The Hundred मध्ये भारतीय महिलांचा दबदबा, जेमिमा, शेफालीच्या तुफान फलंदाजीनंतर ‘या’ खेळाडूची अष्टपैलू खेळी

इंग्लंडच्या मैदानात सुरु असलेल्या The Hundred या 100 चेंडूच्या सामन्यांच्या स्पर्धेत भारताच्या महिला खेळाडू तुफान खेळी करत आहेत. आधी जेमिमा आणि शेफाली यांच्या दमदार खेळी केल्यानंतर आता आणखी एका महिला खेळाडूने अष्टपैलू खेळी केली आहे.

The Hundred मध्ये भारतीय महिलांचा दबदबा, जेमिमा, शेफालीच्या तुफान फलंदाजीनंतर 'या' खेळाडूची अष्टपैलू खेळी
क्रिकेटर दीप्ती शर्मा
Follow us
| Updated on: Aug 11, 2021 | 12:37 PM

लंडन : 200 चेंडूचा सामना. दोन्ही संघाना प्रत्येकी 100 चेंडू खेळायला दिले जाणार. अधिक स्कोर करणारा संघ विजयी होणार अशा अनोख्या प्रकारची स्पर्धा सध्या इंग्लंडमध्ये सुरु आहे. यामध्ये महिला क्रिकेटपटूंच्या स्पर्धेत भारतीय महिला धमाकेदार खेळी करत आहेत. आधी फलंदाज जेमिमा आणि शेफाली यांनी केलेल्या दमदार फलंदाजीनंतर आता भारताची ऑलराउंडर दीप्ती शर्माने (Deepti Sharma) ही अष्टपैलू खेळीचे दर्शन घडवले आहे. तिने लंडन स्पिरीट (London Spirit) संघाकडून खेळताना मॅनचेस्टर ऑरिजिनल्स (Manchester Originals) संघाविरुद्ध विजयी खेळी केली.

सामन्यात आधी मॅनचेस्टर ऑरिजनल्सने फलंदाजी करत 100 चेंडूंत 5 विकेटच्या बदल्यात 127 धावा केल्या.  यावेळी दीप्तीने 20 चेंडूत केवळ 10 धावा देत 2 विकेट्स घेतले. दीप्तीने पहिल्या ओव्हरमध्ये सलमीवीर लिचेल लीला बाद केलं. त्यानंतर प्रीज हीलाही तिने बाद करत सामन्यात दोन विकेट्स घेतले.

25 मिनिटांत मिळवून दिला विजय

लंडन स्पिरीट संघाला विजयासाठी 128 धावांची गरज असताना केवळ 5 विकेटच्या बदल्यात त्यांनी हे लक्ष्य साध्य केलं. लंडन स्पिरीट संघाकडून गोलंदाजीत चमक दाखवणाऱ्या दीप्तीनेच फलंदाजीतही कमाल केली. तिने  25 मिनिटं क्रिजवर खेळून 20 चेंडूत नाबाद 34 धावा ठोकल्या. या 34 धावांच संघासाठी विजयी धावा ठरल्या. दीप्तीने 3 चौकार ठोकत संघाला विजय मिळवून दिला. तिने धावून देखील चांगल्या धावा केल्या. आधी 2 विकेट्स घेतल्यानंतर महत्त्वपूर्ण 34 धावा केल्यामुळे दीप्ती शर्माला प्लेयर ऑफ द मॅचने सन्मानित करण्यात आलं.

इतर बातम्या

भारताच्या धडाकेबाज महिला क्रिकेटपटूची इंग्लंडमध्ये हवा, 22 चेंडूत अर्धशतक ठोकत संघाला मिळवून दिला विजय

The Hundred मध्ये ‘या’ भारतीय महिला खेळाडूचा कहर सुरुच, 10 चेंडूत ठोकल्या 40 धावा, चौकारांचा पाऊस

(Indian Women All rounder Deepti Sharma stunning performance at the hundred)

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.