World Cup 2023 : ‘भारतच वर्ल्ड कप जिंकणार, फक्त…’; सौरव गांगुली याचं मोठं वक्तव्य!
Saurav Ganguly on World Cup 2023 : भारतीय संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुली याने वर्ल्डकपबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. गांगुलीने भारत वर्ल्ड कप जिंकेल पण त्यासाठी एक गोष्ट गरजेची असल्याचं म्हटलं आहे.

मुंबई : भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि बीसीआयचा माजी अध्यक्ष सौरव गांगुली याने वर्ल्ड कपबाबत केलेलं वक्तव्य चर्चेत आलं आहे. वर्ल्ड कप सुरू होण्याआधी अनेक आजी-माजी खेळाडूंनी भाकीत वर्तवली आहेत. यामध्ये सेमी फायनल मध्ये जाणार चार संघांची नाव सांगितले तर काहींनी फायनल मध्ये जाणाऱ्या दोन संघांची नावे घेतली. अशातच सौरव गांगुली याने भारत वर्ल्ड कप कसा जिंकेल याबाबत काही शब्दात आपले प्रतिक्रिया दिली आहे. दादाचं हे वक्तव्य सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.
काय म्हणाला सौरव गांगुली?
यंदाचा वर्ल्ड कप हा मोठा असणार असून रोहित शर्माच्या नेतृत्त्वाखाली संघाचा आत्मविश्वास उंचावला आहे. आताच भारताने अशिया कप जिंकला असून ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या वनडे मालिकाही भारताने जबाबदार कामगिरी करत ही मालिका जिंकली. भारत आता ज्या प्रकार खेळत आहे तशीच कामगिरी पुढील 45 दिवस केली तर भारत यंदाचा वर्ल्ड कप नक्की जिंकेल, असं सौरव गांगुली याने म्हटलं आहे.
वर्ल्ड कप 5 ऑक्टोबर पासून सुरुवात होत आहे, वर्ल्ड कप थराराची सर्व क्रिकेट चाहते मोठ्या उत्सुकतेने वाट पाहत आहेत. यंदाचा वर्ल्ड कप हा भारतात खेळायला जात असल्याने भारतीय संघाला प्रबळ दावेदार मानलं जात आहे. भारताचा पहिला सामना ऑस्ट्रेलिया संघासोबत 8 ऑक्टोबरला चेन्नईच्या मैदानावर होणार आहे. आता पार पडलेल्या तीन सामन्यांच्या मालिकेमध्ये भारताने 2-1 ने विजय मिळवला होता. आतापर्यंत पाचवेळा कांगारूंनी वर्ल्ड कपवर आपलं नाव कोरंल आहे.
वर्ल्ड कपसाठी भारताचा संघ : रोहित शर्मा (C), हार्दिक पंड्या (VC), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, रविचंद्रन अश्विन, इशान किशन, सूर्यकुमार यादव.
