श्रीलंका दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा, तिकडे खेळाडू प्रेयसीसोबत विवाह बंधनात
भारताचा फलंदाज दीपक हुड्डा लग्नबंधनात अडकला आहे. त्याने त्याच्या लग्नाचे काही फोटो शेअर केले आहेत. त्याने इंस्टाग्रामवर चाहत्यांना ही खुशखबर दिली आहे.

टीम इंडिया 27 जुलैपासून श्रीलंका दौऱ्यावर जाणार आहे. दोन्ही देशांमध्ये तीन सामन्यांची टी-20 मालिका आणि तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळवली जाणार आहे. त्यासाठी बीसीसीआयने संघाची घोषणाही केली आहे. दरम्यान, भारताचा फलंदाज दीपक हुड्डा याने लग्नाचे फोटो शेअर केले आहेत. इंस्टाग्रामवर त्यांने सर्व चाहत्यांना ही खुशखबर दिली आहे.
भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज दीपक हुड्डा याने त्याच्या प्रेयसीसोबत विवाह केला आहे. दोघेही 9 वर्षापासून एकमेकांना डेट करत आहेत. आज अखेर ते लग्नाच्या पवित्र बंधनात बांधले गेले आहेत. दीपक हुड्डा यांनी इंस्टाग्रामवर लग्नाचे फोटो शेअर केले आहेत.
दीपक हुड्डाची पत्नी हिमाचलची रहिवासी आहे. फोटो शेअर करत त्याने कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘9 वर्षांच्या प्रतिक्षेनंतर, प्रत्येक क्षण, प्रत्येक स्वप्न आणि प्रत्येक संभाषण आम्हाला या सुंदर दिवसाकडे घेऊन आला.
दीपक हुड्डा याने त्याचे मित्र, कुटुंब आणि आशीर्वाद देणाऱ्या सर्वांचे आभार मानले आहेत. इतर भारतीय क्रिकेटपटूंनी दीपक हुडा याला त्यांच्या वैवाहिक जीवनासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. शिखर धवनने लिहिले की, ‘दोघांचे खूप खूप अभिनंदन.’ युझवेंद्र चहलने लिहिले, ‘अभिनंदन.’ माजी भारतीय क्रिकेटपटू इरफान पठाणनेही लग्नासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. अफगाणिस्तानचा अष्टपैलू खेळाडू मोहम्मद नबीनेही लग्नाला शुभेच्छा दिल्या आहेत.
टीम इंडियासाठी डेब्यू केला आहे
दीपक हुडा याने भारतासाठी टी-20 आंतरराष्ट्रीय आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले आहे. हुडाने 10 एकदिवसीय सामने खेळताना 153 धावा केल्या आहेत. तर त्याने टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 21 सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याच्या नावावर 368 धावांची नोंद आहे. या फॉरमॅटमध्येही त्याच्या बॅटने शतक झळकावले आहे. त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 9 विकेट्सही घेतल्या आहेत.
View this post on Instagram
दीपक हुडाकडे आयपीएलचा खूप अनुभव आहे. त्याने 118 आयपीएल सामने खेळताना 1465 धावा केल्या आहेत. या लीगमध्ये त्याच्या नावावर 10 विकेट्सही आहेत. दीपक हुडा 2024 च्या आयपीएलमध्ये लखनऊ सुपर जायंट्स संघाचा भाग होता.
