेळाडूचा वाढदिवस असून तो सध्या भारतीय संघासोबत श्रीलंका दौऱ्यावर आहे.

Video : भारताचा युवा स्टार श्रीलंकेत साजरा करतोय वाढदिवस, बीसीसीआयने पोस्ट केला व्हिडीओ
देवदत्त पडिक्कल
Follow us

कोलंबो : आज भारतीय क्रिकेटमधील (Indian Cricket Team) दोन स्टार खेळाडूंचा वाढदिवस आहे. एक म्हणजे सर्वांचा लाडका माजी कर्णधार दिग्गज क्रिकेटपटू महेंद्रसिंग धोनी (MS Dhoni) आणि दुसरा म्हणजे नुकताच उदयास येत असलेला युवा खेळाडू देवदत्त पडिक्कल (Devdutt Padikkal). पडिक्कल सध्या भारतीय संघासोबत श्रीलंकेच्या दौऱ्यावर (Sri Lanka Tour) आहे. आयपीएलमध्ये (IPL) आरसीबीचा (RCB) सलामीवीर म्हणून धडाकेबाज कामगिरी करणारा पडिक्कल आता आंतरराष्ट्रीय क्रिकेट गाजवण्यासाठी श्रीलंका दौऱ्यातून सलामीला येत आहे. (Indian Cricket Team Opener Devdutt Padikkal Birthday today His Batting Video in Sri Lanka Posted by BCCI)

7 जुलै 2000 रोजी जन्मलेला देवदत्त आज त्याचा 21 वा वाढदिवस साजरा करत आहे. तो सध्या भारतीय संघासोबत श्रीलंकेत 13 जुलैपासून सुरु होणाऱ्या मर्यादीत षटकांच्या सामन्यांसाठी सज्ज झाला आहे. सामना तोंडावर आला असल्याने देवदत्त वाढदिवस साजराही सराव करुन करत आहे. देवदत्तचा नेटमध्ये सराव करतानाचा व्हिडीओच बीसीसीआयने (BCCI) पोस्ट करत त्याला शुभेच्छा दिल्या आहेत.

रणजीते  विजय हजारे मग आयपीएल पडिक्कलचाच जलवा

डावखुरा फलंदाज सलामीवीर देवदत्त पडिक्कल (Devdutt Padikkal) याचा आज 21 वा वाढदिवस असून 7 जुलै 2000 रोजी केरळच्या इडप्पल येथे देवदत्तचा जन्म झाला होता. 2011 मध्ये परिवारासह बँगलोरला आलेला देवदत्त मग तिथलाच रहिवाशी झाला. पडिक्कलने कर्नाटक संघाकडून प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये रणजी चषकातून पदार्पण केले. मग रणजी गाजवल्यानंतर विजय हजारे ट्रॉफी, सैय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्येही त्याने आपली जादू बिखेरली. अखेर 2019 मध्ये देवदत्तला आयपीएलमध्ये रॉयल चँलेंजर्स बँगलोरने विकत घेतले. तेव्हापासून तो एक उत्तम सलामीवीर म्हणून खेळतो आहे.

हे ही वाचा :

M S Dhoni Birthday : क्रिकेटपटूंकडून धोनीवर शुभेच्छांचा वर्षाव, विराटचं कॅप्शन मन जिंकणारं

IND vs SL : राहुल द्रविड देतोय युवा खेळाडूंना धडे, श्रीलंकेवर विजयासाठी भारतीय संघाचा सराव, बीसीसीआयने शेअर केला Videoभारतीय क्रिकेटर्सना अच्छे दिन, मॅच फी वाढवण्याचा BCCI चा निर्णय, पाहा आता किती पैसे मिळणार?

भारताचा धाकड अष्टपैलू क्रिकेटर पुन्हा मैदानावर अवतरणार, श्रीलंकेत करणार पुनरागमन

(Indian Cricket Team Opener Devdutt Padikkal Birthday today His Batting Video in Sri Lanka Posted by BCCI)

Non Stop LIVE Update

Related Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI