‘महेंद्र सिंह धोनीमुळे प्रभावित झालो, पण त्याच्यामुळेच जास्त संधी मिळाली नाही’

'महेंद्र सिंह धोनीमुळे प्रभावित झालो, पण त्याच्यामुळेच जास्त संधी मिळाली नाही'
दिनेश कार्तिक आणि धोनी

महेंद्र सिंह धोनी जगातील सर्वात यशस्वी यष्टीरक्षक फलंदाजांपैकी एक आहे. त्याच्या बद्दलचं स्वत:च मत एका भारतीय यष्टीरक्षक फलंदाजाने व्यक्त केलं आहे.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: shashank patil

Jun 05, 2021 | 4:08 PM

मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुलीला (Sourav Ganguly) भारतीय संघात एक असा यष्टीरक्षक हवा होता. जो यष्टीरक्षणासोबतच बॅटिंगनेही संघाला महत्त्वाचे योगदान देईल. महेंद्र सिंह धोनी संघात येताच ही कमी पूर्ण झाली आणि त्यानंतर धोनी संघातील सर्वात महत्त्वाचा खेळाडू झाला. नंतरतर कर्णधारच झाल्याने भारताला दुसऱ्या य़ष्टीरक्षकाची गरजच भासली नाही. ज्यामुळेच भारताच्या एका यष्टीरक्षकाला जास्त आंतरराष्ट्रीय संधी मिळाल्या नसल्याचं त्यानं म्हटलं आहे. (Indian Cricketer Dinesh Karthik says MS Dhoni Adam Gilchrist gave strength to Wicketkeeper Batsmans)

दिनेश कार्तिक (Dinesh Karthik) असं या खेळाडूच नाव असून तो अजूनही भारतीय संघाकडून खेळतो. आयपीएलमध्येही तो केकेआरकडून खेळतो. दिनेश कार्तिकने 2004 साली भारतीय संघात पदार्पण केले.  धोनीने त्याच्यानंतर संघात पदार्पण केले. मात्र धोनीच्या आधी पदार्पण करुन देखील धोनीच्या अप्रतिम खेळामुळे कार्तिकला जास्त संधी मिळाल्या नाहीत. कार्तिकनंच हे म्हटलं असून सोबतच या सर्वाचा मला पश्चाताप होत नसल्याचंही त्याने सांगितल. त्याच्यामते जितकं क्रिकेट तो देशासाठी खेळला त्यात तो संतुष्ट आहे अस कार्तिक म्हणाला.

‘प्रत्येकाला सर्वश्रेष्ट व्हायचंय’

कार्तिक क्रिकेटनेकेस्टला दिलेल्या मुलाखतीत म्हणाला, “जोही भारतीय संघाकडून खेळत असतो, त्याचा प्रयत्न असतो स्वत:चं 100 टक्के देऊन सर्वश्रेष्ट बनायचं. पण अनेकदा असं होत अनेकदा नाही होत. त्यामुळे मी जेव्हाही मागे वळून पाहतो मला माझ्या कामगिरीवर गर्व वाटतो.”

धोनी, गिलख्रिस्टने बदलली समीकरणं

कार्तिक धोनी आणि ऑस्ट्रेलिया संघाचा माजी कर्णधार अॅडम गिलख्रिस्टबद्दल सांगताना म्हणाला की, ”धोनी आणि गिलख्रिस्टने यष्टीरक्षणात बरेच बदल आणले. त्यांनी यष्टीरक्षकाची समीकरण बदलत यष्टीरक्षक एक उत्तम फलंदाज होऊ शकतो. हे दाखवून दिलं. त्यांच्यामुळे माझ्यासारखे बरेचजण प्रभावित झाले.”

(Indian Cricketer Dinesh Karthik says MS Dhoni Adam Gilchrist gave strength to Wicketkeeper Batsmans)

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें