AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rishabh Pant Accident: ऋषभ पंतच्या अपघातच CCTV फुटेज आलं समोर, पहा अंगावर काटा आणणारा VIDEO

Rishabh Pant Accident: पहाटेच्या सुमारास ऋषभ पंतच्या गाडीचा दिल्ली-डेहराडून हायवेवर कसा भीषण अपघात झाला, त्याचं फुटेज समोर आलय.

Rishabh Pant Accident: ऋषभ पंतच्या अपघातच CCTV फुटेज आलं समोर, पहा अंगावर काटा आणणारा VIDEO
rishabh pant car accident
| Updated on: Dec 30, 2022 | 11:22 AM
Share

डेहराडून: टीम इंडियाचा स्टार क्रिकेटर ऋषभ पंतच्या कारला शुक्रवारी सकाळी भीषण अपघात झाला. ऋषभ पंत या अपघातात गंभीर जखमी झालाय. पण सुदैवाने त्याचे प्राण वाचले. ऋषभच्या कारला दिल्ली-डेहराडून हायवेवर रुडकी जवळ अपघात झाला. ऋषभ पंत शुक्रवारी दिल्लीवरुन रुडकीला चालला होता. रुडकीला ऋषभच घर आहे. त्याची कार नारसन जवळ पोहोचताच डिवायडरच्या खांबाला धडकली. त्यानंतर कार पलटी झाली. पहाटेच्या सुमारास हा अपघात झाला.

कार कोण ड्राइव्ह करत होतं?

रिपोर्ट्सनुसार ऋषभ पंत स्वत: कार ड्राइव्ह करत होता. त्यात त्याच्याकडून कुठेतरी चूक झाली असावी. दरम्यान आता ऋषभ पंतच्या अपघाताच सीसीटीव्ही फुटेज समोर आलय. अपघाताच्यावेळी ऋषभची कार किती वेगात होती, ते या सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसतय. हा व्हिडिओ पाहतान अंगावर काटा येतो.

अपघातानंतर काय घडलं?

ऋषभची कार डिवायडरला धडकली. पंतची कार या धडकेनंतर पलटली. त्यानंतर कारला आग लागली. पंत कसाबसा कारच्या बाहेर पडला. त्यामुळे त्याचा जीव वाचला. ऋषभला या अपघातात गंभीर जखमा झाल्या आहेत. त्याच्या पायाला सुद्धा फ्रॅक्चर आहे. पंतला हॉस्पिटलमध्ये कोणी नेलं?

ऋषभ पंतला सुरुवातीला स्थानिक लोकांनी हॉस्पिटलमध्ये पोहोचवलं. त्यांच्या डोक्याला गंभीर मार लागलाय. पायाला सुद्धा फ्रॅक्चर आहे. मुख्यमंत्री पुष्कर धामी यांनी हॉस्पिटलमध्ये जाऊन पंतची विचारपूस केली. त्याला डेहराडूनच्या रुग्णालयात रेफर केलय. पंतला या अपघातातून बर होण्यासाठी 3 ते 4 महिने लागू शकतात.

कुऱ्हाडीचा दांडा आपलीच लोक होत आहेत, उद्धव ठाकरे भावूक होत म्हणाले...
कुऱ्हाडीचा दांडा आपलीच लोक होत आहेत, उद्धव ठाकरे भावूक होत म्हणाले....
माझ्या डॉक्टरने पक्ष बदलला की काय ? राज यांच्या वक्तव्याने एकच हशा....
माझ्या डॉक्टरने पक्ष बदलला की काय ? राज यांच्या वक्तव्याने एकच हशा.....
'माझ्यासाठी ते पक्ष सोडणं नव्हतं, माझ्यासाठी...,'काय म्हणाले राज ठाकरे
'माझ्यासाठी ते पक्ष सोडणं नव्हतं, माझ्यासाठी...,'काय म्हणाले राज ठाकरे.
छगन भुजबळांना मोठा दिलासा; 'या' घोटाळा प्रकरणात ईडीकडून क्लीन चिट
छगन भुजबळांना मोठा दिलासा; 'या' घोटाळा प्रकरणात ईडीकडून क्लीन चिट.
राजकारणात लवचिकता नक्की असावी पण...
राजकारणात लवचिकता नक्की असावी पण....
हवा प्रदुषणावरून मुंबई हायकोर्ट आक्रमक, पालिका आयुक्तांचा पगार थांबवला
हवा प्रदुषणावरून मुंबई हायकोर्ट आक्रमक, पालिका आयुक्तांचा पगार थांबवला.
बाळासाहेबांना जर मानत असाल तर... भास्कर जाधवांच शिंदेंना आवाहन काय?
बाळासाहेबांना जर मानत असाल तर... भास्कर जाधवांच शिंदेंना आवाहन काय?.
लवचिक भूमिका घेतली तर... राज ठाकरे यांचं सूचक ट्विट काय?
लवचिक भूमिका घेतली तर... राज ठाकरे यांचं सूचक ट्विट काय?.
पलाश मुच्छलवर थेट गुन्हा... स्मृती मंधानाच्या जवळच्या...
पलाश मुच्छलवर थेट गुन्हा... स्मृती मंधानाच्या जवळच्या....
भाजप–MIM युती; नवनीत राणा, अनिल बोंडेंच्या हिंदुत्वावर प्रश्नचिन्ह?
भाजप–MIM युती; नवनीत राणा, अनिल बोंडेंच्या हिंदुत्वावर प्रश्नचिन्ह?.