IND vs PAK : पाकिस्तानला पुन्हा लायकी दाखवली, भारताने नकवींच्या हातून आशिया कप ट्रॉफी नाकारली

आशिया कप स्पर्धेत भारताने पाकिस्तानला त्यांच्या लायकीप्रमाणे वागवलं. भारताने पाकिस्तानला एकदा नाही तीनदा धोबीपछाड दिला. इतकंच काय तर जिथे शक्य होईल तिथे पाकिस्तानला लायकी दाखवली. आशिया कप स्पर्धेचं जेतेपद घेतानाही भारताने असाच पवित्रा दाखवला.

IND vs PAK : पाकिस्तानला पुन्हा लायकी दाखवली, भारताने नकवींच्या हातून आशिया कप ट्रॉफी नाकारली
पाकिस्तानला पुन्हा लायकी दाखवली, भारताने नकवींच्या हातून आशिया कप ट्रॉफी नाकारली
Image Credit source: Twitter
| Updated on: Sep 29, 2025 | 2:05 AM

आशिया कप स्पर्धेत कर्णधार सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात भारताने जेतेपदावर नाव कोरलं. अंतिम सामन्यात भारताने पाकिस्तानला 5 गडी आणि 2 चेंडू राखून धूळ चारली. या विजयासह आशिया कप स्पर्धेवर नवव्यांदा नाव कोरलं. तसेच गतविजेत्याचं टायटल कायम ठेवलं. भारताने या सामन्यात पाकिस्तानला सलग तिसऱ्यांदा पराभूत केलं. त्यांना डोकंच वर काढू दिलं नाही. जिथे शक्य होईल तिथे नांगी ठेचली. साखळी फेरीत भारतीय संघाने ठेवलेला आक्रमक पवित्रा शेवटपर्यंत कायम राहिला. भारताने साखळी फेरीत हँडशेक न करता पाकिस्तानला लायकी दाखवून दिली होती. इतकंच काय सामन्यानंतरही पाकिस्तानची केविलवाणी स्थिती झाली होती. त्यानंतर पाकिस्तानने रडगाणं सुरु केलं होतं. आयसीसीकडे तक्रारींचा पाढा वाचला. सामनाधिकारी अँडी पायक्राफ्ट यांना हटवण्याची मागणी केली. युएईविरुद्ध सामना खेळणार नसल्याचा कांगावा केला. पण सर्व काही केराच्या टोपलीत गेलं. पाकिस्तानला खाली मान घालून त्यांच्या लायकीप्रमाणे खेळावं लागलं. आता अंतिम सामन्यातही तसंच घडलं.

भारताने अंतिम सामन्यात नाणेफेकीचा कौल झाल्यानंतर नो हँडशेक पॉलिसी कायम ठेवली. त्यात पाकिस्तान लाज गेल्यानंतर समालोचक रवि शास्त्री यांच्याशी संवाद साधणार नाही असा पवित्रा घेतला. तसेच वकार युनिस यांना बोलवून चर्चा केली. त्यामुळे त्यांना वाटलं की आपण खूप काही मोठं केलं. पण नाटकं करून काही मिळत नाही. खोटा देखावा करून उलट पाकिस्तानची लाज गेली. इतकंच काय हातात असलेला सामना गमवावा लागला. पराभव होणार हे स्पष्ट होतं. पण खरा ड्रामा हा ट्रॉफी देताना झाला. कारण भारताने एसीसीचे प्रमुख मोहसिन नकवी यांच्या हातून ट्रॉफी घेण्यास नकार दिला.

बक्षीस समारंभावेळी पाकिस्तानचे पीसीबी प्रमुख आणि आशियाई क्रिकेट असोसिएशनने अध्यक्ष मोहसिन नकवी व्यासपीठावर होते. सामनावीर, मालिकावीर, उपविजेत्या संघाचं बक्षीस समारंभ पार पडला. यावेळी भारतीय खेळाडूंनी पाकिस्तानच्या मोहसिन नकवी यांना लायकी दाखवून दिली. त्यांच्या हातून विजेतेपद स्वीकारण्यास नकार दिला. तसेच शेवटपर्यंत त्या भूमिकेवर कायम राहिले. त्यामुळे मोहसिन नकवी यांचा चेहरा बक्षीस समारंभावेळी पडला होता. खरं त्यांना त्यांची लायकी दाखवून दिली होती.